मध्य आशियाई राष्ट्रांच्या शस्त्रास्त्र खरेदीसाठी रशियाला पर्याय काय?

0
मध्य
ऑक्टोबर 2022 मध्ये, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने 'बिल्डिंग पार्टनर कॅपॅसिटी प्रोग्राम' अंतर्गत उझबेकिस्तान प्रजासत्ताकाच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत असणाऱ्या स्पेशल ऑपरेशन्स फोर्सेसना वर दर्शविल्याप्रमाणे 50 पोलारिस एमआरझेडआर हलकी सामरिक लढाऊ गतिशीलता वाहने दिली आहेत. (फोटो सौजन्य military.polaris.com)

युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि रशियन शस्त्रास्त्रांची विश्वासार्हता तसेच उपलब्धता याबद्दल वाटणाऱ्या चिंतेमुळे, मध्य आशियाई देश प्राथमिक लष्करी पुरवठादार म्हणून यापुढच्या काळात रशियावर अवलंबून राहण्याचा पुनर्विचार करत आहेत, असे BreakingDefense.com मधील एका बातमीत म्हटले आहे.
न्यूयॉर्क येथील या संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान ही राष्ट्रे त्यांच्या शस्त्रास्त्रांमध्ये विविधता आणत असून त्यादृष्टीने  पर्यायांसाठी चीन, तुर्की आणि अगदी अमेरिकेसारख्या देशांकडेही पाहत आहेत.
अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहार विभागाचे सहाय्यक सचिव, राजदूत डोनाल्ड लू यांच्या मते, हा बदल घडत असला तरी त्यात चीनमुळे प्रभावित होणे हा प्रकार कमी आहे आणि रशियापासून दूर जाण्याचा प्रकार अधिक आहे. ते म्हणाले, “ते केवळ चीनचाच पर्याय म्हणून विचार करत नसून, इराण, युरोप आणि अमेरिकेचाही विचार करत आहेत.”
या बदलामागे अंशतः रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे त्याच्या संरक्षण पुरवठा साखळीवर आलेला ताण हे कारण आहे ज्यामुळे रशियन शस्त्रसामुग्री मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय, युक्रेनबरोबरच्या संघर्षात रशियन शस्त्रांच्या कामगिरीबद्दल, त्यांच्या परिणामकारकतेबद्दलही शंका उपस्थित केली जात आहे.
परराष्ट्र धोरण संशोधन संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या अभ्यासानुसार युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणामुळे मध्य आशियासाठी एक विश्वासार्ह सुरक्षा भागीदार म्हणून असणारे त्याचे स्थान डळमळीत झाले आहे. हा अविश्वास, विशेषतः कझाकस्तानमध्ये ठळकपणे दिसून आला असून, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी झालेल्या आक्रमणाच्या परिणामांमधून निर्माण झालेला बघायला मिळतो.
या देशांचे संरक्षण अंदाजपत्रक इतरांच्या तुलनेत कमी असले तरी-कझाकस्तान, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान यांनी 2023 मध्ये एकत्रितपणे 1.84 अब्ज डॉलर्स संरक्षणासाठी खर्च  केले. रशिया, चीन, अफगाणिस्तान आणि इराण या चार देशांच्या सीमा जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी या देशांचे असणारे धोरणात्मक स्थान त्यांना भू-राजकीय स्पर्धेचा केंद्रबिंदू बनवतात.
मध्य आशियातील बदलाचा चीनला मोठा फायदा झाला असल्याने चीनने आकर्षक शस्त्रास्त्र सौदे आणि आर्थिक प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. तुर्कीनेही , विशेषतः ड्रोन आणि इतर संरक्षण तंत्रज्ञानाच्या निर्यातीद्वारे, जागतिक शस्त्रास्त्र पुरवठादार म्हणून आपल्या भूमिकेत वाढ केली आहे.
दरम्यान, आर्थिक आणि तांत्रिक अडथळे कायम असले तरी, या प्रदेशाचे अमेरिकन निर्मित संरक्षण उपकरणांमधील स्वारस्य वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मध्य आशियाई देशांना विशेषतः लहान शस्त्रे, विशिष्ट श्रेणीसह मानवरहित हवाई वाहने (ययूव्ही) आणि ओव्हर द होरिझन रडार प्रणालींसारख्या विशेष सामग्रीमध्ये रस आहे.
अशी आव्हाने असूनही, आधुनिक शस्त्रप्रणालींच्या हळूहळू परिचयाद्वारे मध्य आशियाबरोबरचे संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याची संधी म्हणून अमेरिका याकडे पाहते. अमेरिकेच्या संरक्षण तंत्रज्ञानातील ही आवड या प्रदेशातील धोरणात्मक प्राधान्यांमधील व्यापक बदल प्रतिबिंबित करते, कारण  रशियाचा वरवर पाहता कमी होत असलेला प्रभाव आणि विकसित होत असलेल्या जागतिक सुरक्षा परिदृश्याला प्रतिसाद म्हणून जागतिक शक्तींशी हे देश त्यांचे संबंध संतुलित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

टीम भारतशक्ती

 


Spread the love
Previous articleBiggest Drug Haul In Indian Maritime History: ICG Of Andaman And Nicobar Command Apprehends Boat With 5,500 Kg Drugs
Next articleRussia Pushes Deeper Inside Eastern Ukraine

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here