![Gaza-ceasefire-2 गाझा](https://bharatshakti.in/wp-content/uploads/2025/02/Gaza-ceasefire-2.jpg)
शनिवारी सोडल्या जाणाऱ्या ओलिसांच्या संख्येबाबत अनिश्चितता आणि मदत पुरवठ्याबाबत मतभेद असूनही गाझा युद्धबंदी करार संपुष्टात येण्याच्या धोका टाळता येऊ शकतो असे संकेत पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने गुरुवारी दिले.
इजिप्त आणि कतर यांच्या मध्यस्थीने आणि अमेरिकेच्या पाठिंब्याने गेल्या महिन्यात शिक्कामोर्तब झालेल्या कराराचे उल्लंघन झाले असल्याचे दोन्ही पक्षांनी केलेल्या आरोपांमुळे या आठवड्यात 42 दिवसांचा युद्धविराम संपुष्टात येणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
हमासला युद्धविरामात स्थिरता हवी
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘धमक्यांची आणि धमकावण्याची भाषा’ वापरल्याचे नाकारले आहे. तर दुसरीकडे गाझा युद्धविराम करार संपुष्टात यावा असे आपल्याला वाटत नसल्याचे हमासने म्हटले आहे. ओलिसांची सुटका न झाल्यास युद्धविराम रद्द होईल अशी धमकी इस्रायलने दिली आहे.
“त्यानुसार, हमासने स्वाक्षरी केल्याप्रमाणे कराराची अंमलबजावणी करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली, ज्यात विशिष्ट कालमर्यादेनुसार कैद्यांच्या देवाणघेवाणीचा समावेश आहे,” असे हमासने एका निवेदनात म्हटले आहे.
हमासचा गाझा प्रमुख खलील अल-हय्या इजिप्शियन सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी कैरोला भेट देत असल्याचे, त्यांनी म्हटले आहे. इजिप्त आणि कतार हे दोन्ही मध्यस्थ “करारातील अडथळे दूर करणे आणि त्यातील दरी दूर करण्यासाठी” प्रयत्न करणार आहेत.
प्रत्युत्तरात, नेतान्याहू यांनी राखीव सैन्याला बोलावण्याचे आदेश दिले असून ओलिस परत न आल्यास जवळजवळ एक महिन्यापासून थांबवण्यात आलेले हल्ले पुन्हा सुरू करण्याची धमकी दिली आहे.
नेतान्याहू यांच्या सुरक्षा मंत्रिमंडळाचे सदस्य असलेले इस्रायली मंत्री अवि डिश्टर यांनी गुरुवारी इस्रायली सार्वजनिक रेडिओला सांगितले की, हमास करारातून बाहेर पडू शकेल यावर त्यांचा विश्वास नाही.
“हा एक करार आहे, त्या करारात जे नमूद केले आहे त्यापेक्षा कमी काहीही देऊ शकणार नाहीत,” असे ते म्हणाले. “हमास काही वेगळं वागू शकेल यावर माझा विश्वास नाही.” इजिप्शियन सुरक्षा सूत्रांनी रॉयटर्सला सांगितले की त्यांना गुरुवारी अवजड बांधकाम उपकरणे आत येण्याची अपेक्षा होती आणि जर तसे झाले तर हमास शनिवारी ओलिसांची सुटका करेल.
हमास – इस्रायलचा स्टॅण्ड ऑफ
इस्रायल आणि हमास यांच्यातील स्टॅण्ड ऑफमुळे त्यांच्यातील संघर्ष पुन्हा सुरू होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या संघर्षामुळे आधीच गाझा उद्ध्वस्त केला आहे आणि मध्य पूर्वेस व्यापक प्रादेशिक युद्धाच्या काठावर उभे केले आहे.
इजिप्त आणि कतारचे अधिकारी तोडगा काढण्यासाठी काम करत आहेत आणि या सगळ्या प्रयत्नांना जवळून बघणाऱ्या एका पॅलेस्टिनी अधिकाऱ्याने सांगितले की दोन्ही बाजूंनी युद्धबंदी आणि पॅलेस्टिनी कैद्यांसाठी ओलिसांची देवाणघेवाण करण्यास सहमती दर्शविली आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)