सुरक्षा तपासणीनंतर ALH लवकरच नौदल, तटरक्षक दलात परतणार

0

भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाची ‘अ‍ॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर’ (ALH) ध्रुव हेलिकॉप्टर, जी गेल्या 8 महिन्यांपासून ग्राउंडेड होती, ती लवकरच सेवेत परतणार आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या हेलिकॉप्टर्सची तांत्रिक तपासणी करत होते, जी आता अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी ‘भारतशक्ती’ला दिली आहे.

या प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “HALने हेलिकॉप्टप्समधील आवश्यक दुरुस्ती उपाययोजना ओळखल्या आहेत आणि एका महिन्याच्या आत दुरुस्तीचे काम सुरू करण्याची त्यांची योजना आहे. सुरुवातीला काही निवडक हेलिकॉप्टर्समध्ये बदल केले जातील आणि त्यांची उड्डाण चाचणी घेतली जाईल, त्यानंतर उर्वरित विमानांना हळूहळू उड्डाणासाठी मंजुरी दिली जाईल.”

5 जानेवारी 2025 रोजी, पोरबंदरजवळ तटरक्षक दलाच्या एका ALH ध्रुव हेलिकॉप्टरचा अपघात झाल्यानंतर, भारतीय नौदल, लष्कर, वायुसेना आणि तटरक्षक दलाच्या सर्व ALH चे उड्डाण थांबवले गेले. HALच्या दोष तपासणीनंतर 1 मे रोजी, लष्कर आणि वायुसेनेच्या विमानांना मंजुरी मिळाली, मात्र नौदल आणि तटरक्षक दलाची हेलिकॉप्टर्स त्यांच्या विशिष्ट सागरी संरचनेमुळे (maritime configuration) जमिनीवरच राहिली.

या सागरी प्रकारातील हेलिकॉप्टर्समध्ये, सागरी वातावरणात कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेक विशेष वैशिष्ट्ये आहेत. यात समुद्रात नियंत्रित लँडिंगसाठी ‘इमर्जन्सी फ्लोटेशन गियर’, जहाजांवरील मजबूत कार्यासाठी ‘रेनफोर्स्ड अंडरकॅरेज’ आणि डेकवरील लँडिंगदरम्यान सुरक्षितता वाढवण्यासाठी ‘वर्धित कॉकपिट व्हिजिबिलिटी’ यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, समुद्रावरील महत्त्वाच्या नेव्हिगेशन आणि सिच्युएशनल अवेअरनेससाठी सागरी-विशिष्ट सेन्सर्स आणि एव्हिओनिक्स यामध्ये आहेत, ज्यामुळे आव्हानात्मक परिस्थितीतही प्रभावी आणि सुरक्षित कार्य सुनिश्चित होते.

सूत्रांनी पुष्टी केली की, HAL ने या श्रेणीतील हेलिकॉप्टर्सची अधिक कठोर तपासणी केली आहे, ज्यामुळे त्यांना परत सेवेत येण्यास जास्त वेळ लागला.

कार्यक्षमतेवर परिणाम

या हेलिकॉप्टर्सना उड्डाणास मनाई असल्यामुळे, तटरक्षक दलाला त्यांच्या जुन्या ‘चेतक’ हेलिकॉप्टर्सवर अवलंबून राहावे लागले. काही प्रकरणांमध्ये नौदल आणि वायुसेनेच्या विमानांनी त्यांना मदत केली. नौदल आणि तटरक्षक दलात ALH ध्रुव हेलिकॉप्टर्सच्या अनुपस्थितीची मोठी उणीव जाणवली, कारण त्यांची श्रेणी, टिकाऊपणा, सुरक्षा वैशिष्ट्ये आणि जुन्या हेलिकॉप्टर्सच्या तुलनेत बहु-उद्देशीय क्षमता (multi-mission capability) खूप जास्त आहे.

भारताच्या सर्व सेवांमध्ये मिळून, एकूण 330 ALH हेलिकॉप्टर्स आहेत. नौदल आणि तटरक्षक दल सागरी संरचित विमानांचा वापर करतात.

तपासणीनंतर ALH ची पहिली तुकडी मंजूर झाली की, उर्वरित हेलिकॉप्टर्सची तपासणी आणि दुरुस्ती टप्प्याटप्प्याने केली जाईल, जेणेकरून ती सुरक्षितपणे सेवेत परतू शकतील.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleGST सुधारणा: संरक्षण आणि स्वदेशी उत्पादनांसाठी केंद्रित कर सवलत
Next articleऑस्ट्रेलियाः स्थलांतरविरोधी रॅलींमधून स्थानिक भारतीय लक्ष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here