कॅनडात काही प्रांतांमध्ये दावा न केलेले मृतदेहांची संख्या वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने यात वाढ होत आहे.
नातेवाईकांच्या मते अंत्यसंस्कारांचा वाढता खर्च हे यामागचे मुख्य कारण आहे.
प्रांताचे मुख्य कोरोनर डर्क ह्यूयर यांच्या म्हणण्यानुसार, ऑन्टारियोमध्ये दावा न केलेल्या मृतदेहांची संख्या 2013 मध्ये 242 होती. 2023 मध्ये 1हजार 183 वर पोहोचली.
क्यूबेकमध्ये 2013 मधील 66 दावा न केलेले 66 मृतदेह होते.
2023 मध्ये ती संख्या 183 इतकी झाली. अल्बर्टा येथे ज्यांच्या नातेवाईकांचा अद्याप माग लागलेला नाही अशा मृतदेहांची संख्या 2016 मधील 80 होती. तर 2023 मध्ये ती 200 झाली.
ह्यूयर म्हणाले की, अशा हक्क नसलेल्या मृतदेहांची वाढलेली संख्या पाहून प्रचंड त्रास होतो.
“अनेक नागरिक असेही आहेत ज्यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर त्यांचे कुटुंबीय,मित्र किंवा इतर कोणी पुढील सूचना किंवा इतर गोष्टींसाठी पुढाकार घ्यायला आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील.”
या घटनेमुळे एका प्रांताने मृतदेहांचे जतन करण्यासाठी नवीन स्टोअरेज सुविधा उभारली आहे. याशिवाय स्मारक निधी उभारणीच्या मागणीतही वाढ झाली आहे.
दावा न केलेल्या मृतदेहांच्या वाढत्या संख्येमागे अंत्यसंस्काराच्या खर्चात झालेली भरमसाठ वाढ हा एक मोठा घटक आहे. फ्यूनरल सर्व्हिसेस असोसिएशन ऑफ कॅनडाचे अध्यक्ष जेफ वेफर म्हणाले की, 1998 मध्ये अंत्यसंस्कारासाठी सुमारे 1हजार 800 कॅनेडियन डॉलर्स ते 8 हजार कॅनेडियन डॉलर्सपर्यंत खर्च होत असे. आता त्यासाठी 2हजार कॅनेडियन डॉलर्स ते 12 हजार कॅनेडियन डॉलर्स एवढा खर्च होऊ शकतो.
वकिलांच्या मते अंत्यविधीसाठी मिळणारे सरकारी अनुदान अंत्यसंस्काराच्या वाढत्या खर्चाशी जुळवून घेण्यात अपयशी ठरले आहे. फेडरल सरकारने 2 हजार 500 कॅनेडियन डॉलर्स इतक्या टॉप-अपची घोषणा केली. हे कॅनडाच्या पेन्शन योजनेतील 2 हजार 500 कॅनेडियन डॉलर्स मृत्यू लाभाव्यतिरिक्त आहे. एप्रिलच्या अर्थसंकल्पात याची तरतूद करण्यात आली.
अश्विन अहमद
(रॉयटर्स)