गोवा शिपयार्डकडून तटरक्षक दलासाठी दोन वेगवान जहाजे लाँच

0
गोवा
तटरक्षक दलासाठी CGL जलद गती जहाज

‘गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL)‘ ने, 5 जानेवारीला एक नवा माईलस्टोन गाठला आहे. गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी दोन स्वदेशी डिझाइनच्या ‘फास्ट पेट्रोल व्हेसल्स (FPVs)’ लाँच केल्या आहेत. संरक्षण उत्पादन सचिव संजीव कुमार  यांच्या उपस्थिचीतीत, ‘अमूल्य‘ आणि ‘अक्षय‘ नामक या दोन जहाजांचे लाँचिंग पार पडले. यामुळे भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमाअंतर्गत, संरक्षण उत्पादनाने स्वावलंबनाच्या दिशेने एक नवे पाऊल टाकले आहे.

कोस्ट गार्डच्या विशिष्ट ऑपरेशनल गरजा पूर्ण करण्यासाठी, GSL द्वारे इन-हाउस डिझाइन केलेली FPVs ही बहुआयामी जहाजे, म्हणजे सागरी भूमिकांसाठी तयार केलेले अत्याधुनिक प्लॅटफॉर्म आहेत. 52 मीटर लांबी, 8 मीटर रुंदी आणि 320 टन विस्थापनासह ही जहाजे, कोस्ट गार्डच्या ऑपरेशन्ससह ऑफशोअर मालमत्तेचे रक्षण, बेट प्रदेशांचे संरक्षण आणि किनारपट्टीवर पाळत ठेवण्यासाठी अनुकूल आहेत.

संरक्षण उत्पादन सचिव संजीव कुमार यांनी, GSL च्या प्रयत्नांची आणि भारतीय उद्योगासोबतच्या त्यांच्या सहकार्याची प्रशंसा केली. कार्यक्रमादरम्यान बोलताना ते म्हणाले की, ”अमूल्य आणि अक्षय या दोन वेगवान आणि अद्ययावत जहाजांचे लाँचिंग, हे गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या लवचिकतेचे आणि कल्पकतेचे प्रतीक आहे. या जहाजांमध्ये उच्च स्वदेशी सामग्रीचा समावाशे केला आहे या गोष्टीचा अभिमान आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमामध्ये एक नवीन मैलाचा दगड गाठला गेला आहे.”

यावेळी GSL ने देखील, जहाजांच्या प्रगत क्षमतेवर प्रकाश टाकला आणि भारताच्या सागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक जहाजे देण्याच्या  शिपयार्डच्या समर्पणाला अधोरेखित केले. हा यशस्वी उपक्रम भारताच्या वाढत्या जहाजबांधणीचे कौशल्य आणि स्वदेशी बनावटीच्या जहाजांसह देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी GSL ची वचनबद्धता दर्शवतो.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, GSL ने ऑक्टोबर 2024 मध्ये त्याच मालिकेतील दोन जहाजे लाँच केली होती, ज्याने तटरक्षक दलाच्या ऑपरेशनल क्षमतांना बळ देण्यासाठी स्थिर प्रगती दर्शवली होती. GSL ने ऑक्टोबर 2024 मध्ये त्याच मालिकेतील दोन जहाजे लाँच केली होती.


Spread the love
Previous articleग्रेट निकोबार बेट प्रकल्प केंद्राच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत
Next articleभारताच्या Digital Personal Data संरक्षण विधेयकाचा, सखोल आढावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here