ट्रम्प भेटीपूर्वी, पुतिन यांचा शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदींसोबत संवाद

0
पुतिन
बुधवार, 23 ऑक्टोबर 2024 रोजी, रशियातील काझान येथे ब्रिक्स शिखर परिषदेच्या पूर्ण सत्रापूर्वीच्या एका समारंभात, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित होते. सौजन्य: अलेक्झांडर झेम्लियानिचेन्को/ रॉयटर्स (फाइल फोटो)

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी चीन, भारत आणि तीन माजी सोव्हिएत राष्ट्रांच्या नेत्यांशी, दूरध्वनीवरून संवाद साधला आणि युक्रेन युद्धासंदर्भात अमेरिका प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेची माहिती दिली.

बुधवारी, पुतिन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दूत- स्टीव्ह विटकॉफ यांची मॉस्कोमध्ये भेट घेतली. त्यानंतर क्रेमलिनने जाहीर केले की, पुतिन आणि ट्रम्प यांच्यातील शिखर परिषद बहुधा पुढच्या आठवड्यात होऊ शकते. मात्र, भेटीचे स्थळ, तारीख किंवा अजेंडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून सुरू असलेल्या, युक्रेन युद्धाचा शेवट करण्यासाठी ट्रम्प यांनी रशियाला अंतिम मुदत दिली होती, जी शुक्रवारी संपणार होती. जर रशियाने शांततेसाठी सहमती दर्शवली नाही, तर मॉस्को आणि रशियन निर्यातीवर अवलंबून असलेल्या देशांवर नवीन निर्बंध लावले जातील, अशी अमेरिकेची सध्याची भूमिका आहे.

चीन आणि भारत हे रशियन तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, यांनी पुतिन यांच्याशी झालेल्या फोन संवादात सांगितले की, “रशिया आणि अमेरिका यांच्यातील संवाद सुरू राहणे आणि द्विपक्षीय संबंध सुधारत युक्रेन संकटावर राजकीय तोडगा निघणे हे चीनला स्वागतार्ह वाटते, असे चायनीज स्टेट ब्रॉडकास्टर CCTV ने सांगितले.”

चीन, हा रशियाच्या पश्चिम देशांसोबतच्या संघर्षातला एक प्रमुख पाठीराखा असून, रशियाचा सर्वात मोठा व्यापार भागीदार देखील आहे. पुतिन सप्टेंबरमध्ये चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत, जिथे द्वितीय महायुद्धाच्या समाप्तीच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा

क्रेमलिननुसार, पुतिन यांनी स्टीव्ह विटकॉफसोबतच्या चर्चेची माहिती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारताच्या रशियन तेल खरेदीवरून नाराजी दर्शवत, भारतीय वस्तूंवर अतिरिक्त 25% शुल्क लावण्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की: “माझे मित्र पुतिन यांच्याशी माझा अतिशय सविस्तर आणि सकारात्मक संवाद झाला. युक्रेनसंदर्भातील ताज्या घडामोडींबाबत माहिती दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानले.”

गुरुवारी पुतिन यांनी, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी चर्चा केली. रामाफोसा यांनी सांगितले की, “या युद्धाचा शेवट करण्यासाठी आणि दीर्घकालीन शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना दक्षिण आफ्रिका पूर्ण पाठिंबा देते.”

गुरुवारी, UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनीही मॉस्कोमध्ये पुतिन यांची भेट घेतली. पुतिन यांनी सूचित केले की, रशिया–अमेरिका शिखर परिषदेचे संभाव्य स्थळ UAE असू शकते.

रशिया, चीन, भारत, दक्षिण आफ्रिका आणि UAE हे सर्व देश BRICS गटाचे सदस्य आहेत. मॉस्को या गटाकडे अमेरिकेच्या राजकीय व आर्थिक वर्चस्वाला पर्याय म्हणून पाहते.

शुक्रवारी, पुतिन यांनी बेलारूसचे अध्यक्ष आणि आपल्या जवळच्या सहयोगी अलेक्झांडर लुकाशेंको, तसेच कझाकस्तान आणि उझबेकिस्तानच्या नेत्यांशीही संवाद साधला, आणि विटकॉफच्या भेटीतील निष्कर्ष शेअर केले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleऑपरेशन सिंदूरमध्ये 6 पाकिस्तानी विमाने, मुख्य तळ उद्ध्वस्त: हवाई दल प्रमुख
Next articleसामरिक जलस्रोत: अरुणाचल प्रदेशातील भारताची धरणांबाबतची समस्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here