भारताचे ऑपरेशन ‘सागर बंधू’, दुसऱ्या आठवड्यातही अविरतपणे सुरू

0
सागर बंधू
श्रीलंकेला तातडीने, शोध-बचाव आणि HADR सहकार्य पुरवण्यासाठी सुरू केलेल्या 'ऑपरेशन सागर बंधूचा' एक भाग म्हणून, भारतीय नौदलाने चक्रीवादळग्रस्त भागांसाठी 1000 टन आवश्यक मदत साहित्य वाहून नेणारी- INS घरियाल, LCU 54, LCU 51 आणि LCU 57 ही चार अतिरिक्त जहाजे तैनात केली आहेत. यापूर्वी, INS विक्रांत, INS उदयगिरी आणि INS सुकन्या यांच्या साहाय्याने तसेच हेलिकॉप्टर्सद्वारे SAR मदत पोहोचवली गेली.

भारताच्या ऑपरेशन ‘सागर बंधू‘ ने, सोमवारी दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला. अलीकडेच श्रीलकेंत ‘दितवाह’ चक्रीवादळामुळे झालेल्या भयंकर नुकसानीनंतर, भारताने या सहाय्यता मोहिमेअंतर्गत आपत्तीग्रस्त भागात मानवतावादी मदत पोहचवणे सुरू ठेवले आहे. गेल्या काही दशकांतील श्रीलंकेवर ओढवलेले हे सर्वात भीषण नैसर्गिक संकट होते.

28 नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आलेल्या, या मोहिमेच्या माध्यमातून श्रीलंकेपर्यंत समुद्र आणि हवाई मार्गांद्वारे आपत्कालीन मदत पोहोचवणारा, भारत सर्वात पहिला आणि सर्वात मोठा प्रतिसादकर्ता ठरला आहे. हा उपक्रम भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणाचा आणि जलद प्रादेशिक समर्थनासाठीच्या ‘व्हिजन महासागर’ चौकटीचा एक भाग आहे.

श्रीलंकेच्या नेत्यांनी या सहकार्याची सार्वजनिकरित्या दखल घेतली असून, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात हे सहकार्य “जलद”, “सातत्यपूर्ण” आणि “अतिशय महत्वाचे” असल्याचे म्हटले आहे. त्रिंकोमाली येथे, ‘INS घरियाल’ यद्धनौकेने तामिळनाडू मधून 700 टन अन्न, कपडे आणि अत्यावश्यक वस्तू पोहोचवल्या, ज्यांचा श्रीलंकेचे उप-परराष्ट्र मंत्री अरुण हेमचंद्र यांनी स्वीकार केला आणि भारताच्या समर्थनाबद्दल आभार मानले.

“मी भारतीयांचे आणि भारत सरकारचे मनापासून आभार मानतो की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले,” असे हेमचंद्र म्हणाले. “ऑपरेशन सागर बंधू’ पूर्ण वेगाने कार्यरत आहे असून, आम्ही तांत्रिक सहाय्य, मदत साहित्य आणि तात्काळ मदत पुरवल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या चक्रीवादळामुळे 627 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, 2.18 दशलक्ष लोकांना याचा फटका बसला आहे. बडुल्ला, पुट्टलम्, कोलंबो आणि गम्पाहा यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तसेच धार्मिक स्थळे आणि सांस्कृतिक पायाभूत सुविधांचेही गंभीर नुकसान झाले आहे.”

ऑपरेशन ‘सागर बंधूची’ सुरूवात झाल्यापासून, आजपर्यंत आवश्यक मदत साहित्य सातत्याने पोहोचवले जात आहे. पहिल्या तीन दिवसांत 52 टन मदत सामग्री श्रीलंकेत पोहोचली. ‘INS विक्रांत’ आणि ‘INS उदयगिरी’ या दोन्ही युद्धनौकांनी, पहिल्याच दिवशी 9.5 टन शिधा पोहचवली, तर C-130J, IL-76 आणि C-17 यांसारख्या भारतीय हवाई दलाच्या विमानांनी तंबू, वैद्यकीय किट, स्वच्छता साहित्या आणि संपूर्ण फील्ड हॉस्पिटलची वाहतूक केली.

याव्यतिरिक्त, INS L51, INS L51, L54, L57, INS सुकन्या’ आणि ‘INS घडियाल’ या भारतीय नौदलाच्या जहाजांनी तामिळनाडू सरकारने पुरवलेला सुमारे 1 हजार टन इतरा कोरडा शिधाही तिथपर्यंत पोहचता केला.

चक्रीवादळाच्या दुर्घटनेनंतर, भारताने तात्काळ बचाव पथके देखील तैनात केली. दोन NDRF अर्बन सर्च अँड रेस्क्यू युनिट्स, ज्यात K9 टीमचा समावेश होता, ती 24 तासांच्या आत कोलंबोमध्ये दाखल झाली आणि त्यांनी 450 हून अधिक लोकांना मदत केली. ‘INS विक्रांत’ आणि भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सनी लोकांना, ते अडकलेल्या जागांवरून बाहेर काढण्यास मदत केली आहे आणि तसेच दुर्गम भागातील समुदायांपर्यंत कर्मचारी आणि साहित्याचा पुरवठा केला.

वैद्यकीय मदत या ऑपरेशनचा एक महत्त्वाचा भाग आहे. बडुल्ला जिल्ह्यातील भारतीय सैन्य फील्ड हॉस्पिटलने 3,388 रुग्णांवर उपचार केले आहेत आणि अजूनही ते ट्रॉमा केअर, शस्त्रक्रिया आणि अन्य गंभीर वैद्यकीय मदत पुरवत आहेत. ‘भीष्म’ नामक मोबाईल ट्रॉमा युनिट्स देखील तैनात करण्यात आली आहेत, तसेच दुसरीकडे श्रीलंकेच्या वैद्यकीय पथकांना प्रशिक्षणही दिले जात आहे.

इंजिनिअरिंग टीम्स, खराब झालेले वाहतूक मार्ग पुनर्संचयित करण्याचे काम करत आहेत. चार मॉड्यूलर ‘बेली ब्रिज’ पूल प्रणाली, भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानांच्या साहाय्याने तिथे पोहचवल्या असून, महत्त्वाच्या पुरवठा मार्गांपैकी एक असलेल्या किलिनोच्ची येथील A35 मार्गावर त्यापैकी एक पूल बसवण्याचे काम सध्या सुरू आहे.

मदत आणि प्रारंभिक पुनर्प्राप्तीचे प्रयत्न पुढे सरकत असताना, भारताकडून होणारी मदत सुरू ठेवण्यावर दोन्ही देशांच्या सरकारांनी सहमती दर्शवली आहे.अभियांत्रीकी, वैद्यकीय आणि लॉजिस्टिक्स तैनाती, जोपर्यंत श्रीलंकेला त्यांची गरज भासेल तोपर्यंत’ सक्रिय राहतील,’ असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleचकमकींदरम्यान चिनी विमानांना रडारवर लक्ष्य केल्याचे जपानने नाकारले
Next articleप्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावरील व्हिएतनामची पकड मजबूत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here