अमेरिकेन बनावटीच्या FGM-148 Javelin क्षेपणास्त्राच्या खरेदीला प्रारंभ

0

भारतीय लष्कराने अमेरिकेन बनावटीच्या FGM-148 Javelin अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्रांची खरेदी प्रक्रिया तातडीने सुरू केली आहे, अशी माहिती महासंचालक (पायदळ) लेफ्टनंट जनरल अजय कुमार यांनी बुधवारी दिली. या तातडीच्या खरेदीमध्ये, 12 लाँचर्स आणि 104 क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. पायदळाची रणगाडाविरोधी आणि कमी पल्ल्याच्या हल्ल्याची क्षमता वेगाने वाढवण्याच्या व्यापक प्रयत्नांचा हा एक भाग आहे.

27 ऑक्टोबरला होणाऱ्या पायदळ दिनाच्या (शौर्य दिवस) पार्श्वभूमीवर, पत्रकारांशी बोलताना लेफ्टनंट जनरल कुमार म्हणाले की, “लष्कराच्या अत्यावश्यक गरजांची पूर्ण करण्यासाठी ही खरेदी तातडीने सुरू करण्यात आली आहे.” 

दुसरीकडे नवी दिल्लीने, जॅव्हलिन प्रणाली भारतात सह-उत्पादित करण्याची परवानगी मागण्यासाठी, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडे विनंती पत्र सादर केले आहे. लष्कराला आशा आहे की, या निर्णयामुळे ‘मेक इन इंडिया‘ फ्रेमवर्क अंतर्गत तातडीची कार्यक्षमता आणि दीर्घकालीन स्वदेशीकरण यांचा समन्वय साधता येईल.

लेफ्टनंट जनरल कुमार यांनी माध्यमांना सांगितले की, “कार्यक्षमतेतील उणीव भरून काढण्यासाठी आम्ही या तातडीच्या खरेदीचा पाठपुरावा करत आहोत.”

भारताच्या भू-सीमांवरील वाढत्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, अँटी-टँक शस्त्रसाठ्यांची भरपाई आणि त्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी अनेक महिन्यांच्या अंतर्गत पुनरावलोकनानंतर आणि जलद-ट्रॅक आवश्यकतांनंतर लष्कर महासंचालकांची याची पुष्टी केली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, “जॅव्हलिनची मॅन-पोर्टेबल, फायर-अँड-फॉरगेट क्षमता – जी तोफखान्यांना गोळीबारानंतर लगेचच स्थलांतर करण्यास अनुमती देते, ती पर्वतरागांमधील आणि कठीण भूभागातील ऑपरेशन्ससाठी विशेष फायदेशीर ठरते, कारण या भागात गतिशीलता आणि जलद सहभाग महत्त्वाचा असतो.”

जॅव्हलिनची निवड का?

एफजीएम-148 जॅव्हेलिन क्षेपणास्त्र, रेथिऑन आणि लॉकहीड मार्टिन यांनी एकत्रितपणे विकसित केलेले, जगातील सर्वात प्रगत तिसऱ्या पिढीतील अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्रांपैकी एक आहे, जे खांद्यावरून डागले जाऊ शकते.

या क्षेपणास्त्राचे ‘टॉप-अटॅक’ उड्डाण स्वरूप टार्गेटचा अचूक वेध घेते आणि रणगाड्याच्या कमकुवत चिलखती भागावर थेट हल्ला करते. तसेच, याच्या ‘सॉफ्ट-लाँच’ डिझाइनमुळे बंकर किंवा इमारतींसारख्या बंदिस्त जागेतूनही ते सहजपणे डागले जाऊ शकते.

या प्रणालीमध्ये, एकदा वापरून टाकण्यायोग्य क्षेपणास्त्र नळी तसेच पुन्हा वापरता येण्याजोगे कमांड लाँच युनिट यांचा समावेश आहे, ज्यामुळे जलद निशाणा साधणे आणि लक्ष साधण्यासाठीच्या उपकरणांचा पुन्हा वापर करणे शक्य होते.

जॅव्हलिनचा युद्धभूमीवरील याआधीचा यशस्वी रेकॉर्ड आणि त्याच्या वापरातील सुलभता, यामुळे ते ब्रिगेड आणि कंपनी स्तरावर वापरण्यासाठीची आपली योग्यता सिद्ध करते, विशेषतः जिथे जड प्लॅटफॉर्म अव्यवहार्य आहेत अशा भागात, जसे की अति-उंचीवर आणि कठीण भूभागावर कार्यरत असलेल्या लहान, फिरत्या पायदळ तुकड्यांना, ही मानव-पोर्टेबल आणि उच्च-घातक प्रणाली बळकटी देते.

जलद खरेदी आणि सह-उत्पादनाची बोली

खरेदी यादीत सामाविष्ट असलेला, 12 लाँचर आणि 104 क्षेपणास्त्रांचा हा तात्काळ साठा, भारतीय लष्कराच्या तातडीच्या कार्याक्षम गरजा पूर्ण करण्यासाठी आहे. त्यासोबतच लष्कर दीर्घकालीन सह-उत्पादन करारावर लक्ष केंद्रित करत आहे.

भारताने या क्षेपणास्त्रांच्या सह-उत्पादनामध्ये औपचारिक स्वारस्य दाखवले आहे. हे पाऊल, स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमता विकसित करण्याच्या आणि परदेशी पुरवठादारांवरील दीर्घकालीन अवलंबित्व कमी करण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टांशी साधर्म्य साधणारे आहे.

या जलद खरेदी प्रक्रियेअंतर्गत, अमेरिकेच्या समकक्षांसोबत जुलैमध्ये प्राथमिक संपर्क सुरू झाला होता आणि तेव्हापासून या वाटाघाटी पुढे सरकत आहेत.

धोरणात्मक संदर्भ आणि क्षमता जुळवणी

जॅव्हलिन क्षेपणास्त्राच्या खरेदीची ही घोषणा, पायदळाच्या व्यापक आधुनिकीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे, ज्यामध्ये नवीन कार्बाईन्स, लोइटरिंग दारूगोळा, सुधारित ISR मालमत्ता (गुप्तचर, पाळत आणि टेहळणी) आणि हलक्या, जलद-हल्ला करणाऱ्या युनिट्सची निर्मिती यांचा समावेश आहे.

संरक्षण नियोजकांच्या मते, जॅव्हलिनसारखी खांद्यावरून डागता येणारी गाईडेड अँटी-टँक क्षेपणास्त्रे, ही अवजड रणगाडाविरोधी प्रणालींना पूरक आहेत. ही क्षेपणास्त्रे विकेंद्रीकृत आणि कमी पल्ल्याच्या रणगाडाविरोधी कारवाईसाठी, पोर्टेबल पर्याय (सहज वाहून नेण्याजोगे) उपलब्ध करून देतात.

लेफ्टनंट जनरल कुमार म्हणतात की, “लष्कराच्या क्षमतेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे, अशावेळी आमचा दृष्टिकोन जलद खरेदी आणि स्वदेशीकरण यांचा समतोल साधतो. म्हणजेच, आम्हाला आता ज्याची गरज आहे नेमके तेच खरेदी करायचे आहे आणि त्याचवेळी दुसरीकडे त्या प्रणालीचे देशांतर्गत उत्पादन करण्याची आणि त्यांची देखभाल करण्याची क्षमता विकसित करायची आहे.”

जर सह-उत्पादनाविषयीच्या चर्चा करारामध्ये प्रगती करू शकल्या, तर भारत प्रगत अमेरिकन ATGMs तयार करण्यास किंवा त्याचे परवाना उत्पादन करण्यास अधिकृत असलेल्या मोजक्या राष्ट्रांच्या गटात सामील होईल. सध्या, ही अत्यावश्यक असलेल्या या प्रणाली प्राप्त होताच, तसेच त्यांच्या वापरापूर्वीच्या आवश्यक चाचण्या आणि  प्रशिक्षण पूर्ण होताच, त्या सेवेत रुजू केल्या जातील. लष्कर पुरवठा सुरू झाल्यावर आणि कार्यान्वयन चाचणी पूर्ण झाल्यावर, त्याच्या तैनातीचे वेळापत्रक देईल.

फेब्रुवारीमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वॉशिंग्टन येथे भेट घेतली होती. त्यांनतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात, भारत आणि अमेरिकेने भारताच्या संरक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी जॅव्हलिन रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्रांसाठी नवीन खरेदी आणि सह-उत्पादन व्यवस्था करण्याचा निर्णय जाहीर केला होता. दोन्ही नेत्यांनी भारतात जॅव्हलिन रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्रे आणि स्ट्रायकर पायदळ लढाऊ वाहनांची आगामी खरेदी आणि सह-उत्पादन व्यवस्था देखील जाहीर केली आहे. या क्षेपणास्त्रांच्या संयुक्त उत्पादनाबाबतची चर्चा गेल्यावर्षी, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांच्या भेटीदरम्यानही झाली होती.

मूळ लेखक- रवी शंकर

+ posts
Previous articleकार्बाइन करारासह लष्कर करणार पायदळाचे आधुनिकीकरण
Next articleतिबेटमधील चीनच्या क्षेपणास्त्र उभारणीमुळे भारताची चिंता वाढली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here