धैर्य आणि एकजुटीचे अपवादात्मक दर्शन घडवत, हाय अल्टीट्यूड वॉरफेअर स्कूलच्या (एएडब्ल्यूएस) गिर्यारोहकांनी त्यांच्या मृत सहकाऱ्यांचे मृतदेह परत मिळवण्यासाठी एक धाडसी मोहीम सुरू केली आहे. तीन हवालदार प्रशिक्षकांचे मृतदेह शोधण्यासाठी हाती घेण्यात आलेले हे धाडसी ऑपरेशन, भारतीय लष्कराच्या प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्थेच्या अविचल भावनेचे प्रतीक आहे.
केंद्रशासित प्रदेश लडाखच्या नयनरम्य वातावरणात, एचएडब्ल्यूएसच्या 38 सदस्यांनी जुलै 2023 मध्ये माउंट कुनवर यशस्वी चढाई करत ते जिंकण्याची महत्त्वाकांक्षी योजना बनवली. 13 ऑक्टोबर 2023 पर्यंत शिखरावर पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यांचा प्रवास 1 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू झाला. ग्लेशियर असलेल्या या प्रदेशातील कधीही विसरता येणार नाही असा भूप्रदेश आणि अनियमित हवामानामुळे प्रचंड अडथळे निर्माण झाले.
दुर्दैवाने 8 ऑक्टोबर 2023 रोजी या मोहिमेत मोठी शोकांतिका घडली. बर्फाच्या भिंतीवर दोर सुरक्षितपणे रोवत असताना, फरियाबाद ग्लेशियरवरील कॅम्प 2 आणि कॅम्प 3 दरम्यान 18 हजार 300 फूटांपेक्षा जास्त उंचीवर हिमस्खलन झाले आणि संपूर्ण टीम अनपेक्षितपणे बर्फाखाली दबली गेली. या टीममधील चार सदस्य एका प्राणघातक घळीमध्ये अडकले.
“मोहिमेवर असलेल्या टीममधील सदस्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यापैकी काही सदस्य घसरत जाऊन दरीत कोसळले, मोठ्या प्रमाणात बर्फाखाली गाडले गेले. साहस आणि शोधाच्या निस्सीम भावनेने त्यांनी धैर्याने याचा मुकाबला केला. मात्र ती झुंज अपयशी ठरली,” असे एचएडब्ल्यूएसच्या प्रवक्त्याने सांगितले. त्यांच्या अथक प्रयत्नांनंतरही, टीम केवळ लान्स नायक स्टॅन्झिन तारगैसचा मृतदेह परत मिळवू शकली. हवालदार रोहित, हवालदार ठाकूर बहादूर आले आणि नायक गौतम राजबंशी यांचे मृतदेह एका दरीत बर्फ आणि हिम यांच्या थरांखाली खोलवर दबलेल्या स्थितीत अडकले होते.
‘Leave No Man Behind’
In an extraordinary display of courage & camaraderie, the mountaineers of the High Altitude Warfare School #HAWS undertook a heroic mission to recover the mortal remains of their fallen comrades, the three Havildar Instructors, who were caught in the deadly… pic.twitter.com/G6phXaSlqM
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) July 10, 2024
धाडसी मोहीम
18 जून 2024 रोजी एचएडब्ल्यूएसने रोहित, ठाकूर आणि गौतम या बेपत्ता झालेल्या तीन सैनिकांना वाचवण्यासाठी ‘ऑपरेशन आरटीजी’ (तीनही सैनिकांच्या नावाची आद्याक्षरे) सुरू केले. या मोहिमेत 88 तज्ज्ञ गिर्यारोहकांचा समावेश होता आणि त्याचे अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करण्यात आले होते. विशेष गिर्यारोहण आणि बचाव यासाठी लागणारी उपकरणे, विशेष कपडे, जगण्याचे आवश्यक सामान, राहण्यासाठी तंबू आणि जेवणासह खुंबाथांगपासून 40 किमी अंतरावर रोड हेड कॅम्प उभारण्यात आला. सैनिकांचे मृतदेह व्यवस्थितपणे कॅम्पवर आणण्यासाठी किंवा गरज पडली तर बचाव पथकाला बाहेर काढण्यासाठी दोन हेलिकॉप्टर्स सज्ज ठेवण्यात आली होती.
मेजर जनरल ब्रूस फर्नांडीस यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्याच्या प्रयत्नांवर देखरेख करत, रस्त्यापासून 13 किमी अंतरावर 14 हजार 790 फूट उंचीवर एक बेस कॅम्प उभारण्यात आला. एचएडब्ल्यूएसचे डेप्युटी कमांडंट ब्रिगेडियर एस. एस. शेखावत यांनी वैयक्तिकरित्या या शोध मोहिमेचे नेतृत्व केले. अपघाताची घटना बेस कॅम्पपासून 3 किमी अंतरावर 18 हजार 300 फूट उंचीवर घडली होती. 25 जून 2024 रोजी, भोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी दोन मध्यवर्ती कॅम्पसह फॉरवर्ड बेस कॅम्पची स्थापना करण्यात आली. उपग्रह दूरध्वनी, विशेष तंबू, आधुनिक साधने आणि 20 कि. मी. अंतरावर तैनात असलेली हेलिकॉप्टर्स यासह या नव्या टीमने त्यांच्या सुरक्षेसाठी सर्व खबरदारी घेतली.
पहिले यश
पहिली महत्त्वपूर्ण प्रगती 4 जुलै रोजी झाली. हवालदार रोहित कुमार (डोगरा स्काउट्स) यांचे अवशेष बर्फाखाली सुमारे 30 फूट खोल सापडले. हे अवशेष हेलिकॉप्टरने कुंभथांग येथे नेण्यात आले. ब्रिगेडियर शेखावत म्हणाले, “अत्यंत थंड आणि कठीण भूप्रदेशामुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करत, नव्या स्फूर्तीसह, टीम10 फूट खोल दरीत उतरली”. 7 जुलै रोजी या टीमला हवालदार ठाकूर बहादूर आले (गोरखा रायफल्स) यांचे अवशेष मिळाले.
नायक गौतम राजबंशी (आसाम रेजिमेंट) यांचा शोध घेणे अजूनही सुरू होते. 8 जुलै रोजी, टीमला त्यांचेही अवशेष यशस्वीरित्या मिळाले आणि ही शोधमोहीम पूर्ण झाली. या तिघांचे पार्थिव संपूर्ण लष्करी सन्मानाने त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले.
मेजर जनरल फर्नांडिस यांच्या म्हणण्यानुसार, “ऑपरेशन आरटीजीने आपली सर्व उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण केली. एचएडब्ल्यूएसच्या धाडसी सैनिकांच्या उल्लेखनीय शौर्याचा आणि अतूट समर्पणाचा सन्मान करत देश त्यांच्यामागे एकजुटीने उभा आहे.” आपल्या सशस्त्र दलांनी केलेल्या बलिदानाची तसेच कर्तव्य आणि सन्मानाच्या निर्माण झालेल्या अतूट बंधांची मार्मिक आठवण कायम रहावी म्हणून एचएडब्ल्यूएसचे असाधारण प्रयत्न कामी येतात.
टीम भारतशक्ती