अफगाणिस्तानच्या तीन प्रांतांवर पाकिस्तानचे हवाई हल्ले, युद्धविराम संकटात

0

तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी एक्स (X) प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टनुसार, पाकिस्तानने रात्रीच्या वेळी अफगाणिस्तानच्या तीन प्रांतांमध्ये हवाई हल्ले केले, ज्यात एकूण नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे.

पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “पाकिस्तानच्या घुसखोर सैन्याने एका स्थानिक नागरिकाचे घर बॉम्बने उद्ध्वस्त केले. परिणामी, खोस्त प्रांतातील नऊ लहान मुले (पाच मुले आणि चार मुली) आणि एका महिला शहीद झाली.”

कुनार आणि पक्तिका प्रांतांवर झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये, इतर चार नागरिक जखमी झाले. पेशावरच्या सद्दार भागातील फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी मुख्यालयामध्ये झालेल्या आत्मघाती स्फोटानंतर (ज्यात तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता) काही तासांतच हे हवाई हल्ले झाले.

हल्ला करणाऱ्यांना ठार मारण्यात आले असून, सध्या कोणत्याही व्यक्ती किंवा गटाने त्याची जबाबदारी स्विकारलेली नाही. परंतु, अधिकाऱ्यांना या तहरीक-ए-तालिबानचा सहभाग असल्याचा संशय आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे जलालाबादमधील वाणिज्यदूत- जनरल शफकतुल्ला खान यांनी, नंगरहार प्रांताचे (ज्याची राजधानी जलालाबाद आहे) गव्हर्नर- मुल्ला मोहम्मद नईम अखुंद यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये काही काळानंतर झालेली ही पहिली उच्च-स्तरीय भेट होती, मात्र त्यातून नेमके काय साध्य झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

परंतु रिपोर्टनुसार, कतार आणि तुर्कस्तानने ऑक्टोबर महिन्यात मध्यस्थी केलेला युद्धविराम, अजूनही कायम असल्याचे दिसते, जरी पाकिस्तानने अलीकडील आठवड्यांत अतिरेक्यांविरुद्ध “गुप्तचर कारवायांमध्ये” वाढ केली आहे.

मंगळवारी, पाकिस्तानी सैन्याने दावा केला की, “त्यांनी अफगाण सीमेजवळील खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या बन्नू जिल्ह्यातील एका छुप्या जागेवर छापा टाकत, भारताचा पाठिंबा असलेल्या 22 फायटर्सना ठार केले.”

त्यांनी तांच्या लष्करी निवेदनात म्हटले आहे की “परदेशातून प्रयोजन केलेल्या आणि समर्थित अशा दहशतवादाचे निर्मूलन करण्यासाठी पाकिस्तान पूर्ण वेगाने कारवाई सुरू ठेवेल.”

पाकिस्तानचा दावा आहे की, भारत आणि अफगाणिस्तान तहरीक-ए-तालिबानच्या हल्ल्यांना पाठिंबा देत आहेत. तथापि, दोन्ही देशांनी हा दावा फेटाळून लावला आहे आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी गटांना दीर्घकाळ पाठिंबा दिल्याबद्दल इस्लामाबादवर टीका केली आहे.

अलीकडील सीमा संघर्ष आणि पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांमुळे, दोन्ही देशांमधील सीमा बंद झाली आहे आणि व्यावसायिक वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. दरम्यान, काबूलने अलीकडेच इराण आणि भारतासोबत व्यापार तसेच व्यावसायिक संबंध मजबूत करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज

+ posts
Previous articleतैवान वादादरम्यान, चीनसोबतचे संबंध ‘मजबूत’ असल्याचा ट्रम्प यांचा दावा
Next articleयुक्रेनने रशियन तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि नौदल जहाजावर साधला निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here