‘सुरक्षेच्या बाबींसाठी जबाबदार असलेल्या उच्च-स्तरीय अधिकाऱ्यांची 12 आंतरराष्ट्रीय बैठक’ असे लांबलचक शीर्षक असणाऱ्या बैठकीच्या आयोजनाचा विचार ज्या नोकरशहांच्या सुपिक डोक्यातून आला त्यांना हे एक महान कार्य आहे असं कदाचित वाटू शकेल. मात्र मुळात अशा प्रकारची ही 12 वी बैठक असल्याने त्याला भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह 106 देशांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावणे ही घटना जास्त लक्षवेधी ठरू शकते. सीमेपलिकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन, पुरवला जाणारा निधी आणि दहशतवादी कारवाया अंमलबजावणी यासह सुरक्षेशी संबंधित अनेक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्याची ही एक उत्तम संधी होती.
पण त्यापेक्षा वेगळं असं काही आहे का? रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची उपस्थिती अनेकांना लक्षणीय वाटू शकते, कारण भारतात सध्या निवडणुका सुरू आहेत. किंवा ही बैठक इतर काही कारणांमुळे महत्त्वाची होती का? ऑक्टोबर महिन्यात रशियामध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये परिषदेच्या अजेंड्यावर चर्चा करण्याबरोबरच पंतप्रधान मोदींच्या सहभागाबद्दलही अजून निर्णय झालेला नाही.
अभ्यासकांच्या मते या परिषदेला अनुपस्थित राहण्यासाठी सध्या कोणतेही कारण दिसत जाणे नाही. त्यामुळे जर मोदी रशियाला गेले तर रशियन निश्चितपणे पुतीन यांच्यासोबत मोदी यांच्या द्विपक्षीय शिखर परिषदेचा आग्रह धरतील. पुतीन 2021 मध्ये वार्षिक द्विपक्षीय बैठकीसाठी भारतात आले होते, त्यामुळे रशियाला भेट देण्याची आता मोदींची पाळी आहे. सप्टेंबर 2022 मध्ये एससीओ शिखर परिषदेसाठी उझबेकिस्तानमधील समरकंद येथे मोदी आणि पुतीन यांची परत एकदा भेट झाली होती. त्यावेळी मोदींनी पुतीन यांना दिलेला “आजचे युग हे युद्धाचे युग नाही” हा सल्ला व्हायरल झाला होता.
त्यामुळे आता भेटीला जाण्याची मोदींची पाळी आहे. पण पुतीनसोबत कोणत्याही व्यक्तीची झालेली भेट वॉशिंग्टन डी. सी. आणि युरोपीय देशांमध्ये तणाव निर्माण करू शकते. भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांशी संपर्क साधताना भारताची बाजू उत्तम पद्धतीने मांडून चांगली कामगिरी केली आहे हे जरी सर्वत्र मान्य केले जात असले तरी खलिस्तानी समर्थक गुरपतवंत सिंह पन्नू या अमेरिकी नागरिकाच्या हत्येच्या कटात भारताचा सहभाग असल्याच्या आरोपांमुळे खळबळ माजली होती. मात्र तरीही भारत-अमेरिका यांच्यातील संबंध विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ, संरक्षण इत्यादी विषयांवरील उच्चस्तरीय सल्लामसलतींसह अखंडपणे सुरू राहिले आहेत.
अलीकडेच युक्रेनचे परराष्ट्रमंत्री डायमट्रो कुलेबा भारत भेटीवर आले होते. या दौऱ्यामुळे पाश्चिमात्य देशांच्या भुवया नक्कीच उंचावल्या गेल्या असाव्यात. हा दौरा दोन गोष्टींसाठी उल्लेखनीय होता, पंतप्रधान मोदी किंवा डोवाल यांच्याशी कुलेबा यांची कोणतीही बैठक झाली नाही. त्यामुळे युक्रेनमध्ये रशिया जे करत आहे त्यापासून अंतर राखूनही भारताने युक्रेनच्या लोकांना काहीही दिल्याचे दिसले नाही. याशिवाय या भेटीनंतर रशियाबरोबरचे द्विपक्षीय संबंध योग्य मार्गावर राहतील याचीही भारताने खातरजमा केली आहे.
पुन्हा एकदा सांगायचे तर, पुतीन यांना भेटण्याची आता मोदींची पाळी आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे कदाचित याबद्दलची चाचपणी करण्यासाठी, द्विपक्षीय चर्चेसाठी योग्य वातावरण तयार करण्यासाठी, या चर्चेत कोणतीही अडचण न येता सर्वकाही सुरळीत होईल याची खात्री करण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचे वैमनस्य निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेतली जावी या उद्देशाने रशियातील बैठकीला उपस्थित राहिले असावेत.
सूर्या गंगाधरन