फेंटानिलच्या समस्येवरील चर्चेसाठी, FBI प्रमुख काश पटेल चीनमध्ये दाखल

0
काश पटेल

अलीकडील अहवालांनुसार, FBI (Federal Bureau of Investigation) चे संचालक काश पटेल, गेल्या आठवड्यात फेंटानिल आणि कायदा अंमलबजावणी संबंधित चिंतांवर चर्चा करण्यासाठी चीनला गेले होते. ही भेट अमेरिका आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांमधील शिखर परिषदेनंतर झाली, ज्यामध्ये दोन्ही नेत्यांनी या विषयांवर झालेल्या त्यांच्या “एकमताचे” कौतुक केले होते.

अहवालात नमूद केले आहे की, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक काश पटेल, शुक्रवारी बीजिंगला पोहोचले आणि एक पूर्ण दिवस तिथे थांबले. त्यानंतर, शनिवारी त्यांनी चिनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली, असे संबंधित सूत्रांनी सांगितले.

अमेरिका-चीन यांच्यात, फेंटानिल आणि व्यापार करार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, गेल्या महिन्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर, फेंटानिलच्या प्रवाहावर दंड म्हणून आकारण्यात आलेले, चिनी वस्तूंवरील टॅरिफ 10% पर्यंत कमी केले.

चर्चेनंतर ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, “जिनपिंग फेंटानिलचा प्रवाह रोखण्यासाठी कठोर करतील. फेंटानिल हे अत्यंत घातक सिंथेटिक ओपिऑइड असून, अमेरिकेत अति-सेवनामुळे मृत्यूंमागे हेच प्रमुख कारण आहे.

अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी सांगितले की, “या मुद्द्यावर झालेल्या ‘एकमताच्या’ तपशीलांवर, दोन्ही देशांच्या नव्या कार्यगटाद्वारे काम केले जाईल.” पटेल यांनी बीजिंग भेटीदरम्यान या नव्या यंत्रणेवर चर्चा केली का, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

या करारामुळे ट्रम्प प्रशासनाच्या धोरणात बदल झाल्याचे संकेत मिळतात. यापूर्वी, चीनने फेंटानिलच्या पुरवठा साखळ्यांवर कारवाई केल्याचे सिद्ध करेपर्यंत दंडात्मक उपाय लागू राहतील, या भूमिकेवर ट्रम्प प्रशासनातील अधिकारी ठाम होते.

चीनची प्रतिक्रिया

चिनी अधिकाऱ्यांनी, फेंटानिल संदर्भातील त्यांच्या भूमिकेता ठामपणे बचाव करत असे सांगितले की, “त्यांनी या औषधाच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या रसायनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापक उपाययोजना आधीच केल्या आहेत, परंतु वॉशिंग्टन आम्हाला “ब्लॅकमेल” करण्यासाठी या मुद्द्याचा वापर करत आहे.”

जिनपिंग आणि ट्रम्प यांच्यातील करार फेंटानिलपुरता मर्यादित नव्हता, तर त्यात चीनने अमेरिकेकडून सोयाबीनची खरेदी पुन्हा सुरू करण्याचाही समावेश होता.

या बदल्यात, बीजिंगने ऑक्टोबरमध्ये जाहीर केलेले ‘दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवरील निर्बंध’ स्थगित करण्यास सहमती दर्शविली. हे खनिजसाठे अनेक आधुनिक तंत्रज्ञानामध्ये अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूजठ
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleचीन-पाकिस्तान पाणबुडी करार: भारताच्या सागरी वर्चस्वाला नवे आव्हान?
Next articleभारतात आश्रय दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत हसीनांची युनूस यांच्यावर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here