सध्या सीरियामध्ये सुरु असलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर, इस्रायलने त्यांच्या सैन्याला दक्षिण सीरियामध्ये “संरक्षण क्षेत्र” (Sterile defence zone) तयार करण्याचे आदेश दिले आहेत. हे संरक्षण क्षेत्र इस्रायली उपस्थितीशिवाय तिथे कायमस्वरूपी लागू केले जाणार असून, सीरिया आणि इस्रायली-व्याप्त गोलान हाइट्समधील बॉर्डरवर आपली पकड घट्ट करण्यासाठी याचा फायदा होईल, असे संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी मंगळवारी सांगितले.
कॅटझ यांनी याबाबत कोणतीही अधिक माहिती देण्याचे टाळले. मात्र सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांचे सरकार कोसळल्यानंतर “सीरियामध्ये दहशतवादाची स्थापना आणि संघटना रोखण्यासाठी हे संरक्षण क्षेत्र सहाय्य करेल” असे त्यांनी यावेळी सांगितले. ‘अल-असद यांच्या कौटुंबिक हुकुमशाहीची राजवट सपल्यामुळे या परिस्थीतीचा फायदा घेऊन, बंडखोर आपली पकड मजबूत करु पाहत आहेत. मात्र आम्ही हे रोखण्यासाठी प्रयत्नशील राहू. इस्लामिक स्टेट्सला आम्ही इस्रायलला धमक्या देण्यापासून रोखू, असे कॅट्झ यांनी इस्रायली बंदर हैफा येथे नौदल तळाला भेट दिल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले.
दरम्यान ‘इस्रायली सैन्य 1973 च्या अरब-इस्त्रायली युद्धानंतर तयार केलेल्या सीरियन प्रदेशातील डिमिलिटराइज्ड बफर झोनमध्ये तसेच विभक्त क्षेत्राच्या बाहेरील काही अतिरिक्त क्षेत्रांमध्ये वास्तव्यास आहेत’, अशी माहिती तेथील लष्करी प्रवक्त्याने दिली.
मात्र दुसरीकडे सीरियाच्या सूत्रांनी सांगितले की, ‘राजधानी दमास्कसच्या 25 किलोमीटर परिघाच्या आत घुसखोरी झाली आहेस अशी माहिती मिळताच असे सैन्याने डिफेन्स झोनच्या पलीकडे सीरियाच्या हद्दीत मोठ्याप्रमाणात प्रवेश केल्याचे नाकारले आहे.’
लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल नदव शोशानी हे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, “IDF सैन्य दमास्कसच्या दिशेने पुढे जात नाही. ही अशी गोष्ट नाही जी आम्ही करत आहोत किंवा कोणत्याही प्रकारे याचा पाठपुरावा करत आहोत,”
इस्रायली प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘शनिवार – रविवारपासून सीरियातील अनेक तळांवर लढाऊ विमानांनी जवळपास २०० ते २५० हवाई हल्ले केले आहेत. लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि रासायनिक शस्त्रे यासह सीरियन लष्करी उपकरणे बंडखोरांच्या हाती पडू नयेत, हे सुनिश्चित करण्यासाठी हे ऑपरेशन राबवले गेले असून, गेल्या काही वर्षांतील हे सगळ्यात मोठे ऑपरेशन आहे असे दिसते.’
“सीरियाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, परंतु आमची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ते करण्याचा आमचा हेतू आहे,” पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले.
हवाई हल्ल्यांव्यतिरिक्त हल्यांबाबत बोलताना कॅटझ म्हणाले की, ‘इस्रायली क्षेपणास्त्र जहाजांनी सोमवारी रात्री केलेल्या कारवाईत सीरियन लष्करी ताफ्याचा नाश केला होता. ब्रिटिश सुरक्षा फर्म अम्ब्रेनच्या सांगण्यानुसार, या कारवाईत लताकियाच्या सीरियन बंदरात कमीतकमी सहा जहाजांना लक्ष्य केले गेले’.
गेल्या रविवारी अल-असद यांच्या पलायनानंतर, इस्रायली सैन्याने सीरियामधील निशस्त्रीकरण क्षेत्रांमध्ये प्रवेश केला, ज्यामध्ये दमास्कसकडे वळणा-या मोक्याच्या माऊंट हर्मनच्या सीरियन बाजूचाही समावेश आहे. येथील एक सीरियन लष्करी चौकी देखील त्यांनी ताब्यात घेतली.
इराण-समर्थित हिजबुल्लाह दहशतवाद्यांशी लढा दिल्यानंतर, लेबनॉनमध्ये युद्धविराम करण्यास सहमती दर्शविण्यासाठी तसेच सीमा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी या घुसखोरीला मर्यादित आणि तात्पुरते उपाय म्हणून ही पावले उचचल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.
परंतु युनायटेड अरब अमिरातीसह अन्य राज्यांनी इस्रायलच्या या कारवाईचा निषेध केला आहे. तसेच इस्रायलने नियुक्त केलेल्या बफर झोनच्या पलीकडे त्यांचे नेमके किती सैन्य हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
इस्रायलने त्याचा मुख्य शत्रू इराणचा मित्र असलेल्या अल- असद यांच्या पराभवाचे समर्थन केले असले, तरी प्रमुख बंडखोर गट, हयात तहरीर अल-शामला बाबत सावधपणे प्रतिक्रिया दिली. HTS ची मुळे अल कायदा आणि इस्लामिक स्टेटसह इस्लामी चळवळी वाढवण्याच्या तयारीत आहेत.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)
अनुवाद – वेद बर्वे