
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘सशस्त्र दलाला चालना देण्याच्या सरकारच्या gender-inclusive वचनबद्धतेचा’ पुनरुच्चार केला. सध्या अतिशय आव्हानात्मक अशी जागतिक सागरी परिक्रमा करत असलेल्या, दोन भारतीय महिला नौदल अधिकाऱ्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. संवादारम्यान, त्यांनी दोन्ही महिला अधिकाऱ्यांच्या धाडसाला आणि जिद्दीला सलाम केला तसेच सशस्त्र दलातील महिलांच्या वाढत्या भूमिकेचे विशेष कौतुक केले, ज्यामुळे अधिक तरुणींना संरक्षण आणि साहसी क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडवण्यास प्रोत्साहन मिळू शकेल.
‘नाविका सागर परिक्रमा II’ (NSP II) मोहिमेचा भाग असलेल्या, लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि रूपा ए, सध्या INSV Tarini या युद्धनौकेतून एका अतिशय आव्हानात्मक जागतिक परिक्रमेतून मार्गक्रमण करत आहेत. राजनाथ सिंह यांनी त्यांच्या प्रवासाचे वर्णन “नारी शक्तीचा दीपस्तंभ” (महिलांची शक्ती) अशा शब्दांत केले, ज्यामध्ये अत्यंत कठीण सागरी मोहिमेचा त्यांचा अढळ दृढनिश्चय आणि संयम त्यांनी अधोरेखित केला.
“कठीण परिस्थितीत हजारो नॉटिकल मैल प्रवास करत असताना, दोन्ही महिला अधिकाऱ्यांची चिकाटी, जिद्द आणि संयमी वर्तन तसेच त्यांनी अत्यंत बारकाईने आणि अभ्यासपूर्वक केलेली परिक्षणे, आजच्या महिलांच्या अभूतपूर्व क्षमतांचे प्रतिक आहे” असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
On the eve of International Women’s Day, I interacted with the amazing crew of Navika Sagar Parikrama II. Their courageous journey aboard INSV Tarini, tackling the immense challenge of circumnavigating the globe, stands as a beacon of Nari Shakti. Their unwavering resilience,… pic.twitter.com/M20YzFer2F
— Rajnath Singh (@rajnathsingh) March 7, 2025
मोहिमेवरील दोन्ही महिला अधिकारी, सध्या दक्षिण अटलांटिक महासागरात नौकायन करत आहेत, जे त्यांच्या मागील पोर्ट ऑफ कॉल, फॉकलंड बेटांवरील पोर्ट स्टॅनलीपासून, सुमारे 450 नॉटिकल माईल्स अंतरावर आहे आणि आता त्या दक्षिण आफ्रिकेतील केप टाउनच्या दिशेने जात आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी, अधिकाऱ्यांनी गाठलेल्या या अद्वितीय टप्प्यांची प्रशंसा केली, ज्यामध्ये जगातील सर्वात कठीण सागरी बिंदू ‘पॉइंट नीमो’ पार करणे आणि ड्रेक पासेज, जो एक अत्यंत धोकादायक सागरी मार्ग आहे, त्यादिशेने नॅव्हिगेट करणे अशा कामगिरींचा समावेश आहे.
नाविका सागर परिक्रमा II ही भारतीय नौसेनेने सुरू केली असून, हा उपक्रम महिलांच्या सागरी आणि संरक्षण क्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन देण्याचा उद्देशाने सुरु करण्यात आला आहे, तसेच महिलांच्या नेतृत्वाला आणि आत्मनिर्भरतेला हा प्रोत्साहित करतो. 2 ऑक्टोबर 2024 रोजी, गोव्याहून आपल्या परिक्रमेला सुरुवात करण्यापूर्वी या महिला अधिकाऱ्यांना नेव्हिगेशन, हवामान व्यवस्थापन आणि महासागरातील जीवनावश्यक तंत्रांचे सखोल प्रशिक्षण दिले गेले.
संरक्षण मंत्रालयाने सशस्त्र दलांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याच्या आपल्या सततच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. महिला अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरूपी कमिशन संधी, राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि भारतीय नौदल अकादमी (INA) मध्ये, प्रवेश सुलक्ष करुन देणे आणि लढाई तसेच विमान वाहतूक शाखांमध्ये नेतृत्वाच्या संधींची वाढ करुन देणे, यांसारख्या उपक्रमांद्वारे सरकारने, राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रात महिला व पुरुषांच्या समावेशकतेसाठीची आपली वचनबद्धता अधोरेखित केली आहे.
टीम भारतशक्ती