‘संबंध’ व्यासपीठातून उलगडतेय, भारताची शेजारी राष्ट्रांशी जोडणीची कहाणी

0
'संबंध'
दक्षिण आशियातील शेजाऱ्यांसोबत भारताच्या वाहतूक आणि ऊर्जा संबंधांचा मागोवा घेणारा पहिला गतिमान प्लॅटफॉर्म, सीएसईपीच्या संबंध डेटाबेसचा स्क्रीनशॉट.

धोरणात्मक वादविवाद आणि मोठ्या राजकीय घोषणांच्या गदारोळात, देशांना खऱ्या अर्थाने जोडणाऱ्या लहान-सहान रचना दुर्लक्षितच राहतात. पूल, रस्ते, वीजवाहिन्या, सीमाचौक्या यांसारखे आहेत ते शांत पण प्रभावी दुवे, जे प्रत्यक्षात देशांमधील सहकार्याची खरी कहाणी सांगतात. आता, एका महत्त्वाकांक्षी नव्या प्लॅटफॉर्ममुळे, हे विखुरलेले दुवे एका नकाशावर एकत्र आले आहेत.

‘सेंटर फॉर सोशल आणि इकॉनॉमिक प्रोग्रेस (CSEP)’ या संस्थेने तयार केलेला ‘संबंध’ डेटाबेस आणि मॅप (Sambandh Database and Map), हे भारताच्या शेजारी देशांसोबतच्या सीमापार पायाभूत सुविधा प्रकल्पांचे एकत्रित मॅपिंग करणारे पहिलेच व्यासपीठ आहे.

हे एका ‘जिवंत अटलास’ प्रमाणे आहे, ज्यामध्ये भारताचे- बांगलादेश, भूतान, चीन, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका यांसारख्या शेजारी देशांसोबतचे संबंध दाखवले जातात. ऊर्जा वाहिन्या, जलमार्ग, महामार्ग, व्यापार मार्ग – हा सर्व डेटा ‘संबंध’ एकत्र करतो आणि ते एका सोप्या, संवादात्मक (interactive) आणि उपयोगी साधनात रूपांतरित करतो.

या प्रकल्पाचा पहिला टप्पा भूतानवर लक्ष केंद्रीत करतो, कारण भूतानबरोबर भारताचे संबंध खूप खोल आणि विश्वासपूर्ण आहेत. पण प्रकल्पाची महत्त्वाकांक्षा यापेक्षा खूप मोठी आहे. दक्षिण आशियामधील भारताचे सर्व महत्त्वाचे संपर्क प्रकल्प नकाशावर मांडणे आणि त्यांचे विश्लेषण करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहेय

दक्षिण आशिया हा जगातील सर्वात कमी एकत्रित (least integrated) प्रदेशांपैकी एक मानला जातो. अशा पार्श्वभूमीवर, ‘संबंध’चे अस्तित्वच भारताच्या नवे ध्येय आणि दृष्टीकोनाचे प्रतीक आहे.

“हे भारताच्या शेजारी देशांमधील स्थान नव्याने समजून घेण्याचा प्रयत्न आहे,” असे एक तज्ज्ञ सांगतात.

‘संबंध’ची नकाशात्मक कल्पकता ही त्याची खरी ताकद आहे. आता धोरणकर्ते, अभ्यासक, व्यावसायिक आणि सामान्य नागरिक देखील भारताच्या प्रादेशिक संपर्क नेटवर्ककडे एका एकत्रित दृष्टीकोनातून पाहू शकतात.

पूर्वी जिथे माहिती सरकारी फायलींमध्ये, प्रेस नोट्समध्ये किंवा विविध संशोधनपत्रांमध्ये विखुरलेली असायची, तिथे आता ‘संबंध’ हे स्वच्छ, इंटरअॅक्टिव आणि संपूर्ण चित्र समोर ठेवतो. ज्यात भारताचे सीमापार महामार्ग, ऊर्जा वाहिन्या, सीमाचौक्या आणि जलमार्ग यांचा समावेश आहे.

भारताच्या ‘Neighbourhood First’ आणि ‘Act East’ या धोरणांमुळे संपर्क हीच आता नवी राजनैतिक मुद्रा (currency) बनली आहे. नेपाळमध्ये बांधला गेलेला प्रत्येक रस्ता, श्रीलंकेत विकसित होणारा प्रत्येक बंदर प्रकल्प,
बांगलादेशात पोहोचणारी प्रत्येक ऊर्जा वाहिनी. हे सर्व केवळ अभियांत्रिकी यश नसून राजकीय संकेत देखील आहेत. ‘संबंध’ या संकेतांना सुस्पष्ट आणि दृश्यमान बनवतो.

‘संबंध’ प्रकल्पाची उद्दिष्टे:

  • भारताच्या प्रादेशिक संपर्क प्रकल्पांचा सांघिक (longitudinal) डेटाबेस तयार करणे
  • ऊर्जा, जमीन, सीमा आणि जलमार्ग या चार क्षेत्रांतील संपर्क सहाव्या प्रकारच्या जोडण्यांनुसार नकाशावर मांडणे
  • सरकार, उद्योगजगत आणि बहुपक्षीय भागीदारांसाठी निर्णयक्षम माहिती उपलब्ध करून देणे

या व्यासपीठामागे आहे ‘Sambandh Regional Connectivity Initiative’, जी 2020 मध्ये सुरू झाली. या उपक्रमाचे नेतृत्व CSEPचे रिया सिन्हा, कॉन्स्टँटिनो जेव्हियर आणि अभिषेक अग्रवाल करत आहेत.

त्यांचे कार्य केवळ प्रकल्पांची यादी देत नाही, तर त्या प्रकल्पांचा ‘इंडो-पॅसिफिक’ धोरणात कसा उपयोग होतो आणि ते प्रादेशिक एकत्रीकरणासाठी का महत्त्वाचे आहेत, हे स्पष्टपणे दाखवते.

हे सर्वांसाठी एक उपयुक्त साधन आहे, संशोधकांसाठी ‘संबंध’ म्हणजे माहितीचा खजिना आहे, तर धोरणकर्त्यांसाठी निर्णय घेण्यासाठीचे मार्गदर्शक. व्यावसायिकांसाठी संधींचा नकाशा. आणि दक्षिण आशियाच्या भविष्यात रस असणाऱ्या प्रत्येकासाठी, हा एक दृढ होत चाललेल्या सहकार्याचा भक्कम पुरावा आहे.

‘संबंध’ची खरे सौंदर्यस्थळ म्हणजे – ही एक अशी कहाणी सांगते, जी आपण फारशी पाहत नाही: भारत केवळ एक उदयोन्मुख महाशक्ती म्हणून नव्हे, तर एक ‘संपर्क साधणारा’ देश म्हणूनही उभा आहे. ज्याच्या महत्त्वाकांक्षा केवळ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये दिसून येत नाहीत, तर त्या प्रत्यक्षात बांधल्या गेलेल्या रस्त्यांत, वीजवाहिन्यांमध्ये आणि बंदरांमध्ये प्रतिबिंबित होतात, जे अब्जावधी लोकांचे जीवन सीमांपलीकडे जोडतात.

मूळ लेखक- रामानंद सेनगुप्ता

+ posts
Previous articleपंतप्रधान मोदी संयुक्त कमांड आणि आत्मनिर्भरतेबाबत धोरण निश्चीत करणार
Next articleIndia Holds Firm at LAC as Winter Nears, Despite Diplomatic Thaw with China

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here