इस्रायली सैन्याने गुरुवारी या गोष्टीची कबुली दिली की, सप्टेंबर महिन्यात इस्रायलच्या विशेष सैन्य तुकडीने, सीरियामधील भूमिगत क्षेपणास्त्र उत्पादन तळावर छापा टाकला होता. इस्रायल सरकारचे असे म्हणणे आहे की, इराण-समर्थित हिजबुल्लाहद्वारे तयार करण्यात येणारी ही शेकडो मिसाईल्स इस्रायलवर हल्ला करण्यासाठी वापरण्याचा त्यांचा हेतू होता.
इस्त्रायली लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल नदाव शोशानी यांनी पत्रकारांना सांगितले की, ”भूमध्य सागरी किनाऱ्याजवळील हामा प्रांतातील मस्याफा नजीकचे कॉम्प्लेक्स, हे आमच्या प्रदेशातील इराणच्या उत्पादनाचे प्रमुख तळ होते.”
“याठिकाणी प्रतिवर्षी शेकडो क्षेपणास्त्रे तयार केली जात असून, त्यांचा वापर इस्रायलवर झालेल्या आजवरच्या अनेक हवाई हल्ल्यांमध्ये केला गेल्याचे आढळून आले आहे. हे सर्व हल्ले हिजबुल्लाच्या समर्थनाने केले गेले होते,” असेही कर्नल शोशानी यांनी यावेळी सांगितले.
पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, की ”2017 मध्ये डोंगराच्या एका बाजूला खोलवर खोदकाम करुन, या क्षेपणास्त्र निर्मिती तळाचा पाया रचला गेला. बांधकाम सुरु झाल्यापासूनच ही जागा इस्रायली गुप्तचरांच्या निरीक्षणाखाली होते, ज्यावेळी ते अचूक मार्गदर्शित अशी लांब पल्ल्याची मिसाईल्स तयार करण्याच्या तयारीत होते. यापैकी काही मिसाईल्सची रेंज ही 300 किमी (190 मैल) पर्यंत असू शकते.”
“ही निर्मिती अधिक सक्रिय होत असल्याचे पाहून, आम्ही त्वरित या धोक्याविषयी व्यक्त झालो,” असे कर्नल शोशानी यांनी यावेळी सांगितले.
IDF (Israel Defense Forces) ची ऑपरेशन्स
8 सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या या छापेमारीबद्दल, इस्रायली मीडियाने जरी याआधी काही रिपोर्ट्स सादर केले असले, तरी कर्नल शोशानी यांच्या म्हणण्यानुसार, ‘लष्कराकडून अधिकृतरित्या करण्यात आलेले हे पहिलेच पुष्टीकरण आहे. इस्रायली लष्कर सहसा त्यांच्या विशेष दलांच्या ऑपरेशन्सवर जाहीर भाष्य करत नाही”.
त्यावेळी, सीरियाच्या राज्य माध्यमांनी सांगितले होते, की छापेमारी दरम्यान देशाच्या पश्चिमेला इस्रायलकडून झालेल्या हवाई हल्ल्यात, किमान 16 लोक मारले गेले.
दरम्यान, कर्नल शोशानी यांनी सांगितले की, ”रात्रीच्या वेळी तासभर चाललेली ही छापेमारी, IDF ने गेल्या काही वर्षांत केलेल्या अधिक जटिल ऑपरेशन्सपैकी एक होती. यावेळी झालेल्या हवाई हल्ल्यांमध्येअनेक विमानांचा समावेश होता तसेच सुमारे १०० हेलिकॉप्टर-बॉर्न सैनिकही या ऑपरेशनमध्ये सहभागी होते, ज्यांनी शस्त्रसाठा शोधून काढून तेथील कागदपत्रे देखील जप्त केली.”
“छाप्याच्या अखेरीस, सैनिकांनी हे तळ उध्वस्त करुन टाकले. ज्यामध्ये मशीनरीज आणि उत्पादन उपकरणे देखील समाविष्ट होती,” असेही ते म्हणाले. ”या प्लांटला उद्धवस्त करणे हे इस्रायलची सुरक्षा सुनिश्चीत करण्यासाठी अत्यंत महत्वाचे होते.” खात्री करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते,” असे शोशानी यांनी सांगितले.
इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी पूर्व सीरियाचा अध्यक्ष बशर अल-असदच्या सरकारवर आरोप केला आहे की, ‘ते लेबनानमध्ये आधारित हिजबुल्लाह चळवळीला इराणकडून शस्त्रास्त्रे पुरवण्यास मदत करत होते.’ दरम्यान, हा शस्त्रास्त्रांचा पुरवठा रोखण्यासाठी इस्रायल कटिबद्ध असल्याचेही इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षाच्या अखेरीस अल-असदचे सरकार कोसळल्यावर, इस्रायलने सीरियच्या लष्करी पायाभूत सुविधा आणि शस्त्रास्त्रे तयार करणाऱ्या सर्व तळांवर नियमीत हल्ले सुरु केले, जेणेकरुन ही ठिकाणं शत्रूंच्या हाती लागणार नाहीत.
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)