चीनसोबतचे संबंध मर्यादित, संतुलित असावेत; अमेरिकन व्यापार दूतांची मागणी

0
चीनसोबतचे

अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीअर यांनी गुरुवारी सांगितले की, “चीनसोबतचा व्यापार हा अधिक संतुलित आणि शक्य तितका मर्यादित असायला हवा. वस्तूंच्या व्यापारात 25% घट होणे हे “योग्य दिशेने” टाकलेले पाऊल आहे, असे त्यांनी नमूद केले.

वॉशिंग्टनमध्ये झालेल्या ‘अमेरिकन ग्रोथ समिट’ या धोरण परिषदेमध्ये ग्रीअर म्हणाले की, “चीनसोबतचे आमचे संबंध अधिक संतुलित असावेत अशी आमची अपेक्षा आहे. हे संबंध शक्य तितके मर्यादित असावेत, जेणेकरून आम्हाला एकमेकांवर इतके अवलंबून राहावे लागणार नाही आणि हा व्यापार गैर-संवेदनशील वस्तूंच्या क्षेत्रांमध्ये व्हायला हवा.”

ट्रम्प यांची धोरणे

ग्रीअर म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे, चीनसोबत अधिक संतुलित व्यापार साधण्यात मदत करत आहेत आणि ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील सुरुवातीच्या दिवसांच्या तुलनेत, आताची एकूण परिस्थिती अधिक चांगली आहे.

“चीनसोबत पूर्णपणे आर्थिक संघर्ष व्हावा, असे कुणालाही वाटत नाही आणि आम्ही तसा प्रयत्नही करत नाही आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

धोरणात्मक साधने

ग्रीअर यांनी सांगितले की, “अमेरिकेकडे चीनसोबतच्या संबंधांमध्ये, सॉफ्टवेअरपासून सेमीकंडक्टर्सपर्यंत अनेक साधने आहेत आणि अनेक मित्र राष्ट्रे समन्वित कारवाई करण्यामध्ये स्वारस्य दाखवत आहेत.”

“परंतु सध्याचा निर्णय असा आहे की, आम्हाला या संबंधात स्थिरता हवी आहे,” असे त्यांनी पुढे जोडले. तसेच, अमेरिकेने दुर्मिळ खनिजांसह धोरणात्मक वस्तूंचे औद्योगिक उत्पादन वाढवणे देखील आवश्यक असल्याचे, त्यांनी नमूद केले.

“चीनसोबतचे संबंध आता स्थिर आहेत, परंतु वॉशिंग्टन परिस्थितीवर नियमीतपणे लक्ष ठेवून आहे,” असेही त्यांनी सांगितले.

ग्रीअर यांची टिप्पणी, अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी दिलेल्या वक्तव्याच्या एका दिवसानंतर आली आहे. बेसेंट यांनी म्हटले होते की, “चीन अमेरिकेसोबतच्या व्यापार करारातील आपल्या वचनबद्धता पूर्ण करण्यास तयार आहे, ज्यात 12 दशलक्ष मेट्रिक टन सोयाबीनच्या खरेदीचा समावेश असून, ही प्रक्रिया फेब्रुवारी 2026 च्या अखेरीस पूर्ण होईल.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleचीनच्या PLA ने हिमालयात भारताच्या कोल्ड स्टार्ट धोरणाचे अनुकरण केले
Next articleपुतिन यांची भारताला अखंड इंधन पुरवठ्याची ग्वाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here