ती जगातील पहिली व्यक्ती आहे जिची एकूण संपत्ती 439 अब्ज डॉलर्स आहे आणि ती व्यक्ती कोण आहे याचा अंदाज लावण्यासाठी कोणतेही बक्षीस नाहीः कारण एलन मस्क हे एकमेव नाव सगळ्यांनाच माहिती आहे.
ब्लूमबर्गचे म्हणण्यानुसार टेस्लाच्या समभागांच्या किंमतीत झालेली वाढ आणि स्पेसएक्सच्या अलीकडील मूल्यांकनात झालेली वाढ यानंतर हा मैलाचा दगड ओलांडला गेला, ज्याचे मूल्य आता खाजगी समभाग व्यवहारानंतर सुमारे 350 अब्ज डॉलर्स इतके आहे.
ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार SpaceX मधील मस्क यांचा हिस्सा अंदाजे 42 टक्के इतका आहे आणि तोच त्यांच्या आर्थिक प्रगतीतला मुख्य योगदान देणारा घटक आहे.
टेस्लाचे बाजार भांडवल आता 1.315 ट्रिलियन डॉलर्स आहे, ज्याने त्यांच्या संपत्तीला चालना देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हेंचर xAIचे मूल्य देखील या वर्षी दुप्पट म्हणजे 50 अब्ज डॉलर्स झाले आहे.
नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे समर्थक म्हणून मस्क यांची असणारी ओळख त्यांच्या आर्थिक वाढीबरोबरच त्यांच्या राजकीय उदयाशीही जुळणारी आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेच्या निधीमध्ये केवळ एक चतुर्थांश दशलक्ष डॉलर्सचे योगदानच दिले नाही तर ट्रम्प यांचे जोरदार समर्थन करण्यासाठी वैयक्तिकरित्या त्यांच्या रॅलींमध्येही हजेरी लावली.
दोन वर्षांपूर्वी मस्क यांची एकूण संपत्ती 200 अब्ज डॉलरने घसरली होती, परंतु त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे त्यांना यातून बाहेर यायला मदत झाली. ब्लूमबर्गच्या निरीक्षणानुसार टेस्लाच्या समभागात निवडणुकीपूर्वी सुमारे 65 टक्क्यांनी वाढ झाली होती आणि अमेरिकन रस्त्यांवर इलेक्ट्रिक सेल्फ-ड्रायव्हिंग कार्सच्या रोलआउटसाठी डेक साफ होण्याची बाजारपेठांची अपेक्षा होती.
ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटले आहे की, टेस्लाच्या ईव्ही प्रतिस्पर्ध्यांना चालना देण्यास मदत करणाऱ्या टॅक्स क्रेडिट्सचादेखील अंत होऊ शकतो.
बुधवारी स्पेसएक्स आणि त्याच्या गुंतवणूकदारांनी कर्मचारी आणि कंपनीच्या आतील लोकांकडून 125 कोटी डॉलर्स किमतीचे समभाग खरेदी करण्याचा करार केला, ज्यामुळे खाजगी मालकीच्या कंपनीचे मूल्य 350 अब्ज डॉलर्स इतके झाले. या करारामुळे स्पेसएक्स जगातील सर्वात मौल्यवान स्टार्ट-अप बनले आहे.
यात दुधात साखर म्हणजे ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये, ट्रम्प यांनी लिहिले आहे की अमेरिकेमध्ये 1 अब्ज डॉलर्स किंवा त्याहून अधिक गुंतवणूक करणारी कोणतीही व्यक्ती किंवा कंपनी “सर्व पर्यावरणीय मान्यतांसह परंतु कोणत्याही प्रकारे मर्यादित नसलेल्या पूर्णपणे वेगवान गतीने विविध मंजुरी आणि परवाने प्राप्त करेल.”
पार्टीसाठी तयार व्हा!!!
सूर्या गंगाधरन