विविध क्षेत्रातील दिवंगत दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्याच्या हेतूने, Indian Army साउथ वेस्टर्न कमांडने रविवारी खास ‘ऑनर रन इन’ चे आयोजन केले आहे. जयपूरमधील प्रतिष्ठित अल्बर्ट हॉलमधून नुकताच या काय्रकमाला हिरवा झेंडा दाखवला गेला. या मॅरेथॉनमध्ये 21 KM, 10 KM, 5 KM अशा वेगवेगळ्या टप्प्यांचे ठराविक वेळ मर्यादेनुसार आयोजन करण्यात आले आहे. सोबतच आणि 3 KM नॉन-टाइम रनचा सुद्धा यात समावेश असले. या विशेष रनिंग इव्हेटंमध्ये लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेते आणि राजस्थानचे निवृत्त मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड, दक्षिण पश्चिम आर्मीचे कमांडर लेफ्टनंट जनरल मनजिंदर सिंग याशिवाय श्रीमती बरिंदर जीत कौर, AWWA चे क्षेत्रीय अध्यक्ष- लेफ्टनंट जनरल हरबिंदर सिंग, वांद्रा, चीफ ऑफ स्टाफ, दक्षिण पश्चिम कमांडचे संदीप भटनागर, State Bank of India चे मुख्य महाव्यवस्थापक इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते.
आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन मध्ये सहभादी सुनीता गोदारा, पा-ॲथलीट संगीता विश्नोई आणि कर्नल अनुज बिंद्रा यांसारखे स्टार धावपटू देखील या Honour Run मध्ये सहभागी झाले होते. याशिवाय सैनिक, NCC कॅडेट्स, व्यावसायिक धावपटू, पॅरा-ॲथलीट, आणि विशेष म्हणजे काही अपंग व अवयव प्रत्यारोपण केलेल्या (Organ transplant survivors) मुलांनीही या इव्हेंटमध्ये उत्साहाने भाग घेतला होता.
या कार्यक्रमादरम्यान बोलताना कर्नल राठोड म्हणाले, “दरवर्षी ही खास मॅरोथान आमचे सैनिक, विविध क्षेत्रातील दिग्गज आणि वीरांच्या सन्मानार्थ आयोजित केली जाते. माझे असे मत आहे की आपल्या सैनिकांचा आणि दिग्गजांचा सन्मान करणारे राष्ट्र हे नेहमीच सुरक्षित असते.’’ ‘’पंतप्रधान मोदींनी भारतीयांची फिटनेस पातळी सुधारण्यासाठी फिट इंडिया मिशन सुरू केले आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो’’, असेही ते यावेळी म्हणाले.
मॅरेथॉन संपल्यानंतर विविध श्रेणीत विजयी झालेल्यांना 30 लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे वितरीत करण्यात आली. फिटनेसला आणि राष्ट्रप्रेमाला प्रोत्साहन देण्यासाठी ही मॅरेथॉन पुढेही अशीच सुरु राहील, असे आयोजकांनी यावेळी सांगितले.
टीम भारतशक्ती
(अनुवाद – वेद बर्वे)