Sunday, March 1, 2026
Solar
MQ-9B
Home Bharat Shakti Marathi व्हिसा निर्बंध आणि शुल्क प्रक्रियेमुळे चिनी विद्यार्थ्यांची अमेरिकेकडे पाठ

व्हिसा निर्बंध आणि शुल्क प्रक्रियेमुळे चिनी विद्यार्थ्यांची अमेरिकेकडे पाठ

0
अमेरिकन विद्यापीठातील निधीतील कपातीमुळे 25 वर्षीय जीवशास्त्र विद्यार्थिनी याओची पीएचडी नोंदणी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता अभ्यासासाठी पर्यायी देशांचा विचार करणाऱ्या अनेक चिनी विद्यार्थ्यांमध्ये आता तिचाही समावेश झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने व्हिसा रद्द करणे आणि विद्यापीठाच्या निधीत कपात करणे हे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी चिंतेचे कारण बनले आहे. वॉशिंग्टनचे बीजिंगबरोबरचे व्यापार युद्ध आणि चिनी नागरिकांचे वाढते अपमान यामुळे चीनमधील लोकांना अतिरिक्त आव्हानांचा सामना करावा लागत आहे, असे विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रातील लोकांनी सांगितले.

“मला कायम असे वाटत असे की राजकारण माझ्या आयुष्यापासून खूप दूर आहे, परंतु या वर्षी मला आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर राजकारणाचा होणारा परिणाम खरोखर जाणवला,” असे शिकागोस्थित याओ याने त्याच्या संभाव्य विद्यापीठाचे नाव सांगण्यास नकार देत सांगितले.

सलग 15 वर्षे चीन हा अमेरिकेमधील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी असणारा देश होता. मात्र गेल्या वर्षी ही जागा भारताने पटकावली. ओपन डोर्सच्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये चिनी विद्यार्थ्यांचा अमेरिकन अर्थव्यवस्थेत 14.3 अब्ज डॉलर्सचा आर्थिक हातभार लागला होता.

आता मात्र अमेरिकेत या समुदायाकडून राष्ट्रीय सुरक्षेचा धोका असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे -चिनी कम्युनिस्ट पक्षाने पाठवलेल्या हेरांशी त्यांची तुलना केली आहे-आणि त्यांना विद्यापीठांमधून प्रतिबंधित करू शकेल अशा प्रस्तावित कायद्याची धमकी दिली आहे.

रॉयटर्सने 15 चिनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, ज्यापैकी आठ अमेरिकेत होते, ज्यांनी सांगितले की या गुंतागुंतीच्या समस्यांमुळे सुरक्षेची चिंता जशी वाढली आहे तशाच आर्थिक अडचणींमध्येही  वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या अमेरिकेत जाण्याच्या स्वप्नाचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे.

ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतल्यापासून, 4 हजार 700 हून अधिक विद्यार्थ्यांना यू. एस. इमिग्रेशन डेटाबेसमधून काढून टाकण्यात आले आहे, ज्यामुळे ते निर्वासित होण्याची शक्यता आहे.

अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशनने आतापर्यंत गोळा केलेल्या 327 व्हिसा रद्द करण्याच्या अहवालांपैकी 14 टक्के अहवाल चिनी विद्यार्थ्यांचे आहे.

ब्रँडेड हेर

गेल्या महिन्यात, चीनच्या संदर्भातील यू. एस. हाऊसच्या निवड समितीने सहा विद्यापीठांना पत्रे पाठवून प्रगत स्टेम कार्यक्रमांतर्गत चिनी विद्यार्थ्यांसाठी नोंदणी धोरणांविषयीची माहिती पुरवण्याची विनंती केली आणि संघराज्याकडून अनुदानीत संशोधनात त्यांच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

समितीचे अध्यक्ष जॉन मूलनार यांनी लिहिले की, अमेरिकेची विद्यार्थी व्हिसा प्रणाली “बीजिंगसाठी एक ट्रोजन हॉर्स” बनली आहे, ज्याने सर्वोच्च संशोधन संस्थांमध्ये अनियंत्रित प्रवेश प्रदान केला आणि त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला आपल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करणाऱ्या भेदभावपूर्ण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी “राष्ट्रीय सुरक्षेला धोका असा खोटा बहाणा बनवून प्रचार करणे थांबवण्याचे” आवाहन केले.

अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाच्या रिपब्लिकन सदस्यांनी “शैक्षणिक कायद्यातील बौद्धिक सुरक्षा उपायांचे समर्थन करून चिनी कम्युनिस्टांची हेरगिरी थांबवा” हा प्रस्तावही मांडला आहे, ज्यामुळे चिनी नागरिकांसाठी विद्यार्थी व्हिसा देण्याचे थांबवता येईल.

हे विधेयक अमेरिकन मूल्यांशी विश्वासघात करणारे असून विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातील अमेरिकेच्या नेतृत्वाला कमकुवत करते, असे न्यूयॉर्कस्थित 100 ना-नफा समितीच्या प्रमुख चिनी अमेरिकन लोकांच्या गटाने म्हटले आहे.

ड्यूक विद्यापीठाचे प्राध्यापक चेन यिरन म्हणाले की, बीजिंगला अमेरिकेशी स्पर्धा करण्यास मदत करण्यासाठी चिनी विद्यार्थी घरी धाव घेतात ही कल्पना चुकीची आहे.

“त्यांच्यापैकी बहुतेकांना अजूनही अमेरिकेमध्ये रहायचे आहे,” असे चेन म्हणाले. “ते मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत, ते या काही वर्षांसाठी लाखोंची फी  (युआनमध्ये) भरतात, त्यांना गुंतवणूक परत मिळवायची आहे”.

अमेरिकेबाहेरील विद्यापीठांमध्ये त्यानंतर विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट वाढल्याचे नोंदवण्यात आले आहे.

इतर पर्यायांची चाचपणी

इटलीच्या बोकोनी विद्यापीठाकडे अनेक विद्यार्थ्यांकडून चौकशी करण्यात आली आहे, असे त्याचे ग्रेटर चायना कंट्री मॅनेजर समर वू यांनी सांगितले.

“अनेक विद्यार्थी म्हणाले की (राजकीय परिस्थितीमुळे) ते इतर देशांकडे अधिक पाहत आहेत, कारण ते अमेरिकेत गेले तर काय होईल हे त्यांना माहित नाही,” असेही  त्या म्हणाल्या.

अमेरिका आणि ब्रिटनमधील संस्थांनाही चिनी विद्यापीठांकडून स्पर्धेला सामोरे जावे लागत होते, ज्यांनी अलिकडच्या वर्षांत जागतिक क्रमवारीत वाढ केली आहे.

“चीनच्या देशांतर्गत विद्यापीठांची वाढती प्रतिष्ठा तसेच संशोधन आणि विकासासाठीच्या निधीतील वाढ ही चिनी संस्थांना अधिक आकर्षक बनवत आहे,” असे ब्रिटिश शैक्षणिक थिंक टॅंक  HEPI साठी चिनी विद्यार्थ्यांविषयी लेख लिहिणाऱ्या पिप्पा एबेल यांनी सांगितले.

कीस्टोन एज्युकेशन ग्रुपच्या संकेतस्थळांवर चीनकडून सर्वाधिक शोधले जाणारे गंतव्यस्थान अमेरिका आहे, परंतु ट्रम्प यांच्या अतिरिक्त शुल्क घोषणेनंतर हा शोध 5 टक्क्यांनी घसरला डॉक्टरेट कार्यक्रमांचे शोध 12 टक्क्यांनी कमी झाले.

बीजिंगवरील ट्रम्प यांच्या 145 टक्के शुल्कामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत चिनी उत्पादकांनी विकलेल्या 400 अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीच्या वस्तूंवर वार्षिक परिणाम होईल आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतील वाढीचा वेग कमी होईल.

कीस्टोनचे insights director मार्क बेनेट म्हणाले की, आर्थिक परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय धोरणांमधील बदलांबद्दल चीन अधिक संवेदनशील असू शकतो, ज्यामुळे घरगुती अंदाजपत्रकांवर आणि अमेरिकेच्या शिक्षणाचा पाठपुरावा करण्याच्या एकूण परवडण्याजोग्या क्षमतेवर परिणाम होतो.

हाँगकाँगमध्ये, पदवीधरांना राहण्याची आणि रोजगार शोधण्याची परवानगी देणाऱ्या व्हिसा व्यवस्थेमुळे हे शहर एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे, असे हाँगकाँगच्या चिनी विद्यापीठाने म्हटले आहे.

ली ही अशीच एक विद्यार्थिनी आहे. न्यूयॉर्कमध्ये तीन वर्षे राहिल्यानंतर, तिने कठीण मानल्या जाणाऱ्या अमेरिकन ग्रीन कार्डसाठी अर्ज प्रक्रिया सुरू न करण्याचा निर्णय घेतला आणि पदवी शिक्षण तसेच नोकरीसाठी हाँगकाँगला जाण्याचा निर्णय घेतला.

“जेव्हा माझ्या लक्षात आले की माझ्या आयुष्यात इतर शक्यता असू शकतात, तेव्हा माझ्याकडे आता जे आहे त्याबद्दल मी इतका निराश नव्हते,” असे ली म्हणाली.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleपुतिन यांच्या शांतता प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर, रशियाचा Odesa वर ड्रोन हल्ला
Next articleआग्नेय आशियातून होणाऱ्या Solar Imports वर, अमेरिकेने लादले मोठे टॅरिफ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here