अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीन या देशांवर लादलेल्या टॅरिफमुळे, जागतिक व्यापार युद्धाचा संभाव्य धोका निर्माण झाला असून, यामुळे गुंतवणूकदारांच्या मनोवस्थेवर दबाव पडला आणि परिणामत: सोमवारी आशियाई शेअर मार्केट घसरले तसेच U.S. इक्विटी फ्यूचर्स देखील मोठ्या प्रमाणात घसरले.
ऑफशोअर मार्केटमध्ये चिनी युआनच्या तुलनेत, यूएस डॉलरने सर्वकालीन उच्चांक गाठला, तर कॅनेडियन डॉलरच्या तुलनेत 2003 नंतरचा सर्वोच्च उच्चांक गाठला आणि मेक्सिकन पेझोच्या तुलनेत २०२२ नंतरचा सर्वोच्च स्तर गाठला.
जपानचा निक्केई शेअर, सरासरी ट्रेडिंगच्या पहिल्या मिनिटांत 2.3% इतका घसरला आणि ऑस्ट्रेलियाचा बेंचमार्क – जो सामान्यत: चिनी बाजारांसाठी प्रॉक्सी म्हणून कार्य करतो, तो देखील 2% पेक्षा जास्त घसरला.
हाँगकाँगचे स्टॉक दिवसाच्या उत्तरार्धात उघडतात, तर मेनलॅंड बाजारपेठा या ल्युनार कॅलेंडरनुसार नवीन वर्षाच्या सुट्टीसाठी बुधवारपर्यंत बंद राहतात.
चीन WTO कडे मदत मागणार
डोनाल्ड ट्रम्प यांनी, कॅनडा आणि मेक्सिकोवर 25% आणि चीनवर 10% टॅरिफ लादले आहे. गेल्याच महिन्यात त्यांनी याबाबत जाहीर धमकी देखील दिली होती. ‘अवैध स्थलांतर आणि ड्रग व्यापाराशी लढण्यासाठी हे उपाय करणे आवश्यक असल्याचे’, ट्रम्प सांगतात.
कॅनडा आणि मेक्सिकोने याला प्रत्युत्तर देण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची शपथ घेतली आहे. तर चीनने याप्रकणी ट्रम्प यांच्या टॅरिफ्सविरोधात, ‘जागतिक व्यापार संघटना‘ (WTO) कडे जाण्याची घोषणा केली आहे.
तीन कार्यकारी आदेशांमध्ये स्पष्ट केली गेलेली ही ‘अतिरिक्त शुल्क’, मंगळवारी मध्यरात्री 12 वाजून 01 मिनीटांपासून, लागू होण्याची शक्यता आहे.
याबाबत कॅपिटल इकॉनॉमिक्सचे पॉल ॲशवर्थ म्हणाले की, ‘ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे विनाशकारी जागतिक व्यापार युद्धाला सुरुवात होऊ शकते आणि परिणामत: U.S. चलनातही वाढ होऊ शकते, जी आम्ही आधी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजापेक्षा कित्येक पट मोठी आणि वेगवान असू शकते.”
EY चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ- ग्रेग डाको, यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ योजनेचा आर्थिक परिणाम मोजणाऱ्या मॉडेलमध्ये सुचवले की, यामुळे यावर्षी अमेरिकेची वाढ १.५ टक्क्यांनी कमी होईल, तर कॅनडा आणि मेक्सिको हे देश मंदीच्या दिशेने जातील आणि “स्टॅगफ्लेशन” चा प्रारंभ होईल.
यापूर्वी बार्कलेजच्या रणनितीकारांनी असा अंदाज वर्तवला होता की, युएस टॅरिफ्स S&P 500 कंपनीच्या कमाईवर, 2.8% ड्रॅग निर्माण करू शकतात, ज्यात लक्ष्यित देशांकडून प्रतिशोधात्मक उपाययोजनांमुळे अपेक्षित परिणाम समाविष्ट आहेत.
व्हाईट हाऊसने शनिवारपासून टॅरिफ लागू करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाचा पुनरुच्चार करताच, शुक्रवारी कॅश इंडेक्सकरता 0.5 टक्क्यांनी माघार घेतल्यामुळे, S&P 500 फ्युचर्स हे 1.7 टक्क्यांनी घसरले. कॅश इंडेक्ससाठी शुक्रवारच्या 0.3 टक्के नुकसानानंतर नॅस्डॅक फ्युचर्स 2.5 टक्क्यांनी घसरले.
डॉलरला मोठा फायदा
एशियन वेळेनुसारच्या पहिल्या सकाळी, ऑफशोअर मार्केटमध्ये यूएस डॉलर 0.7 टक्क्यांनी वाढून, 7.2552 युआन पर्यंत पोहोचली. यापूर्वी 7.3765 युआनचा विक्रमी उच्चांक गाठला होता. दरम्यान, सुट्ट्यांमुळे अधिकृत ऑनशोर ट्रेडिंग होणार नाही.
दुसरीकडे यूएस चलन 2.3% वर चढून 21.15 मेक्सिकन पेसोवर पोहोचले आहे. जुलै 2022 नंतर प्रथमच त्याने 21-पेसोची किंम्मत ओलांडली आणि 1.4% वाढून C$1.4755 वर पोहोचले, 2003 पासून न पाहिलेली पातळी यावेळी गाठली.
युरोची किंम्मत 2.3% ते $1.0125 पर्यंत घसरली. नोव्हेंबर 2022 पासूनची, युरोपसह ट्रम्पच्या टॅरिफ क्रॉसहेअरमधील सर्वात कमी पातळी गाठली.
जपानचा येन जो यावेळी अधिक मजबूत होता, तो ०.२ टक्क्यांनी घसरून डॉलरला १५५.५३ येनची किंम्मत मिळाली.
क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन 5.8 टक्क्यांपर्यंत घसरून तीन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर- $96,191.39 वर आली.
दरम्यान, तेलाच्या किमती वाढल्या असून, यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड ऑईल 2.4 टक्क्यांनी वाढून $74.27 प्रति बॅरल आणि ब्रेंट क्रूड फ्युचर्स 1 टक्क्यापासून ते $76.40 डॉलर्स प्रति बॅरल वाढले.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)