L&TAdani DefenceSolar GroupGeneral Atomics MQ-9B SkyGuardian – Whatever the Mission, MQ-9B Delivers
Thursday, November 5, 2026
Solar
General Atomics MQ-9B SkyGuardian – Whatever the Mission, MQ-9B Delivers
Home Bharat Shakti Marathi शींबरोबरच्या चर्चेनंतर चीनशी व्यापार करार होणार – ट्रम्प आशावादी

शींबरोबरच्या चर्चेनंतर चीनशी व्यापार करार होणार – ट्रम्प आशावादी

0
व्यापार करार
29 जून 2019 रोजी जपानमधील ओसाका येथे झालेल्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या सुरुवातीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. (रॉयटर्स/केविन लामार्क/फाईल फोटो)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबतचा व्यापार करार यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.या महिन्याच्या सुरुवातीला, ट्रम्प यांनी सांगितले की ते आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग प्रतिनिधींच्या माध्यमातून संवाद साधत आहेत  त्यामुळे आम्ही एकत्र येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी आपले नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत, असे ट्रम्प म्हणाले.

आमच्या आधीपासून चर्चा सुरू आहोत. आम्ही त्यांच्या प्रतिनिधींमार्फत चर्चा करत आलो आहोत,” असे ट्रम्प यांनी टॉक शो होस्ट ह्यू हेविट यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

विविध मुद्यांवर चर्चा

जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या नेत्यांनी सोमवारी ट्रम्प यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी दूरध्वनीवरून टिकटॉक, व्यापार आणि तैवान यासारख्या मुद्यांवर चर्चा केली.

पदभार स्वीकारल्यापासून ट्रम्प यांनी चिनी आयातीवरील 10 टक्के दंडात्मक शुल्काबद्दल भाष्य केले आहे.  ते म्हणतात की फेंटॅनिल चीनमधून मेक्सिको आणि कॅनडामार्गे अमेरिकेत पाठवले जात आहे.

मात्र, त्यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्वरित जकात शुल्क लादलेले नाही. ट्रम्प यांनी युरोपियन युनियन, मेक्सिको आणि कॅनडाकडून येणाऱ्या मालावरही जकात शुल्क लावण्याची धमकी दिली आहे.

मैत्रीपूर्ण संवाद

गुरुवारी संध्याकाळी प्रसारित झालेल्या फॉक्स न्यूजवरील मुलाखतीत शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या संभाषणाबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले, “छान झाले. ते एक चांगले, मैत्रीपूर्ण संभाषण होते.”

योग्य व्यापार पद्धतींबाबत चीनशी करार करता येईल का, असे विचारले असता ट्रम्प यांनी मुलाखतीत सांगितले की, मी ते करू शकतो. तसं झालं तर चीनविरुद्ध आपण जकात करांचा वापर करणार नाही असं ट्रम्प म्हणाले. मात्र  करांमध्ये “प्रचंड शक्ती” असल्याचेही त्यांनी म्हटले.

“परंतु चीनविरुद्ध आमची एक खूप मोठी शक्ती आहे, आणि ती म्हणजे शुल्क, आणि त्यांना ते नको आहेत, आणि मलाही ते वापरण्याची गरज वाटत नाही, परंतु ती चीनविरुद्ध प्रचंड शक्ती आहे,” असे ट्रम्प पुढे म्हणाले.

अनेक मुद्द्यांवर मतभेद

अमेरिका आणि चीनमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. यामध्ये तांत्रिक आणि लष्करी तंत्रज्ञानाला गती देणे, कटुता निर्माण करणारे व्यापार विवाद आणि प्रसिद्ध सोशल मीडिया ॲप टिकटॉकच्या मालकीबाबत अमेरिकेला वाटणारी चिंता यांचा समावेश आहे, ज्याची मूळ चिनी कंपनी बाईटडान्स आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज

 

+ posts
Previous articleRussia Rejects Plan To Deploy NATO Troops To Ukraine As Peace Keepers
Next articleSweden Warns Of Hybrid Warfare Threats From Russia, China