EU-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांनी केले मॅक्रॉन यांचे स्वागत

0
EU
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शुक्रवारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमवेत चेंगडूला भेट दिली. ही वैयक्तिक मुत्सद्देगिरी दाखवणारी एक दुर्मिळ भेट असून EU शी असलेल्या त्याच्या व्यापक संबंधांमध्ये पॅरिसवर बीजिंगचे असणारे लक्ष केंद्रित करते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही त्यांच्या 2017 च्या राजकीय दौऱ्यादरम्यान न उचलेले पाऊल, वाढत्या जागतिक व्यापार संघर्षांदरम्यान फ्रान्सशी संबंध मजबूत करण्याच्या चीनच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकते.

 

प्रतीकात्मक मुत्सद्देगिरी, मर्यादित परिणाम

 

जिनपिंग आणि मॅक्रॉन यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांमध्ये उत्साहाचे वातावरण असूनही, विश्लेषकांचे म्हणणे आहे की चीनला दिलेल्या मॅक्रॉन यांच्या या चौथ्या राजकीय भेटीमुळे फारसे ठोस परिणाम पदरी पडलेले नाहीत. देशातील कठीण राजकीय परिस्थितीनंतर जागतिक स्तरावर आपले व्यक्तिमत्त्व बळकट करण्यासाठी मॅक्रॉन यांच्या या दौऱ्याला आतापर्यंत मोठे सहकार्य करार मिळालेले नाहीत आणि कोणतेही मोठे आर्थिक यशही पदरी पडलेले नाही.

गुरुवारी बीजिंगमधील चर्चेत वृद्धांची संख्या, अणुऊर्जा आणि पांडा संवर्धन यासारख्या क्षेत्रात 12 करार झाले, परंतु त्यात कोणत्याही उघड आर्थिक वचनबद्धतेचा उल्लेख केलेला नाही. ब्रुगेल थिंक टँकमधील वरिष्ठ फेलो अलिसिया गार्सिया-हेरेरो म्हणाल्या, “मॅक्रॉन यांना वाटले की शी बरेच काही देऊ शकतील कारण युरोप खरोखरच या आर्थिक सुरक्षा सिद्धांताची तयारी करत आहे.” “पण नकार घंटा पदरी पडली.”

मॅक्रॉन यांनी ऐतिहासिक धरणाच्या ठिकाणी शी यांच्याशी भेट घेण्याआधी  चेंगडूच्या जिनचेंग लेक पार्कमध्ये जॉगिंग करत आपला दिवस सुरू केला. गुंतवणूकदार या भेटीमुळे नवीन व्यापार करार होतील की EU-चीन आर्थिक तणावांवर प्रगती होईल हे पाहण्यासाठी बारकाईने  या बैठकीकडे लक्ष ठेवून होते, परंतु त्याबाबतीत आशा कमीच दिसत होती.

शी जिनपिंग यांनी मोठ्या व्यापार सवलती देणे टाळले

पॅरिसला मोठे प्रोत्साहन देण्याची बीजिंगची क्षमता मर्यादित आहे. शी हे दीर्घकाळ अपेक्षित असलेल्या 500-जेट एअरबस कराराला मान्यता देण्याची शक्यता कमी आहे, कारण यामुळे वॉशिंग्टनसोबत सुरू असलेल्या व्यापार चर्चेत चीनला कमी फायदा होऊ शकतो. तसेच फ्रेंच कॉग्नाक किंवा डुकराचे मांस निर्यातीवरील निर्बंध कमी करण्याची देखील अपेक्षा नाही, कारण यामुळे चिनी बनावटीच्या इलेक्ट्रिक वाहनांवरील (ईव्ही) शुल्काबाबत ब्रुसेल्ससोबतच्या वाटाघाटींमध्ये चीन कमकुवत होईल.

युक्रेनमधील युद्धाबाबत चीनच्या भूमिकेमुळे राजनैतिक प्रगतीची शक्यताही कमी झाली आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की रशियाला बीजिंगचा सतत पाठिंबा मॅक्रॉन यांना युरोपमध्ये परत आणू शकणारे कोणतेही यश मिळवण्यापासून रोखत आहे.

स्पेनचे राजा फेलिप सहावा आणि जर्मन अर्थमंत्री लार्स क्लिंगबेल यांच्या अलीकडील भेटी देखील मर्यादित निकालांसह संपल्या, ज्यामुळे व्यापार वादांदरम्यान वाटाघाटीची शक्ती आपल्याकडे टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनच्या सावध दृष्टिकोनाचे प्रतिबिंब पडते.

मॅक्रॉन यांचा चीन आणि युरोपला संदेश

सिचुआन विद्यापीठात, मॅक्रॉन यांचे विद्यार्थ्यांकडून उत्साही स्वागत झाले आणि त्यानंतर त्यांनी चीनला त्यांच्या जागतिक जबाबदाऱ्यांबाबत विचार करण्याचे आवाहन केले. “आपण अभूतपूर्व विघटनाच्या मार्गावर आहोत,” असे त्यांनी सांगितले आणि दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या जागतिक व्यवस्थेला तडे जात असल्याचा इशारा दिला. त्यांनी पाश्चात्य प्रभाव कमी होत चालल्याचे बीजिंगचे दावे देखील फेटाळून लावले आणि युरोपच्या प्रभाव कमी होत असल्याबद्दलच्या कथा “बनावट” असल्याचे म्हटले.

फूट पाडा आणि जिंका ही बीजिंगची रणनीती

बीजिंग EU मध्ये प्रभाव वाढवण्यासाठी फ्रान्सशी जवळचे संबंध वाढवण्याची स्वप्ने पाहत असले तरी, व्यापक व्यापार करार करण्यास ते अद्याप तयार नाहीत. 2021 पासून EU-चीन गुंतवणूक करारावरील चर्चा थांबली आहे. अर्थात चिनी अधिकाऱ्यांनी वैयक्तिकरित्या सदस्य राष्ट्रांसोबत चर्चा पुन्हा सुरू करण्याचा विचार मांडला असला तरी, युरोपियन कमिशनने अशा कोणत्याही कराराला ठामपणे नकार दिला आहे.

EU मधील मतभेदांमुळे चित्र आणखी गुंतागुंतीचे झाले. फ्रान्सने चिनी ईव्हीवरील ब्रुसेल्सच्या शुल्काला पाठिंबा दिला, तर चीनला होणाऱ्या निर्यातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या जर्मनीने त्यांचा विरोध केला. चिनी धोरणकर्त्यांना अशा फरकांचा फायदा घेण्याची संधी दिसू शकते, बीजिंगच्या एका सल्लागाराने म्हटले आहे की EU ने “त्यांच्या चीन धोरणावर चिंतन करावे आणि त्याचा संबंध रशिया तसेच युक्रेनशी जास्त जवळून जोडू नये.”

सध्या तरी, मॅक्रॉन यांच्या भेटीने प्रतीकात्मकता दाखवली आहे, बीजिंग सहभागाचे स्वागत करत असले तरी, सवलती देण्याची घाई करत नाही याची आठवण करून दिली आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleपुतिन यांची भारताला अखंड इंधन पुरवठ्याची ग्वाही
Next articleMuted Outcomes Mark Modi-Putin Defence Engagement Despite Heavy Optics

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here