भारतीय नौदलाने मार्च महिन्याच्या सुरुवातीला, त्यांच्या प्रमुख थिएटर लेव्हल ऑपरेशनल एक्सरसाइज ‘TROPEX 2025’ चा यशस्वीरित्या समारोप केला. जानेवारी ते मार्च असे तीन महिने सुरु असलेल्या या विशेष सरावादरम्यान, प्रमुख नौदल ऑपरेशनल संकल्पनांची पडताळणी आणि लढाऊ तयारीचे मूल्यांकन केले गेले.
भारतीय नौदलाच्या मते, TROPEX-25 मध्ये जटिल सागरी ऑपरेशन्सची विस्तृत श्रेणी सामाविष्ट होती, ज्यामध्ये उभयचर एक्सरसाईज (AMPHEX), अचूक हल्ल्यांवर लक्ष केंद्रित करणारा संयुक्त वर्क-अप टप्पा, सायबर आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध कवायती आणि एक प्रगत रणनीतिक टप्प्याचा समावेश होता.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरासह, हिंद महासागराच्या विशाल विस्तारीत भागात हा मेगा सराव पार पडला. ऑपरेशनल थिएटर उत्तरेकडून दक्षिणेकडे अंदाजे 4,300 नॉटिकल मैल, 35 अंश दक्षिण अक्षांश आणि पश्चिमेकडील होर्मुझच्या सामुद्रधुनीपासून पूर्वेकडील सुंदा आणि लोम्बोक सामुद्रधुनीपर्यंत 5,00 नॉटिकल मैल पसरलेले होते.
TROPEX-25 सरावामध्ये- भारतीय नौदलाच्या सुमारे 65-70 युद्धनौका, 9-10 पाणबुड्या आणि विविध श्रेणीतील 80 हून अधिक विमानांचा सहभाग होता. या सरावादरम्यान भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीय कोस्ट गार्डसची विस्तृत संयुक्त ऑपरेशन्स पार पडली, ज्यामध्ये सुखोई-30 आणि जॅग्वार ही लढाऊ विमाने, C-130 ट्रान्सपोर्ट विमान, AWACS सर्वेक्षण प्लॅटफॉर्म्स, एरियल रिफ्युलर्स, 600 हून अधिक पायदळ सैनिक आणि 10 पेक्षा जास्त कोस्ट गार्ड शिप्स यांचा समावेश होता.
‘या सरावाने भारतीय नौदलाच्या एकात्मिक आणि समन्वयित ऑपरेशन्सची क्षमता अधोरेखित केली, ज्यामुळे भारताच्या समुद्री हितांचे संरक्षण करण्याच्या नौदलाच्या प्रयत्नांना बळकटी मिळाली. TROPEX-25 दरम्यान मिळवलेली उच्च ऑपरेशनल समन्वय क्षमता आणि थिएटर-लेव्हल सीनारियोजमध्ये लष्करी दलांमधील समन्वयाचे महत्व स्पष्ट केले,’ असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
TROPEX-25 ने एका तीव्र ऑपरेशनल मोहिमेची यशस्वी समाप्ती दर्शवली, ज्याने भारतीय नौदलाच्या समुद्री डोमेनमधील राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेचे पुनरुत्थान केले. भारतीय नौसेना एक लढाऊ, विश्वसनीय, एकसंध आणि भविष्यकालीन तयारी असलेली फोर्स म्हणून आपली भूमिका कायम ठेवते.
टीम भारतशक्ती