दुबई एअर शो दरम्यान तेजस लढाऊ विमान कोसळले, पायलटचा मृत्यू

0
शुक्रवारी दुपारी दुबई एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस लढाऊ विमान हवाई प्रदर्शनादरम्यान कोसळले. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला. स्थानिक वेळेनुसार दुपारी 02.10 च्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी हलक्या लढाऊ विमानाचे प्रदर्शन बघण्यासाठी हजारो प्रेक्षक उपस्थित होते.

 

ऑनलाइन प्रसारित झालेल्या प्रत्यक्षदर्शी व्हिडिओंमध्ये विमानाने हाय-स्पीड मॅन्युव्हर दरम्यान नियंत्रण गमावले आणि नंतर ते ग्रँडस्टँड क्षेत्रापासून दूर जाऊन कोसळल्याचे बघायला मिळाले. आपत्कालीन प्रतिसाद पथकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी एअरफील्डवर धुराचे मोठे लोट उठले.  पायलटला वाचवण्याचे प्रयत्न मात्र अयशस्वी झाले.

 

पायलटच्या मृत्यूची IAF कडून पुष्टी, कोर्ट ऑफ एन्क्वायरीची घोषणा

अधिकृत निवेदनात, आयएएफने या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत अपघाताचे कारण शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगितले.

“दुबई एअर शोमध्ये आज हवाई प्रदर्शनादरम्यान IAF तेजस विमानाला अपघात झाला. या अपघातात वैमानिक गंभीर जखमी झाला होता. IAF ला जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख आहे आणि या दुःखाच्या वेळी पायलटच्या कुटुंबासोबत ठामपणे उभे आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ एन्क्वायरी स्थापन केले जात आहे,” असे हवाई दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.

भारतीय स्वदेशी लढाऊ विमानाचा दुर्मिळ अपघात

LCA तेजस विमान सेवेत दाखल झाल्यापासून झालेला हा दुसराच अपघात आहे. यापूर्वी, मार्च 2024 मध्ये, पोखरण फायरिंग रेंजवर भारत शक्ती या त्रि-सेवेच्या प्रमुख लष्करी सरावात सहभागी झाल्यानंतर जैसलमेरजवळ तेजस Mk1 विमान कोसळले होते. त्यावेळी अपघातानंतर, वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडला होता.

तेजस 2016 मध्ये IAF सेवेत दाखल झाले आणि सध्या तेजस Mk1 प्रकारातील दोन स्क्वॉड्रनचा समावेश आहे. आतापर्यंत झालेल्या दोन्ही अपघातांमध्ये सहभागी असलेली दोन्ही विमाने Mk1 फ्लीटच्या सुरुवातीच्या आयओसी आणि अधिक प्रगत एफओसी कॉन्फिगरेशनची होती.

प्रगत Mk-1A विमानांच्या समावेशासाठी जोरदार प्रयत्न सुरू

ही दुर्घटना अशा एका संवेदनशील वेळी घडली आहे, ज्यावेळी भारतीय हवाई दल तेजस Mk-1A विमानाचा समावेश करण्याची तयारी करत आहे – जी एक सुधारित आवृत्ती असून त्यामध्ये प्रगत इलेक्ट्रॉनिक्स, सुधारित देखभालक्षमता आणि विस्तारित शस्त्र क्षमता आहे – फ्रंटलाइन सेवेतील निवृत्त झालेल्या MiG-21 विमानांची जागा घेण्याचा त्यामागचा उद्देश आहे.

तपास सुरू, दुबई एअर शो देखील सुरू

जगातील सर्वात मोठ्या विमान प्रदर्शनांपैकी एक असलेला दुबई एअर शो त्याच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केला गेला होता. 17 नोव्हेंबर रोजी या शोची सुरूवात झाली. पाच दिवसांच्या कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस होता, त्याच दिवशी तेजस विमान कोसळले.

अपघातानंतर आजूबाजूचा परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. चौकशी सुरू होताच अधिक अपडेट्स मिळण्याची अपेक्षा आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleTejas Fighter Jet Crashes During Dubai Air Show, Pilot Dies
Next articleनौदलाची नवोन्मेषाला चालना, स्वावलंबन 4.0 नवीन आव्हाने निर्माण करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here