बेलारूसने युक्रेनच्या सीमेजवळील भागात आपले सैन्य पाठवले असल्याच्या वृत्ताचे युक्रेनने सोमवारी खंडन केले. आपल्या सीमेजवळ बेलारूसी सैन्याची कोणतीही चिन्हे पाहिली नसल्याचा युक्रेनने दावा केला.
युक्रेनच्या सीमा रक्षक सेवेचे प्रवक्ते आंद्री डेमचेन्को म्हणाले की, गेल्या काही दिवसांत आम्ही आमच्या सीमेजवळ विविध तुकड्या, उपकरणे आणि कर्मचाऱ्यांसह बेलारूसी सैन्याच्या किंवा उपकरणे उभारणीच्या कोणत्याही हालचाली पाहिलेल्या नाहीत.
युक्रेनच्या उत्तरेकडील सीमेवरील रशियाचा जवळचा मित्र असलेल्या बेलारूसने शनिवारी खुलासा केला की ड्रोनद्वारे युक्रेनच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्याचा त्यांनी आरोप केल्यानंतर युक्रेनला लागून असलेली आपली सीमा बळकट करण्यासाठी आपण सैन्य पाठवत आहे.
सीमेवर जर खरोखरच बेलारूसी सैन्य येऊन उभे असेल तर रशियाबरोबर उत्तरेकडील सीमेवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत युक्रेनला या भागाचे रक्षण करण्यासाठी आधीच विखुरलेले सैन्य त्या दिशेला फिरवून प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले जाऊ शकते.
रशियाच्या पूर्ण ताकदीने झालेल्या आक्रमणाच्या जवळजवळ अडीच वर्षांनंतर, युक्रेनने गेल्या आठवड्यात रशियाच्या कुर्स्क प्रदेशात अचानक सीमापार घुसखोरी सुरू केली. रशियाने सोमवारी सांगितले की बेलगोरोडच्या रशियन प्रदेशाजवळ युक्रेनच्या लष्करी हालचालीही वाढल्या आहेत.
युक्रेनवरील दबाव वाढावा यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या रशियाच्या माहिती मोहिमेत योगदान देण्यासाठी बेलारूसने सैन्य उभारणीबद्दल विधान केले होते असे डेमचेन्को यांनी दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
कदाचित हे घडत आहे असे चित्र निर्माण करण्यासाठी बहुधा कमी संख्येने उपकरणे आणि कर्मचारी हलवण्यासाठी त्यांना भाग पाडले जाईल. जर ते खरोखरच घडले असेल किंवा होत असेल तर ते बेलारूसमध्ये अंतर्गत भागात होत असेल, असे डेमचेन्को पुढे म्हणाले.
सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या सुरुवातीला रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीव काबीज करण्यासाठी किंवा त्यांना धमकावण्यासाठी आणि युक्रेनियन सैन्याचा ताबा मिळवण्यासाठी त्यांचे यांत्रिक सैन्य पाठवले खरे मात्र ती चाल रशियाच्याच अंगाशी आली. यांत्रिक सैन्य अडचणीत सापडले आणि परिसरातील मऊ चिखलात अडकले. युक्रेनियन सैन्याने त्याचा सर्वाधिक फायदा घेतला आणि मोठ्या प्रमाणात रशियन तोफा नष्ट केल्या.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)