सीरियातील आपल्या सर्व लष्करी तळांविषयी Russia चे मौनव्रत

0
लष्करी
(फाइल फोटो) रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि संरक्षण मंत्री शोइगु यांनी 2017 मध्ये सीरियातील लताकिया प्रांतातील हमीमिम हवाई तळाला भेट दिली. (REUTERS)

Syria चे माजी अध्यक्ष बशर अल-असाद यांनी शांततापूर्वक सत्ता हस्तांतरणाचे आदेश दिल्यानंतर, स्वत:चे पद आणि आपला देश सोडला असल्याचे, रशियाने रविवारी सांगतिले आहे. मात्र Bashar al-Assad आता कुठे आहेत तसेच रशियन सैन्याचे तळ सीरियामध्ये कायम राहणार आहे की नाही याविषयी बोलणे त्यंनी टाळले आहे.

रविवारी ८ डिसेंबर रोजी इस्लामी बंडखोरांनी दमास्कसवर ताबा मिळवल्याची मोठी घटना घडली. त्यानंतर लगेचच अल-असद यांना पदच्युत केल्याचे जाहीर करण्यात आले. या दोन्ही घटनांमुळे १३ वर्षांपेक्षा जास्त काळ चालेल्या गृहयुद्धानंतर असद यांच्या शासनाचा अंत झाल्याचे म्हटले जात आहे. असद यांनी रविवारी दमास्कसमधून उड्डाण केल्याची माहिती दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला दिली आहे. मात्र असद यांच्या सध्याच्या ठिकाणाविषयी अद्याप कोणतीच ठोस माहिती नाहीये.

“अध्यक्ष अल-असद आणि सीरियन अरब प्रजासत्ताकच्या भूभागावरील सशस्त्र संघर्षाली सहभागी, यांच्यामध्ये झालेल्या वाटाघाटींनंतर त्यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि शांततापूर्वक सत्ता हस्तांतरित करण्याचा आदेश देऊन देश सोडला,” असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात नमूद केले आहे.

“या वाटाघाटींमध्ये रशियाचा सहभाग नाही”

दरम्यान रशियाने जारी केलेल्या निवेदनात त्यांनी असेही म्हटले आहे की, ‘अल-असद आणि सीरियन संघर्षवाद्यांमध्ये झालेल्या वाटाघाटीत रशिया कुठल्याही प्रकारे सहभागी नाही.’

मॉस्कोमधील असाद यांचा कट्टर पाठीराखा, ज्याला असद यांनी २०१५ मध्ये सोव्हिएत पतन झाल्यापासून मध्यपूर्वेतील सर्वात मोठ्या आक्रमणात मदत करण्यासाठी हस्तक्षेप केला होता, तो विस्तीर्ण प्रदेशात भू-राजकीय वर्चस्व आणि सीरियातील दोन रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण लष्करी तळांसह आपले स्थान वाचवण्यासाठी झटत आहे.

‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनच्या परिस्थितीबाबत तात्काळ चर्चेसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी, रविवारी पत्रकारांसोबत क्रेमलिनने कॉन्फरन्स कॉल आयोजित केला होता. मात्र या कॉलदरम्यान त्यांनी सीरियातील रशियाच्या हस्तक्षेपावर तसेच सिरीमधील त्यांच्या लष्करी सैन्य दलांच्या भविष्याबाबत भाष्य केले नाही’, असेही रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात नमून केल्यानुसार, ‘सीरियामध्ये रशियाच्या दोन लष्करी तुकड्या ‘हाय अलर्ट’ परिस्थिती कंट्रोल करण्याच्या उद्देशातून तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र आता त्यांच्यामध्ये शिथीलता आणली जाऊ शकते.’

रशिया सीरियाच्या लताकिया प्रांतातील हमीमिम हवाई तळ चालवते. यापूर्वी बंडखोरांवर हवाई हल्ले करण्यासाठी रशियाने याच हवाई तळांचा वापर केल्याचे समजते. तिथल्या टार्टौस किनारपट्टीवर रशियाच्या नौदल सुविधाही आहेत. ‘Tartous’ हे रशियाचे एकमेव भूमध्यसागरीय नौदल शस्त्रात्र साठा व पुरवठा केंद्र आहे. मॉस्कोने याआधी आफ्रिकन तसेच बाहेरील अन्य काही लष्करी कंत्राटदारांना उड्डाण करण्यासाठी सीरियातील टार्टौसचा मुख्य तळ म्हणून वापर केला आहे.

त्यामुळे सीरियातील टार्टस सारखे अत्यंत महत्वाचे केंद्र गमावणे हा रशियाच्या मध्य पूर्व आणि भूमध्य सागरी तसेच आफ्रिकेत शक्ती प्रक्षेपित करण्याच्या क्षमतेला एक गंभीर धक्का असेल, असे पाश्चात्य लष्करी विश्लेषक म्हणतात.

 

टीम भारतशक्ती

(रॉयटर्स)

अनुवाद – वेद बर्वे

 

 


 


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here