इराणी लष्करावरील मर्यादित हल्ल्यांसाठी नेतान्याहू तयार

0
नेतान्याहू

इस्रायल अमेरिकेचे म्हणणे ऐकून घेईल मात्र स्वतःच्या राष्ट्रीय हिताचा विचार करून आपल्या कृतींबद्दल अंतिम निर्णय घेईल, असे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे.

हे विधान वॉशिंग्टन पोस्टच्या एका लेखासोबत जोडण्यात आले आहे, ज्यामध्ये असे म्हटले होते की नेतान्याहू यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाला सांगितले की, इस्रायल इराणच्या सैन्यावर हल्ला करेल, आण्विक ऊर्जा केंद्रे किंवा तेल विहिरींना लक्ष्य करणार नाही.

1 ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इस्रायल प्रतिहल्ला करेल ही अपेक्षा असताना नेतान्याहू यांचे वरील विधान आले आहे. इस्रायल आणि लेबनॉनमधील इराण समर्थित हिजबुल्लाह गट यांच्यात झपाट्याने वाढत असलेल्या संघर्षानंतर इराणने हल्ला  केला.

अणुऊर्जा सुविधांवर लष्कराचे वर्चस्व

या प्रकरणाशी परिचित असलेल्या दोन अधिकाऱ्यांचा हवाला देत वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे की, नेतान्याहू यांनी बायडेन प्रशासनाला सांगितले होते की ते इराणमधील तेलविहिरी  किंवा आण्विक ऊर्जा सुविधांवर हल्ला करण्याऐवजी लष्करावर हल्ला करण्यास तयार आहेत आणि मोठे युद्ध टाळण्यासाठी अधिक मर्यादित प्रतिहल्ले करण्याचे आमचे प्रयत्न असतील.

वॉशिंग्टन पोस्टने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, “अमेरिकी निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेप”  टाळण्यासाठी सूडबुद्धीने कारवाई केली जाण्याची शक्यता कमी आहे.

इराणच्या तेलविहिरींवर हल्ला करण्यास बायडेन यांचा विरोध

बायडेन यांनी म्हटले आहे की ते इराणच्या आण्विक ऊर्जा सुविधांवरील हल्ल्याचे समर्थन करणार नाहीत आणि इराणच्या तेल क्षेत्रांवर होऊ शकणाऱ्या इस्रायली हल्ल्यांच्या संभाव्यतेमुळे तेल बाजारात आधीच महगाईचा भडका उडला आहे.

आखाती देशांनी इराणच्या तेल साइट्सवर हल्ला करण्यापासून इस्रायलला रोखण्यासाठी अमेरिकेकडे लॉबिंग केले आहे कारण त्यांना चिंता आहे की जर संघर्ष वाढला तर तेहरानच्या प्रॉक्सींकडून त्यांच्या स्वतःच्या तेल सुविधांना आग लावली जाऊ शकते.

नागरिकांचे निर्वसन

सोमवारी, लेबनॉनमधील अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना ताबडतोब देश सोडून जाण्यासाठी जोरदार आवाहन केले आणि चेतावणी दिली की 27 सप्टेंबरपासून अमेरिकन नागरिकांना मायदेशात परत घेऊन जाण्यासाठी सरकारकडून सुरू करण्यात आलेली अतिरिक्त उड्डाणे अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येतील.

ऑस्ट्रेलियाने आपल्या नागरिकांना इस्रायलला न जाण्याचा इशारा दिला असून इस्रायलमधील ऑस्ट्रेलियन लोकांना व्यावसायिक उड्डाणे उपलब्ध असतानाच देश सोडण्याचे आवाहन केले आहे.

ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleHermit Kingdom Blows Up Road & Rail Link To South Korea, As Tensions Peak
Next articleIndia Signs Contract With US For Purchase of 31 Predator Drones

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here