उत्तर कोरियाचे आण्विक सामर्थ्य बळकट करण्याचे, किम यांचे आवाहन

0
किम
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन, यांनी 29 जानेवारी रोजी उत्तर कोरियातील एका अज्ञात ठिकाणी, देशातील आण्विक सामग्री उत्पादन तळ आणि अण्वस्त्र संस्थांना भेट दिली. सौजन्य: REUTERS

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन, यांनी यावर्षी त्यांचे आण्विक सामर्थ्य बळकट करण्याचे आवाहन केले आहे. उत्तर कोरियाचे राज्य माध्यम प्रसारक- KCNA ने बुधवारी दिलेल्या वृत्तानुसार, किम यांनी आण्विक सामग्री उत्पादन तळे आणि आण्विक शस्त्र संस्थांच्या भेटीदरम्यान हे आहावन केले.

किम यांचा हा दौरा, देशाच्या वाढत्या आण्विक शस्त्रागाराचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा पदभार स्विकारल्याच्या पार्श्वभूमीवर, प्योंगयांगने मिसाईल चाचण्यांचा पुन्हा शुभारंभ केला. ज्यावर दक्षिण कोरियाने टिप्पणी केली की, ‘या चाचण्यांचा उद्देश ट्रम्प यांचे लक्ष वेधून घेणे हा आहे.’

भेटीदरम्यान किम यांना, उच्च गुणवत्तेच्या आण्विक सामग्रीचे उत्पादन करण्याच्या प्रक्रियेची आणि २०२५ आणि त्यानंतरच्या योजनांची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी गेल्यावर्षी, तेथील शास्त्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात “उल्लेखनीय यश” आणि “आश्चर्यकारक उत्पादन परिणाम” मिळवल्याबद्दल, त्यांचे कौतुक केले, अशी माहिती KCNA ने आपल्या अहवालातून दिली.

किम यांनी यावर्षी, ‘उच्च दर्जाच्या आण्विक सामग्रीचे उत्पादन अधिक वाढवण्याचे आणि देशाच्या अण्वस्त्र दलांना आणखी बळकट करण्यात यश संपादन करण्याचे’ आवाहान केले आहे.

KCNA च्या अहवालानुसार, किम यांनी- “हे वर्ष एक महत्त्वपूर्ण वर्ष आहे कारण या वर्षात आपण आण्विक शक्तींना बळ देण्याच्या योजनांची अंमलबजावणी करणार असून, त्या यशस्वी करण्यावर भर देणार आहोत,” अशा शब्दांत शास्त्रज्ञ व अन्य कर्मचाऱ्यांना संबोधित केले.

”उत्तर कोरियाला, शत्रू देशांशी दीर्घकाळ चाललेल्या संघर्षामुळे आज सर्वात अस्थिर सुरक्षा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे आता देशाची आण्विक क्षमता वाढवणे हे अपरिहार्य आहे,’ असे किम पुढे म्हणाले.

प्योंगयांगने अनेकवेळा असा दावा केला आहे की, त्याच्या आण्विर शस्त्र संचयाचा उद्देश वॉशिंग्टन आणि त्याच्या सहयोगी देशांकडून येणाऱ्या धमक्यांपासून संरक्षण करणे हा आहे, जे देश १९५०-५३ च्या कोरियन युद्धात उत्तर कोरियाच्या विरुद्ध लढले होते.

दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय गुप्तचर सेवेने म्हटल्याप्रमाणे, उत्तर कोरियाच्या अलीकडील शक्ती प्रदर्शनाचे उद्दिष्ट “त्यांच्या अमेरिकेच्या प्रतिबंधात्मक शस्त्रसामग्रीचा दाखला देणे आणि ट्रम्प यांचे लक्ष आकर्षित करणे” असे आहे. गेल्या महिन्यात एका महत्त्वाच्या धोरण बैठकीत त्यांनी “अमेरिकेच्या विरोधात कठोरतम काउंटरएक्शन” करण्याची शपथ घेतली होती.

डोनाल्ड ट्रम्प, ज्यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात किमसोबत अभूतपूर्व शिखर बैठकांचे आयोजन केले आणि त्यांच्या व्यक्तिगत संबंधांची प्रशंसा केली, त्यांनी गेल्या आठवड्यात म्हटले की, “ते पुन्हा किम यांच्याशी संपर्क साधतील.”

ट्रम्प यांनी 20 जानेवारी म्हणजेच त्यांच्या शपथविधीच्या दिवशी, उत्तर कोरियाचे “प्रभावी आण्विक शक्ती” म्हणून वर्णन केले. तसेच ट्रम्प यांचे आताचे संरक्षण सचिव- पीट हेगसेथ यांनी त्यांच्या सिनेट मंजुरी सुनावणीमध्ये हेच म्हटले होते. नंतर यावर, ‘वॉशिंग्टन आण्विक निशस्त्रीकरण चर्चेऐवजी शस्त्रसंचय कमी करण्याच्या चर्चांना प्राधान्य देईल का?’, असा सवाल उपस्थित केले गेला.

सध्या अमेरिकेचे परराष्ट्र सचिव असलेले मार्को रुबिओ यांनी, त्यांच्या सिनेट पुष्टीकरणाच्या सुनावणीत, ट्रम्प यांच्या उत्तर कोरियासोबतच्या भूतकाळातील प्रतिबद्धतेचे स्वागत केले आणि म्हणाले की त्यांना विश्वास आहे की, “उत्तर कोरियाला अत्यंत गंभीर, व्यापक धोरणाची भूक असणे आवश्यक आहे.”

दक्षिण कोरियाचे म्हणणे आहे की, उत्तर कोरियाचे आण्विक निशस्त्रीकरण हे कोणत्याही संवादाचे मुख्य उद्दिष्ट असावे.

या सर्व घडामोडींवर व्हाईट हाऊसने लगेच कोणत्याही प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद दिला नाही, पण या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीने रॉयटर्सला सांगितले की, ट्रम्प कोरियाच्या द्वीपकल्पाचे आण्विक निशस्त्रीकरण पुढेही चालू ठेवतील.

नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रवक्ते ब्रायन ह्युजेस यांचा हवाला देत, दक्षिण कोरियाच्या योनहाप वृत्तसंस्थेने बुधवारी सांगितले की, ट्रम्प उत्तर कोरियाच्या “संपूर्ण अण्वस्त्रीकरण” चा पाठपुरावा करतील.

(रॉयटर्सच्या इनपुटसह)


Spread the love
Previous articleम्यानमारमध्ये यंदा निवडणुका होणार – जुंटाची घोषणा
Next articleवॉशिंग्टन डीसीजवळ प्रवासी विमानाची लष्करी हेलिकॉप्टरला जोरदार धडक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here