पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले. या दौऱ्याबाबत ते म्हणाले की, अलिकडच्या वर्षांत धोरणात्मक सखोलता आणि गती प्राप्त केलेल्या मध्यपूर्वेतील देशाबरोबरच्या दीर्घ आणि ऐतिहासिक संबंधांना भारत खूप महत्त्व देतो.
दौऱ्यावर जाण्याआधी आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, “आम्ही परस्पर लाभदायक आणि भरीव भागीदारी विकसित केली आहे ज्यात संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि नागरिकांमधील आपसांतील संबंध या पैलूंचा समावेश आहे. आम्ही प्रादेशिक शांतता, समृद्धी, सुरक्षा आणि स्थैर्य यांना चालना देण्यात सारखेच स्वारस्य आणि वचनबद्धता दर्शवली आहे.”

 

“गेल्या दशकभरातील सौदी अरेबियाचा माझा हा तिसरा दौरा असून मी पहिल्यांदाच जेद्दाह या ऐतिहासिक शहराला भेट देत आहे. धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या दुसऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे आणि माझ्या भावासमान असलेल्या महामहिम प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची 2023 मधील भारतातील अत्यंत यशस्वी राजकीय भेट जशी झाली, तशीच ही भेटही यशस्वी व्हावी यासाठी मी उत्सुक आहे.”

देशातील भारतीय समुदायाला भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे मोदी म्हणाले.

“सांस्कृतिक आणि मानवी संबंध मजबूत करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या आणि दोन  राष्ट्रांमध्ये एक जिवंत सेतू म्हणून कार्य करणाऱ्या सौदी अरेबियामधील उर्जावान भारतीय समुदायाला भेटण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे,” असेही ते म्हणाले.

सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान, महामहिम राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान  नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या 22 आणि 23 एप्रिल अशा दोन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर जात आहे.

भारत-सौदी अरेबिया संबंध

भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात सामाजिक-सांस्कृतिक तसेच व्यापारी संबंधांच्या प्रदीर्घ इतिहासासह घनिष्ट आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

धोरणात्मक भागीदार म्हणून, दोन्ही देश राजकीय, संरक्षण, सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, संस्कृती आणि लोकांमधील परस्पर संबंध यासह विविध क्षेत्रांमध्ये मजबूत द्विपक्षीय संबंध सामायिक करतात.

वाढत्या गुंतवणुकीच्या संदर्भातील बांधिलकी, संरक्षण सहकार्य वाढवणे आणि विविध क्षेत्रांमध्ये सखोल उच्चस्तरीय देवाणघेवाण यासह, अनेक धोरणात्मक क्षेत्रांमध्ये विस्तार करत, गेल्या दशकात भारताचे या राज्याबरोबरचे संबंध एका मजबूत आणि चिरस्थायी भागीदारीत विकसित झाले आहेत.

सौदी अरेबियाशी असलेल्या आपल्या द्विपक्षीय संबंधांना भारत किती महत्त्व देतो हे मोदी यांचा हा दौरा प्रतिबिंबित करतो.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “यामुळे आपली बहुआयामी भागीदारी अधिक सखोल आणि बळकट करण्याची तसेच परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळेल.”

1947 मध्ये दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleआग्नेय आशियातून होणाऱ्या Solar Imports वर, अमेरिकेने लादले मोठे टॅरिफ
Next articlePutin Says Open To Direct Peace Talks With Ukraine

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here