धोरणात्मक मतभेदांमुळे ट्रम्प, G20 शिखर परिषदेला गैरहजर राहण्याची शक्यता

0

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी मंगळवारी सांगितले की: “नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या G20 शिखर परिषदेला ते उपस्थित राहू शकणार नाहीत.” त्या देशाच्या धोरणांबद्दल असलेल्या असंतोषामुळे ट्रम्प स्वत:च्या जागी प्रतिनिधींना पाठवू शकतात, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

“मला वाटते, मी G20 संम्मेलनाकरिता अन्य कुणाला तरी पाठवेन, कारण माझे दक्षिण आफ्रिकेसोबत बरेच मतभेद आहेत. त्यांची काही धोरणे अतिशय चुकीची आहेत, जी मला पटत नाहीत” असे ट्रम्प यांनी एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेच्या देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणांवर टीका केली आहे, ज्यामध्ये जमीन धोरणापासून ते गाझामधील युद्धासंदर्भात इस्रायलविरोधातील नरसंहाराच्या आरोपांपर्यंतचा समावेश आहे, जो अमेरिकेचा सहयोगी देश आहे.

फेब्रुवारीमध्ये, ट्रम्प यांनी एक कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करून दक्षिण आफ्रिकेला मिळणारी अमेरिकेची आर्थिक मदत स्थगित केली. तर मे महिन्यात, ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी श्वेत वर्णभेद आणि जमिनीच्या जप्तीबाबत चुकीचे आरोप करत वाद घातला.

या वर्षाच्या सुरुवातीला, परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी देखील दक्षिण आफ्रिकेतील G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. दक्षिण आफ्रिका, डिसेंबर 2024 ते नोव्हेंबर 2025 दरम्यान होणाऱ्या G20 परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहे.

तणावपूर्ण संबंध

डोनाल्ड ट्रम्प आणि माजी राष्ट्राअध्यक्ष जो बायडन, यांच्या काळात वॉशिंग्टनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दक्षिण आफ्रिकेने इस्रायलविरोधात नरसंहाराचे आरोप करत दाखल केलेल्या खटल्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

इस्रायलच्या आक्रमणात आजवर 10 हजार लोक ठार झाले आहेत, तिथे उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे, गाझामधील संपूर्ण लोकसंख्या देशांतर्गत विस्थापित झाली आहे, तसेच आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात युद्धगुन्ह्यांचे आरोप झाले आहेत. इस्रायलने हे आरोप फेटाळले असून, ऑक्टोबर 2023 मध्ये हमासने घडवलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर केलेल्या गाझा मोहिमेला आत्मरक्षण म्हटले आहे, ज्यात 1,200 लोक ठार झाले आणि 250 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतले गेले.

दक्षिण आफ्रिकेच्या कृष्णवर्णीय आर्थिक सशक्तीकरण (BEE) धोरणांमुळे वंशभेदाच्या शतकानुशतकांच्या वारशावर उपाय म्हणून, ट्रम्प यांच्या काळात अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतील राजनैतिक संबंधही तणावपूर्ण झाले होते.

रामाफोसा यांनी ट्रम्प यांना G20 शिखर संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे आणि वॉशिंग्टनचे हे दावे फेटाळले आहेत की, दक्षिण आफ्रिका त्याच्या जमीन धोरणाचा वापर करून श्वेत वांशिकांच्या मालकीची जमीन मनमानीने जप्त करणार आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleरशियाच्या अति पूर्वेकडील भागात 8.7 तीव्रतेच्या भूकंपामुळे त्सुनामी
Next articleकंबोडियाने 2 दिवसांत दुसऱ्यांदा युद्धविरामाचा भंग केल्याचा थायलंडचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here