Honda आणि Nissan कंपन्यांची विलीनीकरण प्रक्रियेसंदर्भात, दोन्ही कंपन्या लवकरच एक करार करू शकतात, ज्यामध्ये विलीनीकरणाच्या सर्व शक्यता आणि नियमांची पुन्हा तपासणी केले जाईल. जून 2025 हे मर्जिंग पूर्ण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
या मर्जिंगमुळे Toyota आणि Volkswagen नंतर, वाहन विक्रीद्वारे जगातील तिसरा सर्वात मोठा ऑटो समूह तयार होईल. कारण पारंपारिक कार उत्पादकांना टेस्ला आणि चिनी प्रतिस्पर्ध्यांकडून वाढत्या आव्हानांचा सामना करावा लागतो.
टोयोटा नंतर जपानची दुसरी सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी, म्हणून Honda चे बाजार मूल्य $40 बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. त्यापाठोपाठ Nissan तिसऱ्या क्रमांकावर असून, कंपनीचे मूल्य सुमारे $10 अब्ज डॉलर्स इतके आहे.
दरम्यान, Honda आणि Nissan या दोन्ही कंपन्यांनी सांगितले आहे की, या विषयाबाबत सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतील.
सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, निसानचे भागीदार असलेले मित्सुबिशी मोटर्सचे प्रमुख, त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत या पत्रकार परिषदेत सामील होतील.
होंडा आणि निसानचे जून 2025 पर्यंत, विलीनीकरणाच्या कराराला अंतिम रूप देण्याचे आणि ऑगस्ट 2026 मध्ये सामायिकरित्या होल्डिंग कंपनी स्थापन करण्याचे, उद्दिष्ट आहे. याचवेळी त्यांचे शेअर्स देखील सूचीबद्ध केले जातील, असे एका सूत्राने सांगितले.
होंडा होल्डिंग कंपनीच्या बोर्डचे बहुतेक सदस्य, हे त्यांच्या लीडरसह नियुक्त केले जातील, असेही ते म्हणाले.
या दोन्ही प्रख्यात जपानी ब्रॅण्डचे विलीनीकरण, हे जागतिक ऑटो उद्योगातील सर्वात मोठा बदल ठरणार आहे. ज्याप्रमाणे 2021 मध्ये Fiat Chrysler Automobiles आणि PSA यांचे विलीनीकरण होऊन Stellantis हा ब्रॅण्ड तयार झाला होता, ज्याचे मूल्य $52 अब्ज डॉलर इतके होते.
मित्सुबिशी मोटर्स या दोघांसोबत एकत्र आल्यास, जपानी समूहाची जागतिक विक्री आठ दशलक्ष चारचाकींहून अधिक पर्यंत पोहोचेल.
सध्या Hyundai आणि Kia, हे दक्षिण कोरियाचे तिसऱ्या क्रमांकाचे समूह आहेत.
होंडा आणि निसान विलीनीकरणासह त्यांची भागीदारी वाढवण्याचे अन्य मार्गही शोधत आहेत, असे रॉयटर्सने गेल्या आठवड्यात दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.
दोन्ही कंपन्यांनी मार्चमध्ये जाहीर केले होते, की ते इलेक्ट्रिफिकेशन आणि सॉफ्टवेअर विकासावर सहकार्य करण्याचा विचार करत आहेत. याबाबत त्यांनी संयुक्त संशोधन करण्याचे ठरवले असून, ऑगस्टमध्ये त्यांनी मित्सुबिशी मोटर्सला या कार्यात समाविष्ट करुन घेतले आहे.
गेल्या महिन्यात, निसानने 9,हजार नोकऱ्या कमी करण्याचा आणि चीन व यू.एस. मधील मुख्य बाजारपेठांमध्ये विक्रीत घसरण झाल्यानंतर, आपल्या जागतिक उत्पादन क्षमतेमध्ये 20% कपात करण्याचा निर्णय जाहीर केला.
होंडानेही चीनमधील विक्री कमी झाल्यामुळे अपेक्षेपेक्षा खराब कमाईचे अहवाल सादर केले आहेत.
दुसऱ्या परदेशी कार उत्पादकांप्रमाणे होंडा आणि निसानने, इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार बनवणाऱ्या आणि गाड्यांमध्ये नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअर पुरवणाऱ्या, चीनमधील BYD आणि इतर स्थानिक ब्रॅण्ड्सच्या उदयानंतर, आपले बाजारातील स्थान गमावले आहे.
जपानमधील फॉरेन कॉरेस्पॉन्डंट्स क्लबसोबत, सोमवारी झालेल्या एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत, निसानचे माजी अध्यक्ष कार्लोस घोस्न यांनी सांगितले की, त्यांना नाही वाटत की होंडा-निसानचे एकत्रीकरण यशस्वी होईल. दोन्ही ऑटो उत्पादक एकमेकांसाठी पूरक नसल्याचे, त्यांचे म्हणणे आहे.
महत्वाचे म्हणजे, घोस्न हे जपानमधून जामीनावर सुटून, लिव्हाननकडे पळून गेल्यामुळे, त्यांना फरार म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि सध्या त्यांचा शोध सुरू आहे. 2018 मध्ये आर्थिक गैरव्यवहारासाठी त्यांना अटक झाली होती. त्या चुकीच्या व्यवहारामुळे निसानला मोठे नुकसान झाले होते.
फ्रेंच ऑटो उत्पादक Renault जो निसानचा सर्वात मोठा भागधारक आहे, तो देखील या करारासाठी उत्सुक असून त्यांच्या जोडणीसाठीचे सर्व निकष तपासले जात असल्याचे, सूत्रांकडून समजले आहे.
तैवानची फॉक्सकॉन कंपनी, जी तिच्या नव्याने सुरू झालेल्या EV कंत्राट उत्पादन व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत आहे, तिनेही याबाबत निसानशी संपर्क साधला होता. मात्र जपानी कंपनीने त्यांचा प्रस्ताव नाकारल्याचे, स्त्रोतांनी रॉयटर्सला सांगितले.
फॉक्सकॉनने Renault सोबत फ्रान्समध्ये बैठक करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठवले होते. मात्र पुढे याबाबतची बोलणी थांबवण्यात आल्याचे, ब्लूमबर्ग न्यूजने शुक्रवारी रिपोर्ट केले.
दरम्यान, सोमवारी नियोजित असलेल्या विलीनीकरणासंबंधीच्या बातम्यांनंतर, होंडाचे शेअर्स 3.8 टक्क्यांनी तर निसानचे शेअर्स 1.6 टक्क्यांनी वाढले. दुसरीकडे मित्सुबिशी मोटर्सचे शेअर्स 5.3 टक्क्यांनी वाढले, तर निक्केईचे शेअर्स 1.2 टक्क्यांनी वाढला.
(रॉयटर्स)