जागतिक बदलांच्या काळात, भारताने नवी उभारी घेण्याची गरज आहे: जयशंकर

0
जयशंकर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) येथे, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि चिंतन रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या, ‘इंडिया अँड द वर्ल्ड ऑर्डर: प्रिपेरिंग फॉर 2047’ या अरवली शिखर परिषदेला संबोधित  केले. यावेळी जयशंकर यांनी इशारा दिला की: “हे जग सध्या मानवी जीवनाशी निगडीत विविध क्षेत्रांत खोलवर बदल अनुभवत आहे, ज्याचा परिणाम व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि अगदी युद्ध क्षेत्रावरही होत आहे.” अशा खोलवर बदलांचे धोरणात्मक परिणाम निश्चितच खूप महत्त्वाचे आहेत,” असेही ते म्हणाले. “सहकार्याची जागा आता संघर्ष घेत आहे आणि दीर्घकाळ अस्तित्वात असलेल्या जागतिक नियमांचे पुनर्मूल्यांकन होत आहे, आणि काहीवेळा त्यात पूर्णपणे उलथापालथ केली जाते,” असेही त्यांनी सांगितले.

त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले की, “जागतिक उत्पादनापैकी एक तृतीयांश उत्पादन एकाच प्रदेशात स्थलांतरित झाले आहे, ज्यामुळे पुरवठा साखळ्यांमध्ये नवी असुरक्षितता निर्माण झाली आहे.” “आर्थिक व्यवहारांसाठी आता केवळ मूल्य हा एकमेव निर्णायक निकष राहिला नसून, मालकी आणि सुरक्षा देखील तितक्याच महत्त्वाच्या ठरत आहेत. याशिवाय केंद्रित उत्पादनांपासून ते प्रमुख बाजारपेठांवरील अवलंबित्वामुळे धोके अधिक वाढत आहेत,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

“निर्बंध लादणे, मालमत्ता जप्त करणे आणि महत्त्वपूर्ण खनिजांसाठी वाढत असलेली स्पर्धा यासारख्या घटकांमुळे “जागतिक अर्थकारणाचे स्वरूप बदलले आहे, तर शस्त्रास्त्र निर्मिती आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, युद्धे अधिक परिणामकारक आणि धोकादायक झाली आहेत,” असेही ते म्हणाले.

जयशंकर यांनी यावेळी अधोरेखित केले की, भारताने जागतिक अस्थिरतेच्या या काळात सावधगिरीने नव्हे, तर आत्मविश्वासाने नवी उभारी घेण्याची आवश्यकता आहे. “आपल्याला इतर राष्ट्रांसोबतचे आपले हितसंबंध जपत असताना, दुसरी जागतिक स्तरावर सातत्याने प्रगती करत राहावे लागेल, आणि त्यासाठी गरज पडेल तेव्हा काही धोकेही पत्करावे लागतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“भारताच्या प्रगतीला आणि विस्ताराला: मागणी, लोकसंख्याशास्त्र आणि डेटा, या तीन शक्तींच्या आधारे चालना मिळेल,” असे ते म्हणाले. सोबतच, “2047 पर्यंत, जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा देशाला राष्ट्रीय पातळीवर यशस्वी वाटचाल करण्यााबाबत मार्गदर्शन करण्यासाठी, आतापासूनच “कल्पना, नव-संकल्पना आणि कथन तयार करण्याविषयी,” त्यांनी आवाहन केले.

“भारताने बहु-ध्रुवीय वातावरणात काम केले पाहिजे आणि त्याचबरोबर स्वत:चे अढळ स्थान निर्माण करण्यासाठी तयारीही केली पाहिजे,” असे ते म्हणाले.

जेएनयूच्या ‘स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज (SIS)’ मधील, आपल्या विद्यार्थी जीवनातील दिवसांची आठवण करून, जिथे त्यांनी एमफिल आणि पीएचडीचे पूर्ण केली, जयशंकर म्हणाले की, “कदाचित SIS मधील शिक्षणामुळे माझ्यात अनेक स्वभाववैशिष्ट्ये विकसित झाली, ज्यात शैक्षणिक समुदायासोबत जोडले जाण्याची आणि त्याचा उपयोग करण्याची प्रवृत्ती समाविष्ट आहे.”

भारताच्या पुढील जागतिक उडीसाठी, बौद्धिक तयारी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत, त्यांनी विद्वान आणि धोरणकर्त्यांना आवाहन केले की: “भारताच्या पुढील प्रवासाला सुकर आणि यशस्वी करण्यासाठी, आपल्याला नवीन संकल्पना, धोरणात्मक रणनिती आणि संज्ञांची गरज आहे. भारत जागतिक स्तरावर मार्गक्रमण करत असताना, जागतिक घडामोडींमध्ये लोकांची आवड वाढवण्यासाठी आणि त्यासोबत विश्लेषण करण्याची आणि स्पष्टीकरण देण्याची आपली क्षमताही वाढवण्याची आवश्यकता आहे.”

मूळ लेखिका- रेशम

+ posts
Previous articleथ्रस्टवर्क्स डायनेटिक्स भारताचा पुढील रॉकेट इंजिन प्लॅटफॉर्म तयार करणार
Next articleगाझा युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू, व्यापक विनाश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here