आगीमुळे बंद करण्यात आलेला हिथ्रो विमानतळ हळूहळू कार्यान्वित

0
हिथ्रो
21 मार्च 2025 रोजी लंडन जवळच्या विद्युत उपकेंद्राला लागलेल्या आगीत विमानतळावरील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर हिथ्रो आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टरमॅकवर विमाने उभी राहिली आहेत. (रॉयटर्स/कार्लोस जासो)

लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील उड्डाणे शुक्रवारी उशिरा हळूहळू पुन्हा सुरू करण्यात आली. एका मोठ्या उपकेंद्राला लागलेल्या आगीमुळे विमानतळावरील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र यामुळे युरोपमधील सर्वात व्यस्त विमानतळ पूर्ण दिवस बंद करावा लागला. 

हिथ्रो विमानतळाजवळ लागलेल्या आगीच्या घटनेमुळे हजारो प्रवासी अडकून पडले आणि जागतिक विमान वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला.

हिथ्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री विमानतळाजवळील उपकेंद्राला लागलेल्या भीषण आगीमुळे पूर्णपणे बंद कराव्या लागलेल्या जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात व्यस्त विमानतळ पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांच्या चमूने अथक परिश्रम घेतले. याशिवाय प्रवाशांनी या ठिकाणापासून दूर राहावे यासाठी वेळोवेळी सूचना जारी करण्यात आल्या होत्या.

 

शुक्रवारच्या संबंध दिवसात या विमानतळावरून 1हजार 351 उड्डाणे होणार होती, तर  2 लाख 91 हजार प्रवासी प्रवास करणार होते. परंतु आगीमुळे ही सगळी विमाने ब्रिटन आणि संपूर्ण युरोपमधील इतर विमानतळांवर वळवण्यात आली, तर अनेक लांब पल्ल्याच्या उड्डाणे त्यांच्या प्रस्थान स्थळी परत आली.

स्थिती हळूहळू पूर्वपदावर

हिथ्रो विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की शुक्रवारी मर्यादित संख्येत उड्डाणे असतील. यात मुख्यतः विमाने बदलणे आणि लंडनमध्ये विमाने परत आणणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

हिथ्रोचे मुख्य कार्यकारी थॉमस वोल्डबाय म्हणाले, “उद्या सकाळी, आम्ही सामान्य दिवसाप्रमाणे 100 टक्के आमचृया दैनंदिन स्थितीमध्ये परत येण्याची अपेक्षा करतो.” “सगळ्यात आधी मला काय करायचे आहे तर ज्यांच्या प्रवासावर परिणाम झाला आहे अशा अनेक प्रवाशांची माफी मागावीशी वाटते … त्यांना सोसाव्या लागणाऱ्या सर्व गैरसोयींबद्दल आम्ही दिलगीर आहोत.”

पोलिसांनी सांगितले की, यामागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याची कोणतेही चिन्हे जरी नसली तरी, दहशतवादविरोधी अधिकारी त्यांची क्षमता आणि पायाभूत सुविधांचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन चौकशीचे नेतृत्व करत होते.

या बंदमुळे केवळ प्रवाशांनाच त्रास झाला नाही तर अशा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा कशा अयशस्वी होऊ शकतात असा प्रश्न करणाऱ्या विमान कंपन्यांनीही आपला राग व्यक्त केला.

या उद्योगाला आता लाखो पौंडांचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे आणि याची भरपाई कोणी द्यायची यावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे.

बॅक-अप पॉवर

“तुम्हाला वाटेल की त्यांच्याकडे लक्षणीय बॅक-अप पॉवर असेल,” युरोपियन एअरलाइनच्या एका उच्चपदस्थ अधिकारीने रॉयटर्सला सांगितले.

हिथ्रोच्या वॉल्डबाय यांनी सांगितले की बॅक-अप सिस्टम आणि कार्यपद्धती जसे पाहिजे तसे काम करत होत्या.

“हा (वीज पुरवठा) थोडा कमकुवत मुद्दा आहे,” तो विमानतळाबाहेर पत्रकारांना म्हणाला. “परंतु अर्थातच विशिष्ट आकाराच्या आकस्मित परिस्थितीत आपण 100 टक्के स्वतःचे रक्षण करू शकत नाही आणि ही परिस्थिती त्यापैकी एक आहे.”

भरपाईचे कोण पैसे देईल असे विचारले असता, त्यांनी सांगितले की “प्रक्रिया सुरू आहे”, “आमच्याकडे अशा घटनांच्या जबाबदाऱ्या नाहीत.”

ब्रिटनचे वाहतूक मंत्री हेडी अलेक्झांडर यांनी ही घटना हिथ्रोच्या नियंत्रणाबाहेर असल्याचे सांगितले.

त्यांनी त्यांच्या आपात्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याच्या योजना अतिशय वेगाने तयार केल्या आहेत. सर्व आपात्कालीन प्रतिसादकर्ते विमान चालकांच्या सहकार्याने काम करत आहेत, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

“अशा सदोष घटनांच्या वेळी कोणत्याही सूचना नाहीत, परंतु तपास खुल्या मनाने केला जात असल्याने तुम्ही त्याचे कौतुक कराल.”

विमाने दुसरीकडे वळवली

फ्लाइट एनालिटिक्स फर्म सिरियमच्या आकडेवारीनुसार, जेटब्लू, अमेरिकन एअरलाइन्स, एअर कॅनडा, एअर इंडिया, डेल्टा एअर लाइन्स, क्वांटास, युनायटेड एअरलाइन्स, आयएजीच्या मालकीची ब्रिटिश एअरवेज आणि व्हर्जिन यासारख्या विमान कंपन्यांना मध्यरात्री त्यांच्या मूळ विमानतळांवर वळवण्यात आली किंवा परत पाठवण्यात आली

अमेरिकन विमान कंपन्यांसह अनेक विमान कंपन्यांचे समभाग घसरले.

विमानचालन तज्ञांनी सांगितले की 2010 च्या आइसलँडिक ज्वालामुखीतून निर्माण झालेल्या राखेच्या ढगामुळे सुमारे 1 लाख उड्डाणे बंद पडल्याने युरोपियन विमानतळांवर इतक्या मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला होता.

उड्डाणे पुन्हा सुरू होत असताना, सर्व नियोजित प्रवासी सेवा सामान्य होण्यास थोडा वेळ लागेल.

“आमच्याकडे उड्डाण आणि केबिन क्रूचे सहकारी तसेच विमाने सध्या अशा जागी आहेत जिथे ती असावीत अशा आमच्या अजिबात योजना नव्हत्या,” असे हिथ्रो येथील सर्वात मोठी वाहक ब्रिटिश एअरवेजचे मुख्य कार्यकारी सीन डॉयल म्हणाले, ज्यांची 341 उड्डाणे शुक्रवारी तिथे उतरणार होती.

ते म्हणाले, “दुर्दैवाने, पुढचा काही काळ आमच्यासोबत उड्डाण करणाऱ्या आमच्या सर्व ग्राहकांवर याचा मोठा परिणाम होईल.”

आगीचे कारण अजूनही अज्ञात

अग्निशमन दलाने सांगितले की आगीचे कारण कळू शकलेले नाही. मात्र उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमधील 25 हजार लिटर कूलिंग ऑईलला आग लागली होती. सकाळपर्यंत अग्निशामन दलाच्या पांढऱ्या फोममध्ये जळत असलेला ट्रान्सफॉर्मर दिसू लागला.

लंडनमध्ये अडकलेले आणि अनेक दिवस प्रवासात व्यत्यय येण्याची शक्यता असलेले प्रवासी पर्यायी प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी धडपडत होते.

“हे खूपच तणावपूर्ण आहे,” असे न्यूयॉर्कला घरी जाणाऱ्या 39 वर्षीय प्राध्यापक रॉबिन ऑट्री म्हणाले. “नव्याने प्रवास करण्यासाठी मला आता किती खर्च येईल याचीच चिंता आहे.”

हिथ्रोच्या आसपासच्या हॉटेल्समधील किंमती वाढल्या, आरक्षण साइट 500 पाउंडमध्ये (645 अमेरिकन डॉलर्स) खोल्या देऊ करत आहेत, ज्या सामान्य किंमतीच्या पातळीच्या अंदाजे पाच पट जास्त आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleTrump Picks Boeing Over Lockheed For Sixth-Gen Fighter Jet F-47 Contract
Next articleट्रम्प यांनी केली सहाव्या पिढीतील  एफ-47 करारासाठी बोईंगची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here