Tuesday, March 10, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi इराणचे सर्वोच्च नेते म्हणून मोजतबा खामेनी यांची नियुक्ती

इराणचे सर्वोच्च नेते म्हणून मोजतबा खामेनी यांची नियुक्ती

0

इराणने सोमवारी आपले सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांची सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती केली. या निर्णयामुळे इराणशी आठवडाभर चाललेल्या अमेरिका-इस्रायल युद्धामुळे तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेल्या असतानाही कट्टरपंथी लोकांचे नियंत्रण अद्यापही कायम असल्याचे दिसून येते.

अली खामेनी यांचे उत्तराधिकारी निवडण्याचे काम सोपवलेल्या 88 धर्मगुरू संघटना तज्ज्ञांच्या असेंब्लीने रविवारी झालेल्या मतदानापूर्वी इराणच्या सुरक्षा दलांमध्ये प्रभाव असलेले आणि त्यांच्या वडिलांच्या नेतृत्वाखालील मोठे व्यावसायिक नेटवर्क असलेल्या मोजतबा यांनाच आपला पाठिंबा असल्याचे सांगितले होते.

इस्लामिक रिपब्लिकमधील राज्याच्या सर्व गोष्टींमध्ये मोजतबा यांचे मत अंतिम मानले जाणार आहे.

मोजतबा यांच्या नियुक्तीमुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रोष ओढवण्याची शक्यता आहे. निवडीमध्ये वॉशिंग्टनचा सहभाग असावा असे मत रविवारीच ट्रम्प यांनी व्यक्त केले होते. “जर त्यांना आमच्याकडून मान्यता मिळाली नाही, तर ते जास्त काळ पदावर टिकणार नाही,” असे त्यांनी एबीसी न्यूजला सांगितले.

घोषणेपूर्वी इस्रायलने ज्याची निवड होईल त्याला लक्ष्य करू अशी धमकी दिली होती.

नवीन सर्वोच्च नेत्याची निवड झाल्यानंतर टाईम्स ऑफ इस्रायलला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी उत्तर देण्यास नकार दिला, फक्त “काय होते ते आपण पाहू,” असे म्हटल्याचे वृत्तपत्राने सांगितले. ट्रम्प यांनी मुलाखतीत असेही म्हटले होते की युद्ध संपवणे हा इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबतचा “परस्पर” निर्णय असेल.

मोजतबाचे वडील, सर्वोच्च नेते अली खामेनी, एका आठवड्यापूर्वी इराणवर करण्यात आलेल्या पहिल्या हल्ल्यांपैकी एकात मारले गेले.

वॉशिंग्टनने रविवारी सौदी अरेबियातील त्यांच्या दूतावासातील आपत्कालीन नसलेल्या कर्मचाऱ्यांना निघून जाण्याचे आदेश दिले, इराणने या प्रदेशातील अमेरिकन सुविधांवर हल्ला केल्यामुळे अमेरिकन राजदूतांच्या संख्येत आता घट झाली आहे.

इराणच्या संयुक्त राष्ट्रांच्या राजदूतानुसार, अमेरिका-इस्रायली हल्ल्यांमध्ये किमान 1 हजार 332 इराणी नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारोजण जखमी झाले आहेत.

तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त

वाढत्या युद्धामुळे तेल व्यापारावर गंभीर परिणाम झाला आहे आणि वाढत्या किमतींमुळे सोमवारी आशियातील शेअर फ्युचर्समध्ये घसरण झाली आहे, कारण आता जीवनखर्च वाढण्याची भीती आहे. युरो आणि येनच्या तुलनेत डॉलरमध्ये मोठी वाढ झाली.

पुरवठा कमी होण्याची आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाच्या वाहतुकीत दीर्घकाळ व्यत्यय येण्याच्या भीतीमुळे सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन क्रूड फ्युचर्समध्ये 20 टकक्यांपेक्षा जास्त वाढ झाली, ज्याने जुलै 2022 नंतरची सर्वोच्च पातळी गाठली. ब्रेंट 17 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 107.73 डॉलरवर पोहोचला, जो गेल्या आठवड्यात आधीच 28टक्के वाढला होता.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleइराणवरील हल्ला खोट्या, अतिरंजित गोष्टींवर आधारितः इराणचे उप परराष्ट्रमंत्री
Next articleसीमापार भ्रष्टाचार रोखण्यासाठी चीनकडून नवीन कायद्याची योजना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here