मंगळवारी, तिबेटमधील शिगात्से येथील डिंगरी काउंटीमध्ये 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला. ज्यामुळे इमारतींचे बऱ्यापैकी नुकसान झाले. यासोबतच शेजारील राष्ट्र नेपाळ, भूतान आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले.
सकाळी 9:05 वाजता (0105 GMT) भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किमी (6.2 मैल) खोल होता, चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरने सांगितल्यानुसार, याआधी आलेल्या 6.9 इतक्या तीव्रतेचे हे पुनरावलोकन केले.
या भूकंपामध्ये आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले असून, हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू
शिगात्से, हे तिबेटच्या पवित्र शहरांपैकी एक असून, तिबेटी बौद्ध धर्मातील सर्वात महत्वाच्या व्यक्तींपैकी एक असलेल्या, पंचेन लामा यांचा गड आहे. लामा यांचे आध्यात्मिक अधिकार दलाई लामांनंतर दुसऱ्या सर्वोच्च स्थानावर आहेत.
दरम्यान, ल्हत्से जवळच्या एका शहरातून रेकॉर्ड करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये, भूकंपादरम्यान दुकानांच्या भिंती कोसळलेल्या दिसत आहेत, ज्याचा ढिगारा रस्त्यावर पसरला आहे.
रॉयटर्सने, इमारती, खिडक्या, रस्त्याची रचना आणि सॅटेलाइट व स्ट्रीट व्ह्यू इमेजेसच्या मदतीने भूकंप प्रवण क्षेत्राचे नेमके स्थान निश्चित केले आहे.
स्थानिक सरकारी अधिकारी शेजारील गावांशी संवाद साधून, भूकंपामुळे झालेल्या एकंदर नुकसानीचा आढावा घेत असल्याची माहिती, चीनच्या सरकारी वृत्तसंस्था झिन्हुआने दिली आहे.
भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून, ५ किमी अंताराच्या आसपास सहा गावे आहेत, असे चिनी राज्याचे प्रसारक CCTV ने सांगितले असून, त्यांनी याबाबत अधिक तपशील दिलेले नाहीत.
भूकंपाचे हादरे
नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू येथे, सुमारे 400 किमी (250 मैल) अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यामुळे येथील स्थानिक रहिवासी त्यांच्या घरातून पळून गेले.
तर भूतानची राजधानी थिम्पू आणि नेपाळच्या सीमेवर असलेल्या बिहार व सिक्कीम या भारतीय राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले, जिथे भिंती हादरल्यानं लोकांनी घरातून थेट रस्त्यावर धाव घेतली.
या दोन ठिकाणी आतापर्यंत कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाल्याचे किंवा जीवितहानी झाल्याची माहिती मिळाली नसल्याचे, भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र शिगात्सेमध्ये आलेला 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप, खूप गंभीर नुकसान करणारा ठरला आहे.
नेपाळमधील सोलुखुंबू जिल्ह्याचे, मुख्य जिल्हा अधिकारी अनोज राज घिमिरे म्हणाले, की “आम्हाला भूकंपाचे खूप तीव्र धक्के जाणवले. मात्र आतापर्यंत आम्हाला कोणत्याही जीवित हानीचा अहवाल मिळालेला नाही,” जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी सोलुखुंबू हा जिल्हा वसला आहे.
ते पुढे म्हणाला की, “आम्ही पोलीस आणि इतर सुरक्षा दलांना तसेच स्थानिकांना एकत्र करून नुकसानीची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.”
चीन, नेपाळ आणि उत्तर भारताच्या नैऋत्य भागांमध्ये, वारंवार भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या टक्करेमुळे भूकंपाचे धक्के बसत असतात.
2008 मध्ये, चीनच्या सिचुआन प्रांतात झालेल्या प्रचंड भूकंपात, जवळपास 70 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. तर 2015 मध्ये काठमांडूजवळ 7.8 तीव्रतेचा भूकंपाचा हादरा बसला होता. दुसरीकडे नेपाळच्या आतापर्यंतच्या सर्वात भीषण भूकंपात सुमारे 9 हजार लोकांचा मृत्यू झाला होता आणि हजारो लोक जखमी झाले होते.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)