अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबतचा व्यापार करार यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.या महिन्याच्या सुरुवातीला, ट्रम्प यांनी सांगितले की ते आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग प्रतिनिधींच्या माध्यमातून संवाद साधत आहेत त्यामुळे आम्ही एकत्र येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी आपले नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत, असे ट्रम्प म्हणाले.
आमच्या आधीपासून चर्चा सुरू आहोत. आम्ही त्यांच्या प्रतिनिधींमार्फत चर्चा करत आलो आहोत,” असे ट्रम्प यांनी टॉक शो होस्ट ह्यू हेविट यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
विविध मुद्यांवर चर्चा
पदभार स्वीकारल्यापासून ट्रम्प यांनी चिनी आयातीवरील 10 टक्के दंडात्मक शुल्काबद्दल भाष्य केले आहे. ते म्हणतात की फेंटॅनिल चीनमधून मेक्सिको आणि कॅनडामार्गे अमेरिकेत पाठवले जात आहे.
मात्र, त्यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्वरित जकात शुल्क लादलेले नाही. ट्रम्प यांनी युरोपियन युनियन, मेक्सिको आणि कॅनडाकडून येणाऱ्या मालावरही जकात शुल्क लावण्याची धमकी दिली आहे.
मैत्रीपूर्ण संवाद
योग्य व्यापार पद्धतींबाबत चीनशी करार करता येईल का, असे विचारले असता ट्रम्प यांनी मुलाखतीत सांगितले की, मी ते करू शकतो. तसं झालं तर चीनविरुद्ध आपण जकात करांचा वापर करणार नाही असं ट्रम्प म्हणाले. मात्र करांमध्ये “प्रचंड शक्ती” असल्याचेही त्यांनी म्हटले.
“परंतु चीनविरुद्ध आमची एक खूप मोठी शक्ती आहे, आणि ती म्हणजे शुल्क, आणि त्यांना ते नको आहेत, आणि मलाही ते वापरण्याची गरज वाटत नाही, परंतु ती चीनविरुद्ध प्रचंड शक्ती आहे,” असे ट्रम्प पुढे म्हणाले.
अनेक मुद्द्यांवर मतभेद
टीम स्ट्रॅटन्यूज