आग्नेय आशियातून होणाऱ्या Solar Imports वर, अमेरिकेने लादले मोठे टॅरिफ

0

अमेरिकेच्या व्यापार अधिकाऱ्यांनी, आग्नेय आशियातून येणाऱ्या बहुतांश Solar Imports वर, मोठ्याप्रमाणात आयात शुल्क (Tariff) लावले असून, ही अमेरिकन सौर उत्पादकांनी गेल्या वर्षभरात केलेल्या तक्रारींवरील मोठी कारवाई मानली जात आहे. या तक्रारीत चीनमधील कंपन्यांवर अतिशय कमी दराने सौर उत्पादने विकून बाजार बिघडवण्याचा आरोप अमेरिकन सौर उत्पादकांनी केला होता.

ही केस कोरियाच्या Hanwha Qcells, अ‍ॅरिझोनामधील First Solar Inc, आणि काही लहान अमेरिकन उत्पादक कंपन्यांनी दाखल केली होती. त्यांचे म्हणणे होते की, चीनच्या कंपन्या मलेशिया, कंबोडिया, थायलंड आणि व्हिएतनाममधील कारखान्यांमधून उत्पादन करून, अतिशय कमी किंमतींना सौर पॅनल्स विकत होत्या, आणि त्यांना अन्यायकारक सबसिडी मिळत होती — ज्यामुळे अमेरिकन उत्पादक स्पर्धेत टिकू शकत नव्हते.

टॅरिफ्सचा दर काय?

सोमवारी जाहीर करण्यात आलेले टॅरिफ्स, कंपन्यांनुसार आणि देशांनुसार वेगवेगळे आहेत, परंतु गेल्यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या प्राथमिक दरांपेक्षा बहुतांश टॅरिफ्स हे यावेळी अधिक आहेत.

मलेशियातून येणाऱ्या Jinko Solar उत्पादनांवर एकत्रित टॅरिफ (डम्पिंग व सबसिडीविरोधी) 41.56%

थायलंडमधून येणाऱ्या Trina Solar उत्पादनांवर 375.19%

कंबोडियातून येणाऱ्या उत्पादनांवर, सहकार्य न केल्यामुळे, 3,500% पेक्षा जास्त टॅरिफ लावण्यात आले आहे.

नाट्यमय बदल

“हे खूप चांगले निकाल आहेत,” असे अमेरिकन उत्पादन गटाचे वकील- टिम ब्राइटबिल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. “आम्हाला खात्री आहे की ते या चार देशांमधील चिनी मालकीच्या कंपन्यांच्या अन्याय्य व्यापार पद्धतींना तोंड देतील, ज्यामुळे अमेरिकेच्या सौर उत्पादन उद्योगाला बराच काळ त्रास होत आहे.”

गेल्यावर्षी अमेरिकेला 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त सौर उत्पादने पुरवणाऱ्या देशांवरील शुल्काच्या धोक्यामुळे, जे देशांतर्गत पुरवठ्याचा मोठा भाग होते, जागतिक सौर व्यापारात नाट्यमय बदल झाला आहे. यावर्षी मात्क चार केंद्रित देशांमधून आयात गेल्यावर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे, तर लाओस आणि इंडोनेशियासारख्या देशांमधून पॅनल्सची शिपमेंट वाढत आहे.

‘Solar Energy Industries Association (SEIA)’ या औद्योगिक गटाने या टॅरिफ्सवर टीका केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “या आयात शुल्कांमुळे अमेरिकेतील सौर पॅनल कारखान्यांना महागडे कच्चे माल मिळतील, ज्यामुळे उत्पादन खर्च वाढेल. 2022 मध्ये स्वच्छ ऊर्जा उत्पादनासाठी सबसिडी जाहीर केल्यापासून असे कारखाने उभारले जात आहेत.

SEIA ने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

हे टॅरिफ्स पूर्णपणे लागू होण्यासाठी, International Trade Commission जूनमध्ये मतदान करून ठरवेल की या डम्पिंग आणि सबसिडीमुळे अमेरिकी सौर उद्योगाला प्रत्यक्ष नुकसान झाले आहे की नाही.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीसह)


+ posts
Previous articleव्हिसा निर्बंध आणि शुल्क प्रक्रियेमुळे चिनी विद्यार्थ्यांची अमेरिकेकडे पाठ
Next articleपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here