कल्याणी समूहाला पाण्याखालील संरक्षण प्रणालींसाठी ₹250 कोटींची ऑर्डर

0

संरक्षण मंत्रालयाने, कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्स लि. (KSSL) कंपनीला, पाण्याखालील संरक्षण प्रणाली पुरवण्यासाठी ₹250 कोटींहून अधिक मूल्याचे कंत्राट दिले आहे. 10 नोव्हेंबर 2015 रोजी स्वाक्षरी झालेल्या या करारामध्ये, जलदगती खरेदी नियमांनुसार नोव्हेंबर 2026 पर्यंत, म्हणजे एका वर्षाच्या आत अपेक्षित पुरवठा करणे बंधनकारक आहे.

भारत फोर्ज लिमिटेडच्या पूर्ण मालकीची उपकंपनी- कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्स लि. ने, गेल्या पाच वर्षांत मानवरहित सागरी प्रणालींचे डिझाइन, त्यांचा विकास आणि उत्पादन क्षेत्रात आपले मजबूत स्थान निर्माण केले आहे. कंपनीने यापूर्वी भारतीय नौदलाला स्वायत्त पाण्याखालील वाहने पुरवली आहेत, जी सध्या सेवेत रूजू आहेत. याशिवाय नौदल तोफा आणि सागरी उपकरणांसह, पाण्याखालील संरक्षण तंत्रज्ञान हे कल्याणी समूहासाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. भारतीय नौदलाच्या तातडीच्या आणि क्रिटिकल मिशनसंबंधीत गरजांशी जुळवून घेण्यासाठी, ही कंपनी आपली क्षमता अधिक विकसीत आहे आणि प्रगत उपायांची वेळेवर डिलिव्हरी सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करत आहे.

भविष्यात, मानवरहित पाण्याखालील संरक्षण प्रणाली जगभरातील नौदल ऑपरेशन्समध्ये परिवर्तनकारी भूमिका बजावणार आहेत, ज्यामुळे वादग्रस्त सागरी वातावरणात नियमीत पाळत, सुरुंग प्रतिबंधक क्षमता आणि सुरक्षित दळणवळण मिळेल. भारतासाठी, या प्रणाली नौदल प्रतिबंधक क्षमता मजबूत करण्यासाठी आणि धोरणात्मक सागरी मार्गांचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. KSSL चे स्वायत्त अंडरवॉटर वाहनांमध्ये सध्या सुरू असलेले कार्य, तिला या उत्क्रांतीमध्ये अग्रभागी ठेवते. या तंत्रज्ञानामुळे भारतीय नौदलाला, प्रगत प्लॅटफॉर्म्स तैनात करता येऊ शकतात, जे कमी जोखमीचे आणि अधिक कार्यक्षेत्र व्यापणारे असतील.

स्वदेशी डिझाइन आणि उत्पादनामध्ये गुंतवणूक करून, कल्याणी समूह केवळ तात्काळ संरक्षण गरजा पूर्ण करत नाही, तर ‘आत्मनिर्भरता’ या राष्ट्रीय दृष्टिकोनालाही पुढे नेत आहे, ज्यामुळे भविष्यातील पाण्याखालील संरक्षण तंत्रज्ञान भारतातच विकसित होईल आणि टिकून राहील.

भारत फोर्ज लिमिटेडची प्रमुख संरक्षण कंपनी म्हणून, KSSL समूहाला पाच दशकांहून अधिक जुन्या डिझाइन्स, अभियांत्रिकी, धातू विज्ञान आणि उत्पादन कौशल्याच्या वारशातून सामर्थ्य मिळते. या भक्कम पायाभरणीवरच भारत फोर्जने भारतातील अग्रगण्य संरक्षण कंपन्यांपैकी एक म्हणून मजबूत स्थान निर्माण केले आहे. KSSL नावीन्यता आणि ऑपरेशनल उत्कृष्टतेवर लक्ष केंद्रित करून, ग्रुपच्या संरक्षण व्यवसाय उपक्रमांना बळकटी देत, आपला वारसा यशस्वीरित्या पुढे नेत आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleऑपरेशन सिंदूरने आधुनिक युद्धात नवा मापदंड प्रस्थापित केला: CDS चौहान
Next articleपंतप्रधान मोदींचा भूतान दौरा: जलविद्युत क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांना चालना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here