ओटावा येथील भारताचे उच्चायुक्त आणि टोरंटो तसेच व्हँकुव्हर येथील वाणिज्य दूतावास शक्य ती सर्व मदत पुरवत आहेत आणि हत्यांचा सखोल तपास व्हावा यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत, असे ते म्हणाले.
कॅनडातील भारतीय नागरिकांची सुरक्षितता आणि त्यांचे कल्याण याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. उच्चायुक्त आणि वाणिज्य दूतावास भारतीय नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या नियमितपणे कॅनडाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडतात. द्वेषातून केले जाणारे गुन्हे आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करणारी सूचना जारी केली आहे,” असेही ते म्हणाले.
याशिवाय एमईएने कॅनडियन माध्यमांमधून प्रसारित झालेल्या बातम्याही फेटाळून लावल्या आहेत. जोपर्यंत खलिस्तानी समर्थक व्यक्ती फुटीरतावादी विचारांचा त्याग करत नाहीत तोपर्यंत अशा व्यक्तींना भारत व्हिसा नाकारत आहे असा आरोप या बातम्यांमध्ये करण्यात आला होता.
व्हिसा देणे हा भारताचा सार्वभौम विशेषाधिकार आहे यावर भर देत जैस्वाल म्हणाले, “भारताला बदनाम करण्याच्या कॅनडाच्या माध्यमांच्या चुकीच्या माहितीच्या मोहिमेचे हे आणखी एक उदाहरण आहे.”
‘आमची प्रादेशिक अखंडता कमकुवत करणाऱ्या व्यक्तींना व्हिसा नाकारण्याचा आम्हाला कायदेशीर अधिकार आहे. या विषयावर कॅनडाच्या प्रसारमाध्यमांनी केलेली टिप्पणी म्हणजे भारताच्या सार्वभौम कारभारात परदेशी हस्तक्षेप आहे,” असे ते म्हणाले.
खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा कॅनडा सरकारने आरोप केल्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध पराकोटीचे ताणले गेले आहेत. भारताने हा दावा जोरकसपपणे नाकारला आहे.
ऐश्वर्या पारीख