भारतीय राज्यघटनेतील कलम 370 आणि 35A रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेची स्थिती लक्षणीयरीत्या सुधारली असताना, पाकिस्तानने मात्र या भागात दहशती कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. या प्रदेशाला अशांत ठेवण्यासाठी पाकिस्तानचे भाडोत्री हस्तक ज्या दहशतवादाच्या घटना घडवत आहेत, त्यावरून पाकिस्तानच्या वाढत्या निराशा आणि हतबलतेचा अंदाज लावता येतो. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी आणि अंतर्गत सुरक्षा मोहिमांमध्ये भारतीय लष्कर आणि इतर सुरक्षा दलांना गुंतवून ठेवण्याच्या एकमेव उद्देशाने पाकिस्तानने प्रदीर्घ काळ छुपे युद्ध सुरू ठेवले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LOC) शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना कमी झाल्या असल्या तरी, दहशतवादी संघटनांना आश्रय देण्याची भूमिका पाकिस्तानने कायम ठेवली आहे. जैश ए मोहम्मद (JeM) आणि लष्कर ए तैयबा (LeT) यासारख्या संघटनांचे नेतृत्व सक्रिय असून आपल्या प्रशिक्षित हस्तकांमार्फत जम्मू आणि काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
LOC नजीक अनेक अशा काही दहशतवादी घटना घडल्या आहेत की ज्याचे धागेदोरे पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनेशी जोडले गेले आहेत.
नियंत्रण रेषेजवळ उत्तर काश्मीरच्या बांदिपोर जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये 5 सप्टेंबर 2020 रोजी पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटाला आव्हान देण्यात आले, तेव्हा त्यांनी आपली पाठीवरची बॅग टाकून पाकिस्तानात पळ काढला. चिनी बनावटीची नॉरिन्को QBZ-95 रायफल आणि गार्मिन जीपीएससह ‘टाइप 54’च्या तीन चिनी पिस्तूले आणि दोन दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या जीपीएसच्या विश्लेषणातून पाकिस्तानच्या गुजरणवाला आणि लाहोर येथून पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरच्या कामरी भागातील बुर्झिल नाला मार्गे भारतात घुसखोरी करण्याचा मार्ग त्यात सेव्ह करून ठेवल्याचे स्पष्ट झाले. अशा प्रकारे प्रथम माहिती अहवाल (FIR क्रमांक 05/20) आणि स्थानिक पोलीस स्थानकातील जनरल डायरीतील नोंदींनुसार जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे उघड झाले. QBZ-95-1 ही पीपल्स लिबरेशन आर्मीची (PLA) अधिकृत रायफल आहे. चिनी बनावटीची QBZ 95 ही रायफल आता पाकिस्तान फ्रंटियर कॉर्प्सचे सैनिक वापरतात.
चिनी कंपनी उत्पादित करत असलेल्या अनेक EMEI Type 97 NSR रायफल्स सुरक्षा दलांनी हस्तगत केल्या आहेत. काही दिवसांनंतर, सुरक्षा दलांनी जी सामग्री जप्ती केली, त्यावर चिनी खुणाही होत्या. जम्मू ते दक्षिण काश्मीरला महिंद्रा बोलेरोमध्ये प्रवास करणाऱ्या दोन संशयित व्यक्तींना अटक करण्यात आली. एक चिनी बनावटीची नॉरिन्को / EMEI Type 97 NSR रायफल, 190 राउंड असलेली चार मॅगझिन, एक AK 47 रायफल, 218 राऊंडसह चार मॅगझिन आणि तीन ग्रेनेड घेऊन जात होते.
नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी सुरूच
नियंत्रण रेषेनजीक जम्मू क्षेत्रातील पूंछ सेक्टरमध्ये 30 ऑगस्ट 2021 रोजी चार पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा मोठा प्रयत्न केला, पण भारतीय लष्कराने तो हाणून पाडला होता. पूंछ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआर क्र. 0215/2021अनुसार लष्कराच्या जवानांनी अतिरेक्यांना शरण येण्याचे आवाहन केले. पण त्यांनी प्रतिसाद न दिल्याने तिथे जोरदार गोळीबार झाला आणि एक दहशतवादी मारला गेला. त्याच्या मृतदेहासह एक एके 47 ताब्यात घेण्यात आली. या यमसदनी पाठवण्यात आलेल्या अतिरेक्याचे नाव मोहम्मद अक्रम असून त्याच्याकडे सापडलेल्या ओळखपत्रावरून तो पाकिस्तानी नागरिक असल्याचे स्पष्ट होते.
(एफआयआर आणि ओळखपत्राचे फोटो)
मागील वर्षाच्या सुरुवातीला, काश्मीर खोऱ्यात कुपवाडा जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये 10 फेब्रुवारी 2021 रोजी भारतात घुसखोरी करण्याचा दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला होता. उरी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआर क्रमांक 15/2021 नुसार, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला, तर दुसरा पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये पळून गेला. ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव सर्फराज मीर असे असून तो मुझफ्फराबाद, पीओजेके येथील मोहाजिर कॅम्पमध्ये वास्तव्यास होता. पाकिस्तान सरकारने जारी केलेले ओळखपत्र त्याच्याकडे सापडले. त्यावरून ही माहिती उघड झाली. पाकिस्तानी सिमकार्ड (SCOM GSM-89410051061124120796) असलेला मोबाइल फोन (IMEI No 354200083661775 आणि 354200088661770), शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा देखील त्याच्याकडील जप्त करण्यात आला आहे. (पुराव्याची छायाचित्रे)
उत्तर काश्मीरच्या माछिल सेक्टरमधील त्याच कुपवाडा जिल्ह्यात अन्य एका घटनेत, 8 नोव्हेंबर 2020 रोजी नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) घुसखोरीच्या प्रयत्नात तीन पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आणि एक पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरच्या दिशेने पळून गेला. घटनास्थळावरून दोन मॅगझिन आणि 60 राउंडसह दोन एके रायफल, दोन मॅगझिन आणि 29 राउंडसह एक पिस्तूल, एक रेडिओ सेट आणि 50,000 रुपये जप्त करण्यात आले. याशिवाय, कुपवाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआर क्रमांक 315/2020 नुसार, नियोजित घुसखोरीचा मार्ग आणि पाकमध्ये बनवलेले खाद्यपदार्थ, एक डायरी खात्मा केलेल्या दहशतवाद्याकडून जप्त करण्यात आली आहे.
हस्तलिखित कागदपत्रांमध्ये घुसखोरीचा मार्ग दिला असून त्यावरून पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधून घुसखोरीची योजना त्यांच्या सूत्रधारांनी आखली होती, हे स्पष्ट होते.
घुसखोरी मार्गाच्या हस्तलिखित चार्टचे तपशील खाली दिले आहेत :
Team BharatShakti
(अनुवाद : मनोज जोशी)