IAF प्रमुखांची आता LCA तेजस Mk1A ऐवजी Mk2 ला पसंती

0
भारतीय हवाई दलाची झपाट्याने कमी होत चाललेली स्क्वॉड्रन ताकद भरून काढण्यासाठी प्रगत स्वदेशी लढाऊ विमानांचा समावेश करण्याची तातडीची गरज भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी शुक्रवारी अधोरेखित केली. याशिवाय हवाई दल हलक्या लढाऊ विमानांच्या (LCA) Mk1A पेक्षा अधिक सक्षम तेजस Mk2 कडे वळू शकते असे संकेत दिले.

93 व्या हवाई दल दिनापूर्वी त्यांच्या वार्षिक पत्रकार परिषदेत बोलताना, हवाई दल प्रमुखांनी तेजस Mk2 म्हणजे “Mk1Aचा विस्तार” असे संबोधले असले तरी दोघांच्या क्षमतेत मोठा फरक असल्याचे स्पष्ट केले. “हे एक मोठे व्यासपीठ आहे, त्याच पिढीचे आहे, परंतु उत्कृष्ट श्रेणी आणि सहनशक्तीसह अधिकाधिक मोठी शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे,” असे ते म्हणाले, Mk2 “IAF च्या दीर्घकालीन सैन्य संरचनेत चपखल बसते” यावर त्यांनी भर दिला.

त्यांनी असेही म्हटले की जर Mk2 कार्यक्रम पूर्णपणे वेळापत्रकानुसार पुढे सरकत राहिला असता, तर “LCA Mk1A चा पुढील टप्पा Mk2 असू शकला असता, जे अजूनही प्रत्यक्षात येऊ शकते.” त्यांचे हे वक्तव्य म्हणजे भविष्यात ऑर्डर अद्ययावत होऊ शकते याचेच हे संकेत आहेत.

संरक्षण मंत्रालयाने HAL सोबत 97 अतिरिक्त LCA Mk1A लढाऊ विमानांसाठी 62 हजार 370 कोटी रुपयांचा करार केल्यानंतर काही दिवसांतच  हवाई दल प्रमुखांनी असे वक्तव्य केले आहे. 64 टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्री आणि 67 नवीन सुधारणा असलेल्या या विमानांची डिलिव्हरी 2027-28 मध्ये सुरू होणार असून 2034 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

मात्र IAF प्रमुखांनी स्पष्ट केले की उत्पादन गती म्हणजे केवळ प्लॅटफॉर्म उत्क्रांती नाही, हीच खरी अडचण आहे. “हवाई दलाला त्यांच्या जुन्या ताफ्याची जागा घेण्यासाठी दरवर्षी किमान दोन स्क्वॉड्रनची आवश्यकता असते, दरवर्षी सुमारे 30 ते 40 लढाऊ विमानांची आवश्यकता असते,” असे ते म्हणाले. IAF सध्या सुमारे 30 लढाऊ स्क्वॉड्रन चालवते, जे त्यांच्या मंजूर संख्येपेक्षा कमी आहे, कारण जुनी MiG-21, MiG-27 आणि जग्वार विमाने एकामागून एक निवृत्त होत आहेत.

ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) कार्यक्रमाबाबत, एअर चीफ मार्शल सिंग यांनी लक्ष्य गाठण्याबाबत आशावाद व्यक्त केला. “AMCA चे पहिले उड्डाण 2028 च्या आसपास नियोजित आहे, 2035 पर्यंत ते सुरू पूर्णपणे सुरू होईल. जर आपण लक्ष केंद्रित केले तर ही वेळ निश्चितच साध्य करता येईल किंवा आणखी चांगली करता येईल असे मला वाटते. आपल्याला काय हवे आहे आणि ते कुठे उपलब्ध आहे याबाबतचे तंत्रज्ञान आणि माहिती आता आपल्या मनात स्पष्ट आहे,,” असे ते म्हणाले.

‘97 Mk1A ची ऑर्डर Mk2 मध्ये बदला’: माजी भारतीय हवाई दल प्रमुखांचे मोठी झेप घेण्याचे आवाहन

हीच भावना माजी हवाई दल प्रमुख आर.के.एस. भदौरिया यांनीही अलीकडेच भारतशक्तीशी बोलताना व्यक्त केली. भारताने दुसऱ्या मोठ्या Mk1A बॅचकडे जाण्याऐवजी Mk2 मध्ये जलद गतीने संक्रमण करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

“Mark 2 हे अनेक प्रकारे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे,” असे ते म्हणाले. “मला वैयक्तिकरित्या वाटते की 97 विमानांची ऑर्डर Mk-2 मध्ये हलवावी. जर आपण लवकर ऑर्डर दिली तर समांतरपणे उत्पादन सुरू होऊ शकते – यामुळे वेळेत आणि क्षमतेत मोठा फरक पडेल.”

Mk2 अधिक पेलोड, सहनशक्ती आणि प्रगत एव्हिओनिक्स प्रदान करते, ज्यामुळे पुढील दशकात भारताची सामरिक आघाडी टिकवून ठेवण्यासाठी ते योग्य व्यासपीठ बनेल, यावर भर देत, भदौरिया -ज्यांनी हवाई दल प्रमुख म्हणून स्वदेशी लढाऊ पथकामधील प्रमुख निर्णयांना हिरवा कंदील दिला होता- यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :

Mk1, Mk1A आणि Mk2 प्रकारांमध्ये 350 हून अधिक LCA सेवेत येण्याची अपेक्षा असताना, कार्यरत आणि माजी IAF प्रमुख दोघांचेही एकाच धोरणात्मक अत्यावश्यकतेवर एकमत असल्याचे दिसून येते‌. त्यांच्या मते स्क्वॉड्रनमधील अंतर जलदगतीने कमी करण्याची गरज, ज्यामध्ये केवळ संख्येनेच नव्हे तर क्षमतेत विकसित होऊ शकणारे प्लॅटफॉर्म असतील.

रवी शंकर

+ posts
Previous articleतालिबानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा उच्चस्तरीय भारत दौरा; वास्तवाशी होणार सामना
Next articleहमासचा शांततेला पाठिंबा; इस्रायलने हल्ले थांबवावेत- ट्रम्प यांचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here