2 लाखांहून अधिक वाचकांनी वॉशिंग्टन पोस्टची डिजिटल सदस्यता रद्द केल्याच्या वृत्तानंतर अमेरिकन अध्यक्षपदाच्या उमेदवाराला समर्थन न देण्याच्या वृत्तपत्राच्या निर्णयाबाबत मालक जेफ बेझोस यांनी खुलासा केला आहे.
काय होता निर्णय?
नॅशनल पब्लिक रेडिओच्या वृत्तानुसार वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे समर्थन न करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाविरोधात अनेक वाचकांनी वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर आपली मते मांडली आणि Amazon.com तसेच रॉकेट कंपनी ब्लू ओरिजिनचे अब्जाधीश संस्थापक बेजोस यांच्यावर टीका केली.
वॉशिंग्टन पोस्ट आणि इतर वृत्तपत्रांची विश्वासार्हता
सोमवारी उशिरा आपले मत मांडताना, बेझोस म्हणाले की “बहुतेक लोकांचा विश्वास आहे की मीडिया पक्षपाती आहे” त्यामुळे वॉशिंग्टन पोस्ट आणि इतर वर्तमानपत्रांना त्यांची विश्वासार्हता वाढवणे आवश्यक आहे.
कोणत्याही उमेदवाराला या निर्णयाबद्दल माहिती देण्यात आली नव्हती किंवा त्यांच्याशी याबाबत सल्लामसलतही करण्यात आली नव्हती आणि बेजोस म्हणाले की, “या निर्णयामागे कोणतेही परस्पर हितसंबंध नव्हते.”
रिपब्लिकन पक्षाकडून असणारे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि ब्लू ओरिजिनचे सीईओ यांच्यात त्याच दिवशी झालेली बैठक आणि हा निर्णय यांचा कोणताही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
बेझोस यांनी लिहिले, “राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाऱ्यांच्या समर्थनावर निवडणुकीचे प्रमाण निश्चित होत नसते.”
“राष्ट्राध्यक्ष पदासाठी केले जाणारे समर्थन प्रत्यक्षात काय करतात तर ते पक्षपातीपणाची भावना निर्माण करतात. पारतंत्र्याची धारणा. ही धारणा संपवणे हा एक तत्त्वनिष्ठ आणि योग्य निर्णय आहे.
सबस्क्रिप्शन रद्द करणे
वृत्तपत्राच्या या निर्णयामुळे दुपारपर्यंत 25 लाख पेड सर्क्युलेशनच्या सुमारे आठ टक्के वाचकांनी आपले सबस्क्रिप्शन रद्द केले.
यामध्ये छापील वृत्तपत्राच्या सभासदत्वाचा देखील समावेश आहे, असे एनपीआरने म्हटले आहे.
रॉयटर्सने संपर्क साधला असता वॉशिंग्टन पोस्टने या वृत्तावर भाष्य करण्यास नकार दिला. वॉशिंग्टन पोस्टचे प्रकाशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विल्यम लुईस म्हणाले की, वृत्तपत्र 5 नोव्हेंबरच्या निवडणुकीसाठी किंवा भविष्यातील कोणत्याही अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवाराचे समर्थन करणार नाही.
‘राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना समर्थन न देण्याच्या आमच्या निर्णयामुळे आम्ही आमच्या मुळांकडे परत येत आहोत,” असे लुईस यांनी लिहिले. “राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रचारमोहिमेला प्रसिद्धी न देण्याचा वॉशिंग्टन पोस्टचा निर्णय ही एक भयंकर चूक आहे,” असे पोस्टच्या संकेतस्थळावरील एका लेखात जवळपास 20 स्तंभलेखकांनी मत प्रदर्शन केले आहे. “याचा अर्थ आम्हाला आवडणाऱ्या वृत्तपत्राने आपल्या प्राथमिक संपादकीय मूल्यांचा त्याग केला आहे,” असेही या लेखकांनी पुढे म्हटले आहे.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)