सीरियामध्ये सुरु असलेल्या बंडखोरी युद्धांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव ‘Antony Blinken’ यांनी सोमवारी सीरियाला सतर्कतेचा इशारा दिला. ‘Islamic States’ सीरियामध्ये पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे सीरियाने सावधानता बाळगावी असा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र हे घडण्यापासून रोखण्यासाठी अमेरिका वचनबद्ध आहे, या मुद्द्यावरही त्यांनी यावेळी जोर दिला.
याबाबत बोलताना ब्लिंकेन म्हणाले की, ‘आता सीरियन लोकांनी त्यांचे भविष्य निवडायची वेळ आली आहेय सर्वसमावेशक शासन निर्माण करण्याच्या दिशेने बंडखोर नेत्यांची विधाने स्वागतार्ह आहेत मात्र ते जे बोलतात ते वास्तावात अवलंबणे खरंच शक्य आहे का, याचा सारासार विचार आता सीरियावासीयांनी करण्याची गरज आहे.’
ब्लिंकेन पुढे म्हणाले की, ‘13 वर्षांच्या गृहयुद्धानंतर आणि सत्ताधारी कुटुंबाच्या पाच दशकांहून अधिक काळच्या निरंकुश शासनानंतर, राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांनी सीरियातून काढता पाय घेतला. त्यानंतर सीरियन बंडखोरांनी रविवारी राजधानी दमास्कसवर बिनविरोध कब्जा केला. असद यांच्या राजवटीचा अंत हा त्या सर्वांचा पराभव आहे ज्यांनी इराण, हिजबुल्लाह आणि रशिया सोबत कारवाया केल्या होत्या.’’ “इतिहास आपल्याला सांगतो आहे की चुकीच्या मार्गाने केलेले संघर्ष कशाप्रकारे हिंसाचारात बदलतात. दरम्यान याच परिस्थितीचा फायदा घेत, ISIS (Islamic State of Iraq) सीरियामध्ये पुन्हा आपली क्षमता प्रस्थापित करण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करतील. मात्र हे होऊ न देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’’ असेही ब्लिंकेन यांनी यावेळी स्पष्ट केले.
ब्लिकेंन आपल्या निवेदनात म्हणाले की, ‘या आठवड्याच्या शेवटी बंडखोर सैन्याने दमास्कसमध्ये प्रवेश केल्यानंतर अध्यक्ष अल-असद यांना पदच्युत केले. सोबतच त्यांनी इराणचे मध्यपूर्वेतील जाळे देखील उध्वस्त केले. मात्र इस्रायल, अमेरिका आणि अरब शक्तींनी आता एकत्र येऊन अस्थिरता निर्माण करणाऱ्यांच्या आणि अतिरेक्यांच्या जोखमीचा सामना करणे आवश्यक आहे. 2014 मध्ये इस्लामिक स्टेटने सीरिया आणि इराकच्या मोठ्या भागांमध्ये प्रवेश केला होता आणि 2019 पर्यंत अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सीरियने त्यांना बाहेर काढण्यापूर्वी इस्लामिक खिलाफतची स्थापना केली
US सेंट्रल कमांडने सांगितले की, त्यांच्या सैन्याने रविवारी मध्य सीरियामध्ये इस्लामिक स्टेटच्या तळांवर अनेक हवाई हल्ले केले. एका निवेदनात सेंटकॉमने यांनी म्हटले आहे की, इस्लामिक स्टेटने सीरियातील सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊ नये हे सुनिश्चित करण्यासाठी हे हल्ले केले गेले.
दरम्यान, अमेरिका इस्लामिक स्टेटला सीरियात त्यांची पुनर्बांधणी करण्यापासून रोखण्यासाठी वचनबद्ध असल्याचे ब्लिंकेन यांनी आश्वस्त केले आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)
अनुवाद – वेद बर्वे