भारताच्या झेन टेक्नॉलॉजीजचा नौदल सिम्युलेशन क्षेत्रात महत्वपूर्ण विस्तार

0
झेन टेक्नॉलॉजीजचा
झेन टेक्नॉलॉजीजने अप्लाइड रिसर्च इंटरनॅशनल लिमिटेड (ARI) चे अधिग्रहण करून नौदल सिम्युलेशन क्षेत्रात आपला विस्तार केला.

झेन टेक्नॉलॉजीजने, आपल्या संरक्षण सिम्युलेशन क्षमतांचा धोरणात्मक विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, Applied Research International Private Limited (ARIPL) मधील उर्वरित 24% इक्विटी हिस्सा अधिग्रहित केल्याची घोषणा केली आहे. या व्यवहारामुळे एआरआयपीएल आता झेन टेक्नॉलॉजीजची पूर्ण मालकीची उपकंपनी बनली आहे.

यापूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये, झेन टेक्नॉलॉजीजने 76% बहुसंख्य हिस्सा अधिग्रहित केला होता, ज्यामुळे सागरी सिम्युलेशन तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनी एआरआयपीएलवरील झेनचे नियंत्रण अधिक मजबूत झाले आहे.

मल्टि-डोमेन सिम्युलेशन क्षमता

या अधिग्रहणामुळे, झेन टेक्नॉलॉजीजची संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील स्थान अधिक भक्कम झाले आहे. याआगोदरच भूदल आणि हवाई दलाच्या सिम्युलेशन प्रणालींमध्ये आपले नेतृत्व सिद्ध केलेल्या झेनने, आता नौदल आणि सागरी प्रशिक्षण समाधान क्षेत्रातही आपसा विस्तार केला आहे. यामुळे कंपनीकडे भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेनेसाठी बहुआयामी सिम्युलेशन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची क्षमता निर्माण झाली आहे.

“हे अधिग्रहण झेनसाठी एक धोरणात्मक झेप आहे,” असे झेन टेक्नॉलॉजीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक अटलुरी यांनी सांगितले. ते म्हणाले की, “आम्ही आता एआरआयपीएलच्या सागरी कौशल्याचे एकत्रीकरण करून, भारताच्या सशस्त्र दलांच्या विकसित होत असलेल्या ऑपरेशनल मागण्या पूर्ण करणासाठी एकात्मिक, उच्च-गुणवत्तेची सिम्युलेशन आणि प्रशिक्षण प्रणाली प्रदान करण्यासाठी सज्ज आहोत.”

स्वदेशी विकास आणि निर्यात क्षमता

हे एकत्रीकरण झेन टेक्नॉलॉजीजच्या व्यापक उद्दिष्टाशी सुसंगत आहे, जसे की देशाच्या ‘आत्मनिर्भर भारत’ ध्येयांना पाठिंबा देणाऱ्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाची रचना आणि वितरण करणे. झेन आणि एआरआयपीएल यांच्या संयुक्त क्षमतेमुळे केवळ परदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी होणार नाही, तर सर्व दलांमधील ऑपरेशनल तयारी आणि प्रशिक्षण प्रभावीपणा देखील वाढेल.

देशांतर्गत संरक्षण बाजारपेठेच्या पलीकडेही, झेनने एआरआयपीएलच्या सागरी सिम्युलेशन क्षेत्रातील जागतिक प्रतिष्ठेचा फायदा घेत, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उच्च-मूल्य असलेल्या नौदल करारांना लक्ष्य करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. जमीन, समुद्र आणि हवाई या तिनही क्षेत्रांमध्ये संपूर्ण संरक्षण उपायांचा पुरवठादार बनण्याच्या दिशेने हे एक निर्णायक पाऊल मानले जात आहे.

एकात्मिक प्रशिक्षण इकोसिस्टीम्स

एआरआयपीएलच्या सागरी सिम्युलेशन पोर्टफोलिओचा समावेश झाल्यामुळे, झेन आता सर्व क्षेत्रांमधील वास्तववादी कार्यात्मक वातावरणाचे अनुकरण करणारी, परस्परसंलग्न प्रशिक्षण इकोसिस्टीम्स डिझाइन करू शकेल.

“हा केवळ एक आर्थिक व्यवहार नाही; हे तांत्रिक आणि धोरणात्मक संयुक्तीकरण आहे,” असे अटलुरी म्हणाले. “आम्ही आता नवोपक्रमाला गती देण्यासाठी, नौदलाकरिता नवी उपाययोजना विकसित करण्यासाठी, आणि त्यासोबतच भारतीय तसेच जागतिक संरक्षण बाजारपेठांमध्ये आमची स्पर्धात्मक आघाडी बळकट करण्यासाठी सज्ज आहोत,” असेही त्यांनी नमूद केले.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleChina’s Nuclear Arsenal Expanding Rapidly, Could Rival US and Russia by 2030: SIPRI
Next articleNo ‘Swap Deal’ on Fighter Jets or Missiles During Brazil-India Defence Talks: Brazilian Officials

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here