अमेरिका आणि फिलिपीन्स यांच्यातील लष्करी ‘संरक्षणात्मक सराव‘ दीर्घकाळ सुरू असून, लष्कराच्या तांत्रिक सज्जतेला कायम ठेवणे आणि प्रादेशिक सुरक्षा राखणे हा यामागील उद्देश असल्याचे, अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या एक प्रवक्त्याने शनिवारी सांगितले.
चीनच्या संरक्षण मंत्रालयाने, शुक्रवारी मनिलाला U.S. टायफॉन इंटरमीडिएट-रेंजची क्षेपणास्त्रे मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर प्रवक्त्यांनी केलेल्या टिप्पणीच्या विनंतीला ते ईमेलद्वारे प्रतिसाद देत होते.
टायफॉन लाँचर्स, हे एशियामध्ये जहाज-विरोधी शस्त्रास्त्र संचित करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नाचा एक भाग आहे, जे हजारो किलोमीटर अंतरापर्यंत बहुउद्देशीय क्षेपणास्त्रे डागू शकतात.
फिलीपिन्समध्ये यूएस क्षेपणास्त्र क्षमतेची तात्पुरती तैनाती ही वाढत्या धोक्यांना प्रतिसाद आहे, ज्याचा उद्देश सैन्याची तयारी राखणे आणि सर्वांसाठी प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरता राखणे आहे, असे प्रवक्त्याने सांगितले.
“या अमेरिकन प्रणाली,पारंपारि पद्धतीने शत्रास्त्र तयार करण्यासाठी डिझाइन केल्या असून, अणु पेलोड्स वापरण्यासाठी मात्र त्या सक्षम नाहीत,” अशी माहिती प्रवक्त्यांनी दिली.
बेईजिंगने 3,000 किलोमीटर किंवा 5,000 किलोमीटर पर्यंत पोहोचणारे बॅलिस्टिक मध्यम आणि इंटर्मिडिएट-रेंज मिसाइल्स तैनात केले आहेत, ज्यात आण्विक आणि पारंपरिक वापरासाठी द्वंद्व-क्षमता असलेली मिसाइल्स आहेत आणि असे अधिक प्रणाली विकसित आणि तैनात करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रवक्त्यांनी सांगितले.
चीनच्या संरक्षण मंत्रालयाने फिलिपीन्सवर मिसाइल प्रणाली सादर केल्याबद्दल वचनभंग केल्याचा आरोप केला आहे, ज्याला ते “स्ट्रॅटेजिक आक्रमक शस्त्र” म्हणतात.
फिलिपीन्सने सांगितले की, टायफॉन मिसाइल प्रणाली ही केवळ संक्षणासाठी आहे आणि दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्राने ती मागे घेण्याचे कधीच वचन दिले नव्हते.
लाँचर्समध्ये असलेल्या ‘टोमाहॉक क्रूझ मिसाइल्स’ चीन किंवा रशियातील लक्ष्य गाठू शकतात, तर त्यात असलेले SM-6 मिसाइल्स, 200 किलोमीटर दूरचे हवाई किंवा समुद्री लक्ष्य गाठू शकतात.
दक्षिण चीन समुद्रावर मलिना आणि बीजिंग यांच्यात वाढलेल्या तणावादरम्यान, फिलीपिन्सला भारताकडून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचा निर्यात प्रकार मिळाला आहे. ज्याअंतर्गत जानेवारी 2022 मध्ये तीन अँटी-शिप ब्रह्मोस- कोस्टल बॅटरीसाठी $375 दशलक्ष डॉलर्सच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याशिवाय, फिलीपिन्स, थायलंड, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया यांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यामध्ये स्वारस्य दाखवले आले.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)