पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी, ओमान जग्वार लढाऊ विमाने भारताकडे सोपवणार

0
जग्वार लढाऊ विमाने
जग्वार फायटर जेट

ओमान 20 हून अधिक सेवानिवृत्त जग्वार लढाऊ विमाने, भारताला हस्तांतरित करण्यासाठी सज्ज आहे. यामुळे भारतीय हवाई दलाला (IAF) त्यांच्या जुन्या ताफ्यासाठी आवश्यक असलेले जग्वार विमानाचे सुटे भाग मिळू शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17-18 डिसेंबर रोजी मस्कतच्या दौऱ्यावर जाणार असून, त्याच्या काहीच दिवस आधी घेण्यात आलेला हा निर्णय, दोन्ही देशांमधील वाढत्या संरक्षण सहकार्याला अधोरेखित करतो.

‘सेपेकॅट जग्वार’,जे एक अँग्लो-फ्रेंच डीप-स्ट्राइक प्रकारातील लढाऊ विमान आहे, ते 1979 मध्ये भारतीय हवाई दलात दाखल झाले होते. बहुतेक देशांनी हे विमान त्यांच्या सेवेतून काढून टाकले असले, तरी भारताने आजही त्याचा वापर सुरू ठेवला आहे. जागतिक उत्पादन लाईन्स बंद झाल्यामुळे आणि इतर हवाई दलातून हे फायटर जेट सेवामुक्त झाल्यामुळे, भारतीय हवाई दलाला (IAF) त्याचे इंजिन, एव्हियोनिक्स (विमानचालन इलेक्ट्रॉनिक्स) आणि एअरफ्रेम या घटकांची मोठी आणि वाढती कमतरता जाणवत आहे.

सेवानिवृत्त जग्वारसाठी भारताची जागतिक शोध मोहिम

विमानाच्या सुट्या भागांसाठी, तसेच वापरात नसलेल्या एअरफ्रेम्ससाठी (विमानाचे मुख्य सांगाडे) नवी दिल्लीने ओमान, यूके, फ्रान्स आणि इक्वेडोरसह जग्वार विमानांचा वापर करणाऱ्या विविध देशांशी संपर्क साधला आहे.

  • फ्रान्सने इंजिन आणि विविध सुट्या भागांसह, भारताला 31 एअरफ्रेमचा पुरवठा केला आहे.
  • यूकेने दोन जग्वार T-2 ट्रेनर विमाने आणि 600 हून अधिक सुटे भाग देऊ केले आहेत.
  • ओमान आपली सेवानिवृत्त विमाने, तसेच अनेक अदूर इंजिन्स आणि हजारो सुटे घटक भारताला सुपूर्द करत आहे.
  • इक्वेडोरला देखील संभाव्य हस्तांतरणासाठी संपर्क साधण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, मर्यादित पुरवठा साखळी लक्षात घेता, जग्वारचा ताफा कार्यान्वित ठेवण्यासाठी हा एकमेव व्यवहार्य मार्ग आहे.

भारतासाठी जग्वार विमाने अजूनही महत्त्वाची का आहेत?

चार दशकांहून अधिक जुनी असलेली जग्वार जेट्स, तसेच सुधारित एव्हियोनिक्स आणि शस्त्र प्रणालीसह आधुनिकीकरण केलेली काही जग्वार विमाने, अजूनही प्रत्यक्ष (हल्ला) भूमिकांमध्ये सेवा देत आहेत. तथापि, त्यांना आणखी दहा वर्षे तरी कार्यरत ठेवण्याची IAF ची योजना, सध्या इंजिन्सची कमतरता आणि आधुनिकीकरण कार्यक्रमातील विलंबामुळे मंदावली आहे.

ओमान, तसेच फ्रान्स आणि यूकेकडून मिळणारी विमाने आणि एअरफ्रेम्समुळे, IAF आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ला जग्वारचा ताफा कार्यान्वित ठेवता येईल.

उच्च-स्तरीय चर्चेपूर्वी, योग्यवेळी मिळाली चालना

ओमानकडून होणारे विमानांचे हे आगामी हस्तांतरण, पंतप्रधान मोदींच्या भेटीशी सुसंगत आहे आणि द्विपक्षीय बैठकीदरम्यान यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. भारतीय हवाई दलासाठी, आयात केलेले प्रत्येक सेवानिवृत्त जेट सुट्या भागांचा साठा वाढवते, जे सहा जग्वार ताफे कार्यान्वित ठेवण्यासाठी आवश्यक आहेत, विशेषत: अशावेळी जेव्हा लढाऊ विमानांच्या संख्येत घट होत आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleपंतप्रधान मोदी करणार इथिओपियाचा दौरा; डिजिटल, संरक्षण क्षेत्रांवर भर
Next articleसांस्कृतिक क्रांतीचा नॉस्टाल्जिया झपाट्याने वाढला, नाहीसा झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here