ट्रम्प प्रशासनाने परराष्ट्र खात्याच्या पुनर्रचनेत 1 हजार 350 कर्मचाऱ्यांना कमी केले

0

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने शुक्रवारी 1 हजार 350 हून अधिक स्थानिक कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्यास सुरुवात केली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन देशाच्या राजनैतिक दलाची अभूतपूर्व पुनर्रचना करण्यासाठी काम करत आहे. टीकाकारांचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे जागतिक स्तरावर आपले हितसंबंध जपण्याची आणि ते पुढे नेण्याची अमेरिकेची क्षमता कमकुवत होऊ शकते.

अमेरिकेत स्थित 1 हजार 107 नागरी सेवा आणि 246 परराष्ट्र सेवा अधिकाऱ्यांवर परिणाम करणारी ही कपात अशा वेळी झाली आहे जेव्हा वॉशिंग्टन जागतिक स्तरावर अनेक संकटांशी झुंजत आहे: युक्रेनमधील रशियाचे युद्ध, जवळजवळ दोन वर्षांपासून सुरू असणारा गाझा संघर्ष आणि इस्रायल तसेच इराणमधील उच्च तणावामुळे मध्य पूर्वेत सुरू असणारा संघर्ष.

‘देशांतर्गत कामकाज सुसंगत करणे’

“विभाग राजनैतिक प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी देशांतर्गत कामकाज सुसंगत करत आहे,” असे कामगारांना पाठवलेल्या अंतर्गत परराष्ट्र विभागाच्या सूचनेत म्हटले आहे. “मुख्य नसलेल्या कार्यांवर, डुप्लिकेटिव्ह किंवा अनावश्यक कार्यालयांवर आणि लक्षणीय कार्यक्षमता आढळू शकणाऱ्या कार्यालयांवर परिणाम करण्यासाठी कर्मचारी संख्या कपात काळजीपूर्वक करण्यात आली आहे,” असे त्यात म्हटले आहे.

अमेरिकेत असलेल्या 18 हजार  कर्मचाऱ्यांपैकी स्वेच्छेने निघून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह, एकूण कर्मचाऱ्यांची कपात सुमारे 3 हजार असेल, असे त्या सूचनेत तसेच परराष्ट्र विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.

ट्रम्प यांनी अमेरिकेचे परराष्ट्र धोरण त्यांच्या “अमेरिका फर्स्ट” अजेंडाशी सुसंगत आहे याची खात्री करण्यासाठी केलेल्या पुनर्रचनेतील हे पहिले पाऊल आहे. माजी राजनैतिक अधिकारी आणि टीकाकारांचे म्हणणे आहे की परराष्ट्र सेवा अधिकाऱ्यांना काढून टाकल्याने चीन आणि रशियासारख्या शत्रूंच्या वाढत्या आक्रमकतेचा सामना करण्याची अमेरिकेची क्षमता धोक्यात आली आहे.

‘सर्वात हास्यास्पद निर्णयांपैकी एक’

“अध्यक्ष ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री रुबियो पुन्हा एकदा अमेरिकेला असुरक्षित बनवत आहेत,” असे व्हर्जिनिया येथील डेमोक्रॅटिक सिनेटर टिम केन यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

“जगभरात चीन आपला राजनैतिक प्रभाव वाढवत आहे आणि परदेशात लष्करी तसेच वाहतूक तळांचे जाळे निर्माण करत आहे, रशिया एका सार्वभौम देशावर वर्षानुवर्षे क्रूर हल्ला करत आहे आणि मध्य पूर्व संकटात सापडत आहे, अशा वेळी घेतले जाऊ शकणारे हे सर्वात हास्यास्पद निर्णय आहेत,” अशी टीका केन यांनी केली आहे.

राज्य विभागाचे डझनभर कर्मचारी वॉशिंग्टनमधील एजन्सी मुख्यालयाच्या लॉबीमध्ये गर्दी करत होते, काढून टाकलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांसाठी अचानक “टाळ्या वाजवत” होते. डझनभर लोक रडत होते, ते त्यांचे सामान बॉक्समध्ये घेऊन मित्र आणि सहकारी कर्मचाऱ्यांना मिठी मारत निरोप देत होते.

बाहेर, डझनभर इतर लोक रांगेत उभे होते आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत होते, घोषणाबाजी करत होते, काहींनी बॅनर धरले होते ज्यावर लिहिले होते, “अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचे आभार.” डेमोक्रॅटिक सिनेटर ख्रिस व्हॅन हॉलेन यांनी देखील या निदर्शनांना हजेरी लावली.

‘ट्रान्झिशन डे आउट प्रोसेसिंग’

कामावरून काढून टाकण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे बॅज, लॅपटॉप, फोन आणि एजन्सीच्या मालकीच्या इतर गोष्टी परत करण्यासाठी इमारतीच्या आत अनेक कार्यालये उभारण्यात आली होती.

कार्यालयांवर “ट्रान्झिशन डे आउट प्रोसेसिंग” असे लिहिलेली पोस्टर्स लावण्यात आली होते. एका काउंटरवर “आउटप्रोसेसिंग सर्व्हिस सेंटर” असे लेबल होते आणि टिश्यूच्या बॉक्सजवळ पाण्याच्या लहान बाटल्या ठेवल्या होत्या. एका कार्यालयाच्या आत कार्डबोर्ड बॉक्स दिसत होते.

शुक्रवारी काढून टाकण्यात आलेल्या कामगारांना पाठवलेल्या आणि रॉयटर्सने पाहिलेल्या  पाच पानांच्या “सेप्टरेशन चेकलिस्ट” मध्ये कर्मचाऱ्यांना असे सांगितले होते की शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता वाजता इमारतीत प्रवेश करण्याचा ॲक्सेस आणि कार्यालयीन ईमेल बंद करण्यात येत आहेत.

20 वर्षांच्या युद्धादरम्यान अमेरिकन सरकारसाठी काम करणाऱ्या अफगाणिस्तानच्या अमेरिकन पुनर्वसनाची देखरेख करणाऱ्या परराष्ट्र विभागाच्या कार्यालयातील अनेक सदस्यांनाही पुनर्रचनेच्या कामाचा भाग म्हणून काढून टाकण्यात आले आहे.

खोलात जाऊन परिस्थिती सुधारणे

ट्रम्प यांनी फेब्रुवारीमध्ये परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांना परराष्ट्र सेवेत सुधारणा करण्याचे आदेश दिले होते जेणेकरून रिपब्लिकन अध्यक्षांचे परराष्ट्र धोरण “विश्वासूपणे” अंमलात आणले जाईल. त्यांनी वारंवार वचन दिले आहे की ते ज्यांना विश्वासघातकी मानतात अशा नोकरशहांना काढून टाकून “खोलात जाऊन परिस्थिती स्थिती सुधारण्याचे” आश्वासन दिले आहे.

ट्रम्प यांनी संघीय नोकरशाही कमी करणे तसेच करदात्यांच्या पैशाचा व्यर्थ खर्च कमी करण्यासाठी केलेल्या अभूतपूर्व प्रयत्नांचा हा एक भाग आहे. त्यांच्या प्रशासनाने यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल एड, वॉशिंग्टनची प्रमुख मदत शाखा जी जगभरात अब्जावधी डॉलर्सची मदत वितरित करते, ती बरखास्त केली आणि ती परराष्ट्र खात्याच्या अंतर्गत आणली.

रुबियो यांचे व्हिजन

रुबियो यांनी एप्रिलमध्ये परराष्ट्र खात्यात फेरबदल करण्याच्या योजना जाहीर केल्या, असे म्हटले की सध्याचे स्वरूप असलेले विभाग “फुगलेले, नोकरशाही”ने भरलेले आहेत आणि “महासत्ता स्पर्धेच्या या नवीन युगात” त्याचे ध्येय पूर्ण करण्यास सक्षम नाही.

त्यांनी अशी विभागाच्या रचनेची अशी  कल्पना केली जी त्यांच्या मते प्रादेशिक ब्युरो आणि दूतावासांना शक्ती प्रदान करेल आणि अमेरिकेच्या मुख्य हितांशी न जुळणारे कार्यक्रम आणि कार्यालये रद्दबातल करेल.

त्या व्हिजनमध्ये नागरी सुरक्षा, लोकशाही आणि मानवी हक्कांसाठी उच्च अधिकाऱ्यांची भूमिका काढून टाकली जाईल आणि जगभरातील युद्ध गुन्हे आणि संघर्षांवर लक्ष ठेवणारी काही कार्यालये बंद केली जातील.

पुनर्रचना मोठ्या प्रमाणात 1 जुलैपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा होती परंतु चालू खटल्यांमुळे ते नियोजनानुसार पूर्ण झाले नाही, कारण परराष्ट्र खात्याने मोठ्या प्रमाणात नोकर कपात करण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या प्रयत्नावर अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याची वाट पाहिली.

मंगळवारी, न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाला नोकर कपात आणि असंख्य एजन्सींमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्याचा मार्ग मोकळा केला. तेव्हापासून, व्हाईट हाऊस कौन्सिल ऑफिस आणि ऑफिस ऑफ कार्मिक मॅनेजमेंट त्यांच्या योजना कायद्याचे पालन करत आहेत की नाही  याची खात्री करण्यासाठी संघीय एजन्सींशी समन्वय साधत आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)
11 जुलै 2025 रोजी वॉशिंग्टन, डी. सी., यू. एस. येथे निरोप समारंभादरम्यान, अमेरिकी परराष्ट्र खात्याची एक कर्मचारी वैयक्तिक सामानाची पेटी घेऊन जाताना. (रॉयटर्स/एनाबेल गॉर्डन)

+ posts
Previous articleSchool of Artillery: Training Gunners to Destroy Enemy
Next articleरशियन हल्ल्याचा खार्किवच्या प्रसूती रुग्णालयाला तडाखा, रुग्णांची पळापळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here