लष्कराकडून ‘तंत्रज्ञान समावेशी वर्ष’ विषयक परिषदेचे आयोजन

0
भारतीय लष्कराने बुधवारी ‘तंत्रज्ञान समावेशी वर्ष- सैनिकांचे सक्षमीकरण’ या संकल्पनेवर आधारित एका परिषदेचे आणि प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या परिषदेत तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उद्योग-व्यावसायिकांचा समावेश होता. छायाचित्र: पीआयबी

शिक्षण व औद्योगिक क्षेत्रातील भागीदारीवर भर

दि. २५ एप्रिल:  लष्कराने बुधवारी ‘तंत्रज्ञान समावेशी  वर्ष- सैनिकांचे सक्षमीकरण’ या संकल्पनेवर आधारित एका  परिषदेचे आणि प्रदर्शनाचे आयोजन केले होते. माणेकशॉ सेंटर येथे लष्कर आणि ‘सेंटर फॉर लँड वॉरफेअर स्टडीज’ (सीएलएडब्लूएस)  यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता.

या परिषदेत तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उद्योग-व्यावसायिकांचा समावेश होता. लष्करी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत हार्डवेअर यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर या परिषदेत विचारमंथन करण्यात आले. लष्करामध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी सुरु असलेल्या उपक्रमांना गती देण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ आणि संरक्षण उद्योगासाठी पूरक वातावरण निर्माण करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या उद्‌घाटनपर भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘अटल इनोव्हेशन मिशन’चे संचालक डॉ चिंतन वैष्णव यांनी बीजभाषण केले. त्यानंतर भारताने संरक्षण क्षेत्रात केलेली प्रगती व क्षमता प्रदर्शित करणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. लष्करप्रमुखांनी स्वदेशी संशोधन आणि विकासाद्वारे अतिमहत्वाच्या तंत्रज्ञानामध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करण्याची गरज अधोरेखित केली. तंत्रज्ञान हे स्पर्धेचे नवीन धोरणात्मक क्षेत्र म्हणून उदयाला आले असून, ते भू-राजकीय वर्चस्वासाठी  महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. माहितीपासून पुरवठा साखळीपर्यंत विविध क्षेत्रांच्या सज्जतेसाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच तंत्रज्ञानाच्या समावेशामुळे आधुनिक युद्धाचे स्वरूप बदलत असल्याकडेही तयंनी लक्ष वेधले.

भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण व त्याला तत्पर, कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या तंत्रज्ञान सक्षम व भविष्यासाठी सज्ज सैन्य दलामध्ये  परिवर्तित करण्याच्या वचनबद्धतेचा लष्करप्रमुखांनी पुनरुच्चार केला. सर्व भागधारक, सेवा, उद्योग क्षेत्रातील भागीदार, स्टार्ट-अप, संशोधन आणि विकास संस्था, शिक्षण तज्ञ आणि धोरणकर्त्यांनी एक गतिशील राष्ट्रीय संरक्षण परिसंस्था  विकसित करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असे त्यांनी आवाहन केले. या परिषदेची विभागणी तीन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती.

 विनय चाटी

स्रोत: पीआयबी


Spread the love
Previous article‘एससीओ’ संरक्षणमंत्र्यांची कझाकस्तान येथे बैठक
Next articleमोदी-पुतीन द्विपक्षीय चर्चेसाठी अजित डोवाल बजावणार महत्त्वाची भूमिका?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here