ऑपरेशन सिंदूरमध्ये 6 पाकिस्तानी विमाने, मुख्य तळ उद्ध्वस्त: हवाई दल प्रमुख

0
ऑपरेशन सिंदूरमध्ये
बेंगळुरू येथे, एल.एम कात्रे व्याख्यानात बोलताना- एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग

ऑपरेशन सिंदूर संदर्भातील पहिल्याच सार्वजनिक निवेदनात, हवाई दलाचे प्रमुख ए.पी.सिंह यांनी शनिवारी जाहीर केले की, “भारतीय वायुसेनेने ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या हवाई युद्ध क्षमतेवर मोठा आघात केला, ज्यामध्ये S-400 Triumf एअर डिफेन्स सिस्टमचा वापरून, भारताकडून पाकिस्तानची 6 लढाऊ विमाने पाडण्यात आली, यामध्ये एक हवाई चेतावणी यंत्रणा (AEW&C) देखील होती. यासोबतच पाकिस्तानमधील महत्त्वाचे हवाई तळ, अचूक हल्ल्यांद्वारे उद्ध्वस्त करण्यात आले.

बेंगळुरूमध्ये, एअर चीफ मार्शल एल. एम. कात्रे यांच्या स्मृती व्याख्यानात बोलताना, सिंह यांनी सांगितले की: “7 मे रोजी, भारतीय वायुसेनेने चिनी बनावटीची 5 फायटर विमाने आणि एक मोठे AEW&C/ELINT विमान- 300 किलोमीटर अंतरावरून पाडले. हा इतिहासातील सर्वात लांब पल्ल्याचा ‘surface-to-air’ मारा असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी हेही स्पष्ट केले की, “जेकोबाबादच्या शाहबाज एअरबेसवर झालेल्या हल्ल्यांत, पार्क केलेल्या अनेक F-16 विमानांचे नुकसान झाले आणि सोबतच एक मोठा हँगरचा अर्धा भाग नष्ट झाला.”

इंडियन एअरफोर्स (IAF) ने, भोलारी एअरबेसवर हल्ला करून Saab AEW&C विमान नष्ट केले, तसेच मुरीद आणि चकलाला या दोन कमांड अँड कंट्रोल हब्सवर अचूक हल्ले केले आणि किमान 6 रडार यंत्रणा नष्ट केल्या.

सिंह म्हणाले की: “आम्ही पाकिस्तानच्या एअरबेसवरील एक हँगरचा अर्धा भाग उडवून दिला, ज्यामध्ये त्यावेळी विमाने असण्याची शक्यता आहे. याशिवाय आम्ही मुरीद आणि चकलाला, अशी किमान दोन कमांड अँड कंट्रोल सेंटर्स आणि विविध प्रकारचे 6 रडार्स नष्ट केले.”

सिंह यांनी स्पष्ट केले की, “ही माहिती विश्वसनीय गुप्तचर माहिती आणि पोस्ट-स्ट्राइक विश्लेषणावर आधारित आहे.
त्यांच्या मते, 5 चिनी बनावटीची फायटर विमाने आणि 1 मोठे विमान जे लांब पल्ल्यावरून पाडले गेले, हा इतिहासातील सर्वात मोठी surface-to-air हल्ला ठरला आहे.”

“ही माहिती, 8 मे रोजी प्रथमच अहवालात नमूद झाली होती, मात्र तांत्रिक मूल्यांकन पूर्ण होईपर्यंत तीन महिने ही माहिती गुप्त ठेवण्यात आली होती,” असे त्यांनी सांगितले. सूत्रांनी पुष्टी केली क,  लांब पल्ल्याने नष्ट केलेले मोठे विमान हे कदाचित Saab Erieye AEW&C किंवा चिनी बनावटीचे ELINT/EW प्लॅटफॉर्म असावे. F-16 विमाने हवाई संघर्षात पाडली गेली नाहीत.

या खुलास्यामुळे हेही अधोरेखित होते की, S-400 प्रणालीची ही IAF कडून पहिली लढाऊ तैनाती होती, आणि तिने शत्रूच्या हद्दीत खोलवर घुसून उच्च-मूल्य हवाई लक्ष्य अचूकपणे नष्ट करण्याची क्षमता सिद्ध केली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई, 6 मे च्या रात्रीपासून ते 10 मे पर्यंत सुरू होती, ज्यामध्ये S-400 संरक्षण प्रणालीच्या सामरिक वापराचे एक महत्त्वपूर्ण पर्व पाहायला मिळाले.

– टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleभारत आणि ब्राझील 2030 पर्यंत, 20 अब्ज डॉलर्सच्या व्यापाराचे लक्ष्य गाठणार
Next articleट्रम्प भेटीपूर्वी, पुतिन यांचा शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदींसोबत संवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here